धन्यवाद

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल लाख लाख धन्यवाद. आज प्रतिक्रियेचा आकडा हजाराच्या पुढे गेला. खूप आनंद वाटतो आहे. सर्वांच्याच प्रतिसादांमुळे हे सव्वा वर्षाचे ब्लॉगबाळ चांगले दुडूदुडू धावते आहे. काय बोलावं अस झालं आहे आता. खर तर या प्रतिक्रियांचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आहे. माझ्याकरिता नेहमीच स्फूर्तीचे आणि मार्गदर्शक ठरल्या आहेत. मी ‘माझ्यातच’ गुंतलेला असतो. आणि त्यातून बाहेर पडलो तर इतर गोष्टींवर लक्ष जाते. ह्याच प्रतिक्रियांच्या बळावर मी ‘अप्सरा’शी ओळख नसतांना बोलू शकलो. ह्या प्रतिक्रियांमुळे, माझ्या अनेक चुका सुधारल्या गेल्या. जर ह्या प्रतिक्रिया नसत्या तर कदाचित मी कधीच अप्सराच्या जवळ जायची हिम्मत केली नसती. आणि मलाही मित्र आहेत अस कधीच मानू शकलो नसतो. आणि तेही खूप चांगले. माझी बडबड ऐकणारे. मला समजून घेणारे. कसं कळलं असते?

मला हे माहिती आहे की, मी प्रतिक्रियेवर आभार किंवा त्यावर माझे मत, माझी प्रतिक्रिया देत नाही. आणि त्यामुळे नाराजी वाढली आहे. खर तर आलेल्या सर्व प्रतिक्रिया मला नेहमी मान्यच होत्या. माझ स्पष्ट अस मत आहे की, प्रत्येकाच्या दृष्टीने प्रत्येकाचे मत हे बरोबरच असते. जस माझे एक मत आहे. तसेच सर्वांचे आहे. आणि जसे माझे मत माझ्या दृष्टीने बरोबर आहे. तसे प्रत्येकाचे त्याच्या दृष्टीने बरोबर आहे. त्यामुळे मला ते मान्यच असते. माझ्या घरी म्हणजे अगदी आधीपासूनच सर्वांना समान दर्जा. वडील अंतिम निर्णय देतात. पण अस नाही की बाकीच्यांना काहीच बोलण्याचा हक्कच नाही. घरात एखादयाला एखादे मत आवडले नाही तर तो विरोध करीत नाही. आणि सपोर्ट देखील करीत नाही. प्रतिक्रिया हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

म्हणजे आपण फोन करावं, आपण ‘हेल्लो’ म्हणावा पण पलीकडून काहीच प्रतिसाद येऊ नये. किंवा एखादया नेत्याने भाषण करावे आणि त्याच्या भाषणावर लोकांनी टाळ्या वाजवू नये. किंवा अंडी देखील फेकून मारू नये. तस होते, जर प्रतिक्रिया नसतील तर. खर तर मी जे बोलतो ती देखील एक प्रतिक्रियाच आहे. मी काही लेखक किंवा विचारवंत वगैरे नाही. किंवा ज्ञानी वगैरे. मी जस बोलतो अगदी जसच्या तस, इथे बोलतो. जे वाटलं जे घडलं ते इथे बोलतो. त्यामुळे अनेकदा.. अनेकदा कसलं प्रत्येकवेळी चुका घडतातच. तरी तुम्ही मला समजून घेतात. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी इथं ज्या गोष्टी शेअर करतो त्या फक्त माझ्या बहिणाबाई सोबत बोलतो. माझ्या आई वडिलांना माझ्या या ब्लॉगबद्दल माहिती आहे. पण काय काय बोलतो याबद्दल नाही माहित. त्यामुळे तर खर इतकं बोलू शकतो.

तसचं अगदी अप्सरा बद्दल. तिला देखील माहित नाही. कधी कधी वाटत काय विचार करेल, जेव्हा मला ती आवडते कळल्यावर? चपलेने किंवा तीच्या वानरसेनेने ठोकेल. असो, पण जर तुम्ही नसता किंवा ह्या प्रतिक्रिया नसत्या तर खुपंच एकटेपणा जाणवला असता. कोणाशी बोललो असतो? बहिणाबाई खूप वैतागते माझ्या त्याच त्याच गप्पा ऐकून. आणि माझे मित्रही. त्यामुळे खरंच खूप एकटेपणा वाटला असता. पण आता छान, प्रतिक्रियेतून मी माझ्या चुका सुधारतो. खरंच माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेला आहे ‘प्रतिक्रिया’. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.

Advertisements

2 thoughts on “धन्यवाद

  1. Hi Hemant,
    Thank you very much for your appreciation for the responses sent by your friends like
    me.Your blog has got so many of us involved for the simlpe reason that the Lover Boy is an innocent , somewhat shy and hesitating person who needs moral support .W e all wish that you have the sufficient courage to open your heart to APSARA .
    All the best
    Regards

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s