झोप

आज कामाच्या दिवशी साडेनऊला उठण्याचा भीम पराक्रम केला. त्यामुळे कंपनीची लेट मोर्निंगची बस देखील चुकली. आता रात्री तीन वाजता झोपल्यावर लवकर कशी जाग येणार? मला खरंच काहीच सुचेनासे झाले आहे. गेल्या महिन्यापासून मला तीन वाजेच्या आत झोपच येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर खूप आळस येतो. आणि आता माझा चेहरा काळवंडून गेला आहे. ओठ देखील तसेच. दिवसा मी झोपत नाही. तरी सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत झोपच येत नाही.

दोन दिवसांपूर्वी विचार केला त्यावेळी अस वाटलं की, शारीरिक त्रास काहीच नसल्याने अस होत असेल. म्हणून शंभर जोरचे दोनशेवर नेले. तरी सुद्धा झोप येईना. मुळात त्रास वाटत नव्हता. काल चिंचवड मधून निगडी, निगडीतून पुनः चिंचवड. मग पुन्हा निगडी. आणि तिथून चिंचवड स्टेशन आणि तिथून पुन्हा घरी. असा जवळपास दहा किमीचा पायी प्रवास केला. घरी आल्यावर पाय दुखायला लागले. पण तरीही झोप आली नाही. आज बसने येतांना दिसेल ‘तिला’ पाहत आलो. असो, पण कोणीच छान वाटले नाही. आज मी तिच्या डेस्ककडे बिलकुल पाहिलेले नाही. पण कॅन्टीनमध्ये तिला पहिले. म्हणजे तिची लक्ष नसतांना.

आज देखील खूप छान दिसते आहे. यार, काय चालले आहे. काहीच सुचत नाही आहे. माझ्या मित्राशी बोललो या विषयावर. त्याचे आपले नेहमीचेच. मला म्हणाला तू तिच्यात खूप जास्त इंव्होल्व झाला आहेस. म्हणून अस घडत आहे. आणि तेच आपले जुने ती मला मिळणे कसे शक्य नाही यावर लेक्चर. मला माझ्या कंपनीत तीन चांगले मित्र आहेत. एक आहे तो तिचा नाद सोड म्हणून नेहमी बोलत असतो. दुसरा जो हो आणि नाही दोन्ही बोलतो. म्हणजे दोन्ही बाजूच्या शक्यता वर्तवतो. आणि तिसरा जो मला पाठींबा देतो. मला वाटलेलं की मी कोणत्याच मुलीकडे पाहत नाही म्हणून मला ती छान वाटते. म्हणून आज खूप मुलींना पाहिलेलं. पण कोणीच छान वाटेना.

आता माझ्या मित्राशी फोनवर जवळपास तासभर या विषयावर बोललो. त्याने बर्यापैकी समाधान केले. मला म्हणाला, तुझ्या इच्छा वाढत आहेत. आणि त्यामुळे तुला समाधान मिळत नाही. आणि त्यामुळे झोप येत नाही. यावर उपाय काय बोललो तर म्हटला, जे आहे त्यात समाधान मानायचे. असो, आता ते कसे करायचे हे मात्र नाही सांगितले. काल रात्री झोप येत नाही म्हणून वडिलांनी सांगितलेला जपाच्या पंधरा माळा केल्या. आज ती खुश आहे. पण मला खूप तिला पाहण्याची इच्छा होते आहे. काय करू? मला त्रास द्यायचा तिला. झोपेच काय करावे तेच कळेनास झाल आहे. आज झोपेच्या गोळ्याचा उपाय करून पाहतो.

Advertisements

9 thoughts on “झोप

 1. हेमंत,
  झोपेच्या गोळ्या वगैरे घेऊ नकोस डॉक्टरांना विचारल्याशिवाय!
  आधी एखादं पुस्तक वाचायचा प्रयत्न कर..लगेच झोप येईल…
  नाही जमलं तर डॉक्टरांकडे जा!

 2. जर हा झोपेचा प्रॉब्लेम अप्सरेच्या आधीपासून असेल तर कदाचित तुला इतर काहीतरी प्रॉब्लेम असेल. ते चेक करून घे..

  आत्यंतिक अस्वस्थता, रात्री झोप न येणे, रात्रभर झोप न येणे, डोक्यात जडपणा, सतत न थांबवता येणारे विचार, ही सर्व प्रेम-लेव्हल २ ची लक्षणं आहेत आणि ती इतकी नॉर्मल आहेत की क्या कहने..झोपेच्या गोळ्यांनी ती आणखी खराब होतील..सुधारणार नाहीत.

  याचा अर्थ आता तू खूपच सिरीयस झाला आहेस. आणि गोड हुरहूर जाऊन जाड काळा घट्ट ढग तुला घेरून टाकतोय. तुला ती अधिक अधिक हवीशी होते आहे आणि त्याचमुळे ती न मिळण्याची भीती आता वास्तव वाटायला लागली आहे. तू आता पुरुषार्थ म्हणा किंवा अस्तित्व म्हणा किंवा प्रतिष्ठा म्हणा, त्यावर अवलंबून ठेवली आहेस. म्हणून हे फीलिंग.

  ही वेळ म्हणजे आता काय ते ठरवण्याची वेळ. यु मस्ट स्टेप अप टू स्पीक टू हर. नाहीतर खूप त्रास होईल तुला..

  एकाच सांगतो..आत्ता पटणार नाही..पण….विश्वास ठेव…ती तुझी होऊ शकते..आणि चुकून नाहीच झाली तरी पुढे इतर कोणीतरी खूप छान काही काही घेऊन आयुष्यात येऊ शकतं.

  बस्स..इतकंच..

 3. Hi Hemant
  I fully agree with Nachiket.Now is the time to open your heart to her .First , take her to a restraunt on a sunday for coffe. In the next meeting , again over a cup of coffee , tell her what you feel about her .If she shows any inclination towards liking you then go ahead .If she doesnt , then face it like a man and forget her Life is full of opportunities and chances .
  All the best
  JKBhagwat

 4. हेमंत,

  What Nachiket and Jaywant saying is very true…

  You should start expressing ur feelings to her.

  आणि तु आत्ताच ‘मी तिला सतावत असतो’ वैगरे बोलत राहीलास तर सगळं मुसळ केरात.
  U should atleast think of growing Ur friendship. तु आत्ता जर व्यवस्थित बोलला नाहीस तर तुला तो त्रास होइल.

  find out her Likes-Dislikes.Find ur common interests and proceed to a ‘Good Friendship’ atleast…

  आणखी एक ओठ काळवंडले असतील, डोळे तांबारले असतील तर मुलींना वाटते की, मुलगा सिगारेट ओढतो.
  रात्र तिचा विचार करत जागवण्यापेक्षा पहाटे तिचा विचार करत jogging कर. U will enjoy the whole day.

  शुभेच्छा,

  —प्रिया.

 5. आणि एक झोपेच्या गोळ्या हा ‘प्रेम- लेव्हल २’ चा उपाय नक्कीच नाही.

  —प्रिया.

 6. काय हे हेमंत ……… लवकर तिला विचारून टाक ……… कारण आजकालच्या मुली सरळ हो की नाही सांगून टाकतात ………जर तिचे नक्कीच तुज़वर प्रेम असेल तर ………. ती तुज़ा propose ची वाट पाहत असणार ……… असेचा बघने चालू राहीले ना ……… कोणीतरी दुसरया एेवोन तिला घेवोन जाईल ………. प्रेम वक्त्य केल्याशिवाय समोरच्याला कळणार तरी कसे ????? की समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतो आहे ते?

  so लवकर काय ती पावले उचल ……….नाहीतेर् संधी ची वाट पाहता पाहता ती तुज़यापासून खूप दूर गेलेली असेल.

  सगळ्याचा मूलीना स्वाताच्या भावना वक्त्या करता येत नाहीत ……… म्हणून की काय लोकांना त्या खूप आकडू वाटतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s