विठ्ठला कोणता मोबाईल घेऊ हाती…

माझा प्रिय मोबाईल आजकाल नीट वागत नाही आहे. तब्येत सारखी खराब होते त्याची. कधी कधी ऑपरेशन फेल म्हणतो. आणि कधी कधी अचानक बंद देखील होतो. काय कळेना. एक महिन्यापासून असाच वागतो आहे. त्यामुळे पुढील महिन्यात नवीन मोबाईल घ्यावा असा विचार करतो आहे. आता माझा नोकियाचा ३६०० स्लायडिंगचा आहे. तसा छान आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेला. आणि त्या नोकिया कंपनीचे हेडफोन देखील नीट राहत नाहीत. सारखे खराब होतात. आता गेल्या वर्षभरात चार सहज विकत घेतले गेले असतील. नेहमी पाच-सहाशे खर्च करायला नाही परवडत. त्यामुळे आता कोणत्या कंपनीचा घ्यावा इथपासून सुरवात झाली आहे. 

आज सकाळी तिला विचारलं, तर तिचा नोकियाचा एक्स ६. मस्त आहे. तिचा मोबाईल माझ्या पेक्षा देखील छान आहे. असो, ती एकदा मला माझा मोबाईल छान आहे अस बोललेली. बहुतेक माझ्या समाधानासाठी. आज खर तर तिला मी तिचा मोबाईल नंबर विचारणार होतो. पण पिंग करून तिच्या मोबाईलचा मॉडेल नंबर विचारला. हिम्मत कधी होणार यार. तिने सांगितलेला मोबाईल छान आहे. माझ्या जुन्या कंपनीतील सहकारीला विचारलं तर ती सॅमसंग कोर्बी तिला चांगला वाटतो. सॅमसंग गॅलक्सीसुद्धा छान वाटला. तिने तिच्या नवर्यासाठी माइक्रॉमॅक्सचा मोबाईल घेऊन द्यायचे ठरवले आहे.

सहकारीने कार्बनचे मोबाईलचा सुद्धा सल्ला दिला. पण त्यातला मला एकही आवडला नाही. माझ्या मित्रांचे देखील मी सॅमसंगचे मोबाईल पहिले पण ते देखील काही खास वाटले नाहीत. माझ्या बहिणाबाईचा नोकियाचा ई ७२. खर सांगू का, मला खिशात सहज मावेल असा आणि चांगला कॅमरा आणि चांगली साउंड क्वालिटी असलेला हवा आहे. बाकी काही फार भारी पाहिजे अस नाही. पहिला की आवडला अस हवा. तिचा मोबाईल फारच मोठा वाटतो. तो एक एचटीसी कंपनीचा टॅटू मोबाईल छान वाटला आहे. पण तो घ्यावा अस अजून तरी वाटत नाही आहे. गुगलचा तो नेक्सस वन घ्यावा अशी इच्छा आहे. पण तो फारच महाग असेल. दहा पंधरा हजारापर्यंत हवा. जास्ती खर्च करून काय फार फायदा वाटत नाही. त्यामुळे आता कोणता घेऊ याचा विचार करतो आहे. तुम्ही कोणता वापरता?

Advertisements

14 thoughts on “विठ्ठला कोणता मोबाईल घेऊ हाती…

  1. स्मार्ट फोन catagory मध्ये सध्या samsung चे मोबाईल्स आघाडीवर आहेत.१० हजार ते १५ हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला samasung चे star,omnia,champs हे चांगले पर्याय आहेत.Galaxy आणि Wave साठी बजेट थोडे वाढवावे लागेल.नोकियाचा x-6 आणि सोनीचा xepria ही मस्त आहेत.

    अवातंर-भारतीय मोबाईल मार्केट्मध्ये samsung आणि micromax ने नोकियाचा वाटा ७५% वरून ४५% पर्यंत खाली आणला आहे.

  2. नोकिया एन ९५ वापरला पण दिड वर्षातच खराब झाला. सध्या कॉर्बी प्रो वापरतोय.. बरा आहे. पण लवकरच ब्लॅक बेरी वर मायग्रेट करीन म्हणतोय!
    ब्लॅक बेरी घे.. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s