एक्स ६

परवा कंपनीतून निघाल्यावर डायरेक्ट मोबाईल स्टोअर. त्यानंतर नोकियाचे कस्टमर केअर. आणि त्यानंतर अजून एका मोबाईल दुकान पालथे घातले. सुरवातीला सॅमसंग चॅम पहिला. चांगला आहे. स्वस्तात मस्त. चार साडेचार हजारात टच स्क्रीन. पण कॅमराला क्वालिटी नाही. मग सॅमसंगचा गॅलक्सी पहिला. तो तर मस्तच. काय बोलू. सर्व काही आहे त्यात. अजून एक पहिला एचटीसी टॅटू. तो मला आवडलेला. पण, तीन मेगा पिक्सल कॅमरा. त्यामानाने मग मला तो नोकियाचा एक्स ६ चांगला वाटला. थोडा लुक डब्बा वाटला पण बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. सॅमसंगचा गॅलक्सी, एचटीसी टॅटू आणि एक्स ६ मध्ये ५ मेगा पिक्सलचा कॅमरा आहे. त्यामुळे, बाकी त्याच्यात आणि इतरात फार काही फरक नाही. आणि खर बोलायचे झाले तर, तिचा सुद्धा तोच मोबाईल आहे. म्हणून मग.

काल दुपारी आम्ही कम्युनिकेटरवर बोललो. म्हणजे सकाळी ‘गुड मोर्निंग’ केल्यावरच बोलणार होतो. पण ती बिझी. म्हटलं घेतल्यावर सांगू. दुपारी तिने पिंग केल्यावर मला विचारलं की, ‘मोबाईल कोणता घ्यायचा काही ठरवलं का?’. तर तिला म्हटलं ‘हो, एक्स ६’. ती ‘रिअली?’. मी ‘हो. मी काल मोबाईल शॉपी मध्ये गेलो होतो’. खर तर मी मोबाईल स्टोअर म्हणायला हव होत. पण मी मोबाईल शॉपी बोललो. तिने किंमत विचारली. मी ‘१३८००’ ती ‘किती जीबी?’. आता त्या एक्स ६ मध्ये आठ जीबी आणि सोळा जीबी असे दोन मॉडेल आहेत. मला आठ जीबी फार होतील.

तिने कुठून घेणार विचारल्यावर मी ‘निगडी’. तिने ‘मोबाईल स्टोअर मध्ये एकदा किंमत विचार’ अस म्हटल्यावर मी तिला ‘मी पुढच्या आठवड्यात खरेदी करणार आहे. हो, १४०००’ अस म्हटलं. ती ‘मी नोकिया प्रायोरिटीमधून खरेदी केलेला, परंतु महाग मिळाला’. मी तिला दोन्हीही ठिकाणच्या किमती सांगितल्या. तिने घेतला त्यावेळी त्याची किंमत १४५०० होती. तिने मला नोकिया प्रायोरटी मधून घे म्हणून सांगितले. मी ‘हो’. तिला ‘मागील महिन्यात घेतलास का तू मोबाईल?’. तर ती बोलली ‘तीन सप्टेंबर’. मग जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. खर तर, खूप छान वाटलं होत. त्यात ती काल काय दिसत होती म्हणून सांगू. ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि त्यात तीच्या गळ्यातली ती सोनेरी चेन. आहाहा! ती इतकी सुंदर का आहे? अजूनही डोळ्यात तिचाच चेहरा दिसतो आहे. तिला माझ्या मनातलं कसं कळत हेच कळत नाही.

असो, पण तो दुपारी नारळ सारखा तीच्या डेस्कजवळ. मग मला खूप राग आलेला. सारखा तीला त्याच्या डेस्कवर घेऊन जायचा. मला मान्य आहे की तो तीचा सिनिअर आहे. पण त्या कार्टूनला दुसरी कोण भेटत नाही काय? आज जातांना तिने मला बाय नाही केल. खूप बेकार वाटलं. मी नेहमी करतो ती असेल तर डेस्कवर. नंतर मुडच लागेना कशात. पण राम मंदिराच्या बाजूने निकाल ऐकल्यावर बर वाटलं. काल संध्याकाळी चिंचवड स्टेशनला गेलो होतो. असो, माझा मोबाईल कोणता घ्यायचं हे ठरलं आहे. मोबाईल घेतला की, तीचा नंबर मागून घेईल.

Advertisements

2 thoughts on “एक्स ६

  1. मोबाईल वर गप्पा रंगल्या चांगली गोष्ट आहे, आता मोबाईल घेतल्यावर त्याच्या Applications बद्दल डीसकस कर, अगदी तुला त्या बद्दल माहिती असलं तरी… GL 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s