Skip to content

इच्छा

ऑक्टोबर 11, 2010

इच्छा ही गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही. एक संपली की दुसरी, चालूच. लहानपण मला कधीच आवडले नाही. कारण कोणतीच इच्छा माझी लहानपणी पूर्ण झाली नाही. खेळणी माझ्या लहान भावाला. मी मागितली की, मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणून मला माझे आई वडील रागवायचे. तसे लहानपणी, सर्वच मला या ना त्या कारणाने रागवायचे. असो, मुंबईला आलो त्यावेळी ‘नेक्स्ट’मध्ये एक संगणक पहिला. आणि मला तो खूप आवडला. तो विकत घ्यायची इच्छा झालेली. तो मी दुपारी पहिला. आणि ताबडतोप वडिलांना फोन करून घेऊ का म्हणून परवानगी मागितली. त्यांनी हो म्हटल्यावर संध्याकाळी घेऊन घरी आलो. आता ती गोष्ट वेगळी की, तो विकत घेण्याची ताकद माझ्यात होती. ती माझी जीवनातील पहिली इच्छा, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्धा लाख मोजावे लागले.

महिना झाला नसेल, मग नुसता संगणकावर बसून बोर व्हायला लागले. मग नेट हवे. ती देखील इच्छा दोन तासाची. म्हणजे दोन तासापूर्वी इच्छा झाली. कोणत्या कंपनीचे डेटा कार्ड घ्यावे याचा शोध घेण्यात दोन तास गेले. रिलायन्स कंपनीच्या शोरूममध्ये जाऊन त्यांचे डेटा कार्ड खरेदी केले. बाकी कपडे, बूट यासारख्या छोट्या मोठ्या इच्छा तर सोडूनच द्या. पहिले की घेतले म्हणून समजा. म्हणजे मी उधळ्या वगैरे काही नाही. पण इच्छा झाली की घेतले अस झालेलं. पुण्यात आलो. त्यावेळी असंच एकदा सकाळी बाईक घेण्याची इच्छा झाली. दिवसभर विचार करून सुद्धा काही ठरेना कोणती घ्यावी ते. संध्याकाळी घरी आलो तर, माझ्या मैत्रिणीचा तीच्या गाडीवरून अपघात झालेला. हॉस्पिटलात गेलो तर पायाला मार लागलेला. एक बाजूचा डोळा पार काळा निळा झालेला. तिचे ते सुंदर रूप पाहून बाईकची इच्छाच मरून गेली. एक्स्टर्नल हार्ड डिस्क, स्कॅनर आणि घरातील सटरफटर सामान बद्दल न बोललेल बर.

एकदा जुन्या कंपनीत काम करीत असतांना, नेटवर एक मोबाईलची जाहिरात पाहिली. मग मोबाईलची इच्छा झाली. मी जो आता मोबाईल वापरतो आहे ना नोकियाचा ३६०० स्लाईड. तो आवडला. सुरवातीला माझ्या बंधुराजांना फोन करून नवीन मोबाईल घेण्याचा संकल्प सांगितला. त्याच्या होकारनंतर, वडिलांचा होकार घेतला. दुपारीच खरेदी करण्याची खूप इच्छा झालेली. पण स्वतःहूनच स्वतःवर ताबा ठेवला. पण रात्री सातच्या सुमारास फारच इच्छा वाढली. मग बिगबझार मधून घेऊन घरी आलो. त्यानंतर जवळपास दोन वर्षापूर्वी, स्वतःच घर असावं अशी इच्छा झाली. कारण जवळपास दोन वर्षापासून आधी मावशीकडे नंतर काकाकडे रहात होतो. सहा महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर एक चारशे स्वेअर फुटचे दोन खोल्यांचे घर घेतले. असो, आई वडिलांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते. माझी पंचवीस टक्के रक्कम आणि उरलेली पंच्याहत्तर टक्के त्यांची रक्कम.

पण इच्छा इथे संपेना. मग अजून एक हाय स्पीडचे डेटाकार्ड घेण्याची इच्छा झाली. मग ते देखील तासाभरात. माझ्या गावातील संगणकासाठी एक युपीएस घेतला. आठ-दहा दिवसापूर्वी मोबाईल घ्यायची इच्छा झाली. पण चर्चा केल्यावर माझे मित्रांनी एखादी बाईक घेण्याचा सल्ला दिला. पुणेस्टेशनच्या जवळ असलेल्या एप्पलच्या शोरूममध्ये ‘आयमॅक’ पहिला. मग तो घ्यावा वाटला. त्याची किंमत सव्वा लाख आहे. मग थोडा शांत झालो. पण काल सोनीच्या शोरूममध्ये पीएसथ्री पाहून तो घेण्याची इच्छा झाली. घरी येतांना माझ्या इच्छांचा इतिहास थोडा रिवाईंड केला. मग मी किती खुशाल चेंडू झालो आहे याची खात्री पटली. असो, इच्छा ही न संपणारी गोष्ट आहे.

One Comment leave one →
  1. ngadre permalink
    ऑक्टोबर 11, 2010 5:26 सकाळी

    Good one..

    Uttam..

    So truly written…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 186 other followers

%d bloggers like this: