भोपळा

परीक्षेचा निकाल पाहण्याची गरज राहिलीच नाही. उलट भोपळा नाही मिळाला तर आश्चर्य असेल. आता अभ्यास न करता गेल्यावर हेच होणार होत. असो, चूक झाली. आणि मला ती मान्य सुद्धा आहे. अजून तीन विषय बाकी आहेत. याची कसर त्यात काढेल. नेहमी आजच उद्यावर ढकलले. परवा माझा मुंबईचा मित्र आलेला. तरी अभ्यास झाला असता. पण नंतर करून म्हणून राहिलं. त्याला काल दुपारच्या साडेतीनच्या ‘डेक्कन’ने बसवले. त्यानंतर साडेचारला मी घरी आलो. जरावेळ विश्रांती घेऊ म्हणून जरा झोपलो. तर साडेसातला जाग आली.

आवरून पुस्तक उघडल. दोन चार ओळी वाचल्या नसतील तर मैत्रिणीचा फोन. जायचे का बाहेर जेवायला म्हणून. तिला म्हटलं उद्या परीक्षा आहे. थोडं तरी काही तरी अभ्यास करतो. आपण नंतर जाऊयात. तिला राग आलेला. मला म्हटली उद्या घरी ये. मी हो ला हो केल. पुस्तकात डोक घालून कुठे होतो म्हणून पहात होतो तेवढ्यात मित्राचा फोन. त्याच्या गप्पात वीस पंचवीस मिनिटे गेली. मग मूड गेलेला अभ्यासाचा. म्हटलं जरा वेळ गाणी ऐकू. म्हणून संगणक सुरु केला. आणि गाणी लावली तर, एक मित्र ऑनलाईन आलेला. त्याच्याशी गप्पा मारता मारता साडेआठ वाजून गेले. त्याला म्हटलं जेवण करून येतो. जेवण करून यायला दहा वाजले. कपडे धुण्यासाठी भिजवले. पण मुडच येईना अभ्यासाचा. रात्री झोप देखील येईना. शेवटी तीन वाजता झोपलो. सकाळी दहा वाजले उठायला. तशी माझी सुट्टीच्या दिवशी (दुपारी) चारच्या पुढे पहाट होते. पण आज त्यामानाने लवकर उठलो.

आवरण्यात साडेअकरा वाजले. दुपारी पुन्हा खूप झोप यायला लागली. एक डुलकी मारू म्हटली तर पावणे दोनला जाग आली. परीक्षेची वेळ अडीचची. अडीच ते साडेपाच. आवरून गेलो. माझ्या लहान बहिण भावाच्या शाळेत परीक्षा होती. तसे ते सेंटर मीच निवडलेल. जातांना पेन्सिल, शार्पनर, पेन, पट्टी अस सगळ् घेऊन गेलेलो. प्रश्नपत्रिका पाहून भीती वाटण्यासारखे काहीच नव्हते. कारण, अवघड किंवा सोपा ठरवणे तेव्हा शक्य असते जेव्हा आपल्याला काय येते आणि काय नाही हे आपल्याला माहिती असेल. इथं विषयाचे नाव टाकण्यापासून बोंब. पहिल्या अर्ध्या तासात एक ‘विभूती’ पेपर देऊन गेले. मग थोडा जीवात जीव आला. म्हटलं भोपळा मेंबर मी एकटाच नाही इथे. जरा वर्गात नजर टाकली तर मी सोडून बाकी सर्वजण ‘टेन्शन’मध्ये.

अर्ध्या तासाच्या अंतराने एक एक पेपर टाकून जात होते. आणि माझ्या इकडे गोळ्या सुरु होत्या. यार इतक्या थापा मारल्या ना. माहित नसलेल्या गोष्टीवर देखील मी किती गोळ्या टाकू शकतो याची कल्पना आली. दुखणे फक्त हे होते की, माझी बोटे अर्ध्याच तासात हार मानलेली होती. तरी माझ्या हातातली एके फोर्टी सेव्हन चालूच. हाहा! मी सोडून कोणीच पुरवणी जोडली नाही. पुरवणीवर जाऊ नका. कारण, शंभर पैकी साठ मार्कांच्या गोळ्या आहेत. आणि उरलेल्या चाळीस मार्कांच्या प्रश्नाचे गोळ्या मारणे कठीण होते. त्यात मी दाराजवळच्या पहिल्याच बेंचवर. बहुतेक माझा इतिहास पाहून मला त्रास नको अशा विचाराने मला दिली असावा तो बेंच.

त्यात दुपारी जेवण ना झाल्यामुळे मी पूर्ण गळून गेलेलो. आणि त्या वातावरणाने इतकं घाम घाम झालेलं. शेवटी नको नको झालेलं. हात दुखायला लागलेला. आणि घामामुळे तिथे बसण्याची देखील इच्छा राहिली नव्हती. पाच वाजता बाहेर पावसाची सर् पाहिली. म्हटलं चला निदान आज भिजण्याची इच्छा पूर्ण होईल. भरभर पेपर चेक केला. आणि परीक्षाकडे देवून टाकला. बाहेर आल्यावर इतकं मस्त ना. पण माझा मूड गेलेला. कारण यार, हे सगळ् तिला मिळवण्यासाठी करतो आहे. आणि असा आळस केला तर कधीच पूर्ण होणार नाही माझ बीसीए. आणि ती मुख्य आहे. उद्या या विषयामुळे अडचणी नको यायला. काय यार, चूक झाली माझी. असो आता फार टाईमपास झाला आहे. मी आजपासूनच पुढच्या पेपरचा अभ्यास सुरु केला आहे. असो, आजचा पेपरमध्ये काही मिळाले तर तर आश्चर्य. आणि पास झालो तर प्रश्नपत्रिका तपासानार्याची परीक्षा घ्यावी लागेल.

Advertisements

3 thoughts on “भोपळा

 1. ब्लॉग माझा
  स्टार माझा वेब टीम
  स्पर्धेविषयी- नमस्कार मंडळी! ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या आयोजनाचं हे तिसरं वर्ष. पहिली
  ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा घेतल्यानंतरच्या काळात मराठी ब्लॉगॉस्फिअरमध्ये खूप गोष्टी घडल्यायत. मराठी ब्लॉगर्सच्या पुण्या-मुंबईत गाठी-भेटी झाल्या, पुण्यातल्या साहित्य संमेलनापूर्वी आयोजित ‘संमेलनपूर्व संमेलन’ या कार्यक्रमात मराठी ब्लॉग, ब्लॉगर्सबाबत
  गंभीर चर्चा झाली, मराठी ब्लॉगर्स मंडळी इंटरनेटवर एकत्र आली, वृत्तपत्रांनी, नियतकालिकांनी मराठी ब्लॉगॉस्फिअरची ठळक दखल घेतली. एकूणच मराठी ब्लॉगॉस्फिअर देशातल्या प्रादेशिक ब्लॉगॉस्फिअरमध्ये दखल घेण्यायोग्य ठरलंय. हीच मराठी ब्लॉगरशिप सेलिब्रेट करतोय ‘स्टार माझा’; ‘ब्लॉग माझा’ सिझन-३च्या रूपानं.
  विशेष म्हणजे यावेळी आपले परिक्षकही खास आहेत. ज्यात आहेत लीना मेहेंदळे ज्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तर आहेतच, पण संवेदनशील लेखिका आणि मराठी ब्लॉगरही आहेत. मराठीतल्या ‘साधना’ या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ आपले संपादकीय कौशल्य पणाला लावून तुमचे ब्लॉग तपासतील. तसंच, आयटी तज्ज्ञ माधव शिरवळकर हेही परिक्षक मंडळात आहेत.
  तेव्हा, मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक, ऑर्कुट किंवा ट्विटर पुरताच ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर ताजं लिहिलं असेल तर ठिकच नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.
  काय म्हणालात? बक्षिसाचं काय? अहो, बक्षीसे आहेतच की! पहिल्या तीन जणांना आणि उर्वरीत दहा जणांना उत्तेजनार्थ. आता काय बक्षीसं आहेत ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘स्टार माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट ‘स्टार माझा’वर!

  मराठी माझी, ब्लॉग माझा, स्टार माझा……………..शुभेच्छा!

  स्पर्धेचे स्वरूप-

  १. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)

  २. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.

  ३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, स्टार माझा बांधिल नसतील. तुमच्या एन्ट्रीज
  या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.

  ४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha3@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे. याशिवाय, तुमच्या ब्लॉगची लिंक द्यावी.

  ५. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.

  ६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.

  ७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१०. स्पर्धेचे निकाल ऑक्टोबर २०१०च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील. तसेच, संबंधित विजेत्यांना पत्र अथवा ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.

  ८. यानंतर ‘स्टार माझा’च्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.

  ९. स्पर्धेचे आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसे यासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार स्टार माझाकडे असतील.

  ११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग या माध्यमाचे महत्व जपावे. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s