अस नेहमी का होत?

अस नेहमी का होत, की मित्रांच्या फालतू नखरे सुरु होतात. आणि त्यामुळे मी ज्यावेळी कॅन्टीनमध्ये जात असतो. आणि ती जेवण करून निघालेली असते. अस नेहमी का होत, की मित्राला एखादी मुलगी आवडते. आणि तो तिची माहिती मला शोधायला सांगतो. अस का? नेहमी मला तिची आठवण येते. सगळीकडे तीच दिसते. आणि तीच आवडते. स्वप्नातही मी तिलाच शोधतो. नेहमी अस का होत की, ती समोर आली की माझी गडबड होते. तिच्याशी बोलायची खूप इच्छा होते. पण समोर गेले की सगळ फूस होत.

अस का? ती असते पण तिला मी असल्याची जाणीवही होत नाही. तिच्या डेस्कवर तो नारळ येतो. आणि माझे डोके फिरते. अस का होत? मी नेहमी तिच्यासाठी तडफडतो. ती नसेल तर जेवणात मन लागत नाही. जेवणही धड जात नाही. व्यायाम करतांना तिचा चेहरा आठवला की त्रास व्हायचे बंद होते. ती माझ्याशी बोलली नाही तर माझा मूड कशातच लागत नाही. अस का होत की, समोर ललना असतांना देखील फक्त तिचीच ओढ लागून राहते. मित्रांसोबत असतांना सुद्धा एकटेपणा वाटतो. दिवस इतका भरकन का जातो? इतक्या लवकर विकेंड का येतो? आणि अस का की मी जातांना ती ‘अवे’ असते.

अस नेहमीच का होते? मला ती सोडून दुसर्या कोणत्याच गोष्टीत रस का येत नाही. ती नाही तर काहीच नाही अस का वाटते. आई वडिलांनी दाखवलेली स्थळात तीच स्थळ का नसते? ती हसल्यावर सगळ छान का वाटते? तीच एवढी छान का वाटते. तिच्याशी कितीही बोललं तरी समाधान का होत नाही? आणि नेहेमी नेहमी तिच्याबद्दलच बोलावं अस का वाटत. अस का? तिचाच विचार का? फक्त तीच का? तिचा चेहरा सारखा डोळ्यात का? नेहमी मलाच तिची आठवण का? सगळीकडे, प्रत्येक मुलीत फक्त तीच का दिसते? तिला का अस होत नाही. माझी हिम्मत का होत नाही. तिचा डेस्क माझ्या जवळ का नाही. ती माझ्या सोबत का नाही. रात्री देखील तिचाच विचार का? झोप का येत नाही. अस नेहमीच का होत?

Advertisements

2 thoughts on “अस नेहमी का होत?

 1. मित्रा,

  आताशा असं काही होत नाही… खुप काळ निघून गेलाय …. जवळपास १२ वर्षे झाली असतील ….

  असं का होतं? घरी यायला उशीर झाला की, बायको मोबाईलचे dialed, received आणि missed calls check करते …. असं का होतं? ऑफिस चा विषय घरात काढायची ओढ़ नसतानाही …. बायको नको ते प्रश्न विचारते …
  असं का होतं? घरात एका शांत क्षणी बसलो असताना …. बायको मला डिवचण्यासाठी उगीचच तिची आठवण काढ़ते आणि मग मला भुतकाळात घेउन जाते ….
  असं का होतं? या कविता वाचताना मी अलगद भुतकाळात जातो ….

  आहे उत्तर तुझ्याकडे?

  सस्नेह…

  अनिरुद्ध

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s