परीक्षा

उद्या माझा बीसीएचा पहिला पेपर. तस् आता परीक्षा आणि मुलाखती यात काही नवीन राहिले नाही आहे. काय माहित काय होईल. माझाकडे जुन्याच अभ्यासक्रमाची पुस्तके आहेत. पण चिंता नसावी. बेसिक कॉम्पुटर आणि इंग्लिश असा पेपर आहे. जेवढ जमेल तेवढ वाचून जातो. जे येईल ते लिहील. आणि उरलेल्या गोळ्या. यार अस, शिकायला कधी आवडलंच नाही. थोडक्यात ‘ढ’. कसाबसा साठ बासष्ट टक्के. असो, आता बोलण्यात काही अर्थ नाही तो विषय. कारण इतिहासात, म्हणजे माझ्या इतिहासात मी खूप दिव्य पराक्रम केलेले आहेत.

दहावीत चाचणी परीक्षेत बीजगणित आणि भूमिती मिळून पंच्याहत्तर मार्कांचा पेपर. त्यात बीजगणित अडतीस आणि भूमिती सदतीस. त्यावेळी भूमितीचा पेपर लिहायचा राहून गेलेला. म्हणजे मला बीजगणित विषयाचा पेपर संपवतांना सगळं वेळ लागलेला. आणि निकालानंतर माझ्या वर्ग शिक्षकांनी मला वर्गात उभे करून ‘कॉपी केलीस का?’ म्हणून विचारलेलं. कारण मला बीजगणितात अडतीस पैकी पस्तीस. आणि भूमितीला भोपळा होता. आता प्रश्नपत्रिका सोडवालीच नाही म्हटल्यावर भोपळाच मिळणार होता. खर सांगितल्यावर सगळेच हसले.

आणि बारावीत यापेक्षाही मोठा पराक्रम केलेला. विज्ञान शाखेत होतो. इंग्लिश विषयाचा बोर्डाचा पेपर. पन्नास मार्कांचा सोडवलेला. निकालाच्या आधी नापास झाल्याची स्वप्न पडत होती मला. कारण एक तर इंग्लिशमध्ये मी ‘मास्तर’ माणूस. आणि त्यात विज्ञान शाखेत जाऊन इंग्लिशमध्ये नापास, म्हटल्यावर माझे ‘गिनीज’ बुकात सहज नाव कोरले गेले असते. पण पडले ४४. खर तर मी आणि अभ्यास हे काही विळ्या भोपळ्याचे नाते नाही. पण तो अभ्यास कधी आवडलाच नाही.

यावेळी आई वडिलांना मी बीसीएची परीक्षा देतो बोललो तर त्यांनाही आश्चर्य वाटलेलं. आता त्यांना काय सांगू, की किमया त्या अप्सरेची आहे. पण चला जे होईल ते होईल. आजकाल ती सोडून दुसऱ्या कशाची भीतीच नाहीशी झाली आहे. कालही असंच. बाईकवर रोज तासभर लागणारा रस्ता मी काल अर्ध्या तासात आणि तेही जास्त गर्दी असतांना पार केला. आता याला कारणीभूतही तीच. कारण तिने ‘बाय’ केल नाही म्हणून माझा मूड गेलेला. त्या विचारात घर कधी आल कळलंच नाही. असो, मित्राची बाईक होती. त्याला काम असले की मी त्याची बाईक घेऊन घरी येतो. मी सुद्धा घेईल. तूर्तास इथेच पकपक बंद करतो. आणि ते धूळ खात पडलेले धोपटी जरा वर खाली करतो. आयसीएफएआय वाल्यांनी दिलेले आयकार्ड देखील खराब झाले आहे. बघुयात काय होत ते. एकुण चार पेपर आहेत. दर रविवारी एक असे महिनाभर. असो, काल मला ती नाराज आहे अस वाटलेलं. बाकी बोलूच.

Advertisements

8 thoughts on “परीक्षा

  1. Hi Hemant ,
    Getting 44 out of 50 in English shows that you have the capacity to score when you want to .That should apply to your efforts to win Apsara.Why not take this as an exam and express your feelings towards her in future ,but before that you will have to win her confidence and that will happen when you talk to her and take her to a restraunt one day.Remember most love stories start over a cup of coffee.
    All the best
    JKBhagwat

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s