काय करू काय नाही

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते.

दोन दिवसांपूर्वी मी घरी येत असतांना एक मुलगा रस्त्याच्या कडेला मुलीशी काहीतरी बोलतांना पहिला. तो बाईकवर आणि ती घराच्या लोखंडी गेटवर एक हात टाकून उभी होती. तो मुलगा काय म्हटला ते नाही कळल. पण ती मुलगी त्याला म्हणत होती की, आपल्या दोघांच्या बऱ्याच गोष्टी, चालीरीती वेगळ्या आहेत. त्यामुळे शक्य नाही. आता मी हे जवळून जात असतांना ऐकले. त्या मुलीकडे मागे वळून पहिले तर तिला चेहऱ्यावरून काहीच वाटत नव्हते. आणि तो हेल्मेटवीर देखील जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात.

यार, मला नाही हे शक्य. मी नाही विसरू शकत तिला. ती जर अस म्हटली तर.. मी एक ‘नकार’ पचवलेला आहे. त्या मुलीचा होकार असतांना, तीच्या कोणीतरी काका मामाच्या प्रतापामुळे तो नकार झालेला. आता त्या स्थळाबद्दल, म्हणजे त्या मुलीबद्दल ‘एक छान मुलगी’ यापलीकडे काहीच वाटले नव्हते मला. पण ही ‘अप्सरा’ पाहून माझ सगळ् बदललं आहे. आणि ती सोडून कोणीच आपले वाटत नाही. ती सोडून दुसरा विचार येत नाही. मी खूप विचार करतो. पण सगळ् शेवटी फूस. मला खरंच सुचत नाही काहीही. दोन महिन्यांच्या ओळखीवर कसं कोणी आयुष्याचा निर्णय करू शकते. मला तिची माहिती आहे. पण तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे? काहीच नाही. माझा स्वभाव, माझे बोलणे. मी नेमका कसा आहे हे तिला कुठे काय माहिती?

आणि अस डायरेक्ट प्रपोज म्हटल्यावर होकारापेक्षा नकाराचीच भीती वाटते मला. म्हणजे ती करेलच अस नाही. पण अस घडायला खूप चान्सेस आहेत. बर तिच्याशी ओळख वाढवायची इच्छा आहे. पण तिची सीट बदलल्यापासून तेही शक्य नाही. तीचा तो मित्र, आता तीच्या जुन्या जागेवर बसतो. एका भल्या मोठ्या बोक्याच्या फोटोची प्रिंट आउट काढून डेस्कवर लावली आहे. काय कोणाला काय आवडते ना! तिला सांगायला काहीच हरकत नाही. उशीर होण्यापेक्षा हे जास्त चांगल. पण अशा गोष्टीमुळे, तिला मी आवडत असेल तर ती खुश नाहीतर नाराज होईल. तिला नाराज करून मी माझ मन मोकळ करण्यात काहीच फायदा नाही. माझ मन मोकळ झालं की, निदान झोप तरी येईल रात्रीची.

पण तीच्या मानसिक त्रासाचे काय? मी ज्या ज्या वेळी दिसेल तिला, त्या त्या वेळी माझा तो प्रपोज तिला आठवेल. आणि समजा ती काहीच बोलली नाही तर, तीच्या मनात ते राहिलं. आणि तीच्या ‘मस्तीखोर’ स्वभावावर त्याचा परिणाम होईल. म्हणजे मी जेवढे तिला पहिले आहे. त्यावरून ती प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करते अस मला वाटते म्हणून बोललो. कारण, परवा मी तिला पिंग वगैरे नाही केल तर तिने काल गुड मॉर्निंगचा मेल पाठवला. म्हणजे तिला छोटी छोटी गोष्ट देखील ध्यानात येते. मला ती आता जशी आहे ना, अगदी तशी हवी आहे. मी जी अपेक्षा माझ्या जोडीदाराबद्दल केली होती. त्यापेक्षा हजार पटीने छान आहे ही. मी तीच्या समोर नसलो की, तिला माझा विषय इतका आठवणार नाही. आणि जर तीच हवी असेल तरी निदान मला तीच्या जवळपास तरी राहावे लागेल. फक्त आता ते कसं करू हे कळत नाही आहे. मी तिला माझ्या मनातले नक्की सांगेन. पण कसं सांगू हेच कळत नाही आहे.

Advertisements

4 thoughts on “काय करू काय नाही

 1. Don’t worry at all.
  Now I know very well whats exactly going on in your mind.

  Obviously,if she has not got to know you yet,she will feel offended and awkward. You are right.

  On the other hand, you have to break the ice as soon as possible.

  First try to display openness,jollyness,even if you don’t have it, try to build it.

  Get rid of those headaches, microsleeps at office as mentioned in some comments,lethargic look if any.

  Show great sense of humour. This single most important thing will help you to assure that right comfortable atmosphere is built between you and her so that any proposal will be atleast ‘listenable without bitterness’

  Once girl is close friend of you,she is not really repelled by a proposal. Even though she is not ready for it.

  Well, with lot of quality jokes, smiling fresh face and enegry she will start ENJOYING your company. key to know is to make her laugh from within mind everytime she is around you.

  It’s a display afterall, just like marketing dear..so be sharply dressed, be young at heart, make yourself felt around.

  Ask her out with you to nearby places. Not necessarily coffee. Isnt there any bhelwala,panipuri which you know,will surely tickle her tastebuds? Recommend it to her and take her for feast. Make her laugh n be happy when she’s with you.

  In one month situation will smoothly arrive where you can talk to her about anything including ‘will you be mine?’

  You need to build up and show energy dear.

  Sorry for unsolicited long advice.

 2. Nachiket,
  I really admire the way you are counselling him. Hemant must be feeling very supported by your understanding comments.
  Hemant, don’t be so nervous. Go ahead and increase the communication. Even, girls are not that short minded to feel offended or awkward. At least try to build up that much openness amongst yourself and then propose her.

  But, don’t take too much time,

  Our many best wishes,

 3. Hi Hemant,

  “दोन महिन्यांच्या ओळखीवर कसं कोणी आयुष्याचा निर्णय करू शकते. मला तिची माहिती आहे. पण तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे? काहीच नाही. माझा स्वभाव, माझे बोलणे. मी नेमका कसा आहे हे तिला कुठे काय माहिती?”

  हेच तर मी तुला कधीपासून सांगत होती, मुलं जशी बाहेरून माहिती काढतात तशी मुली काढतीलच असे नाही. मग तिला तुझी माहिती(including family and friends too), तुझा स्वभाव, तुझ्या तिच्याबद्द्लच्या भावना सगळं कसे कळणार…

  हे सगळं कळण्यासाठी तिच्याकडे तुझ्या मैत्रीचाच मार्ग उपलब्ध आहे. आणि तू मैत्री स्वतः वाढवायचं सोडुन “तिला मी आवडेन की नाही, ती मला नकार नाही ना देणार” या सगळ्या विचारात अडकून पडलायस…

  ह्या सा-याचा विचार तिलाही करु दे की, Atleast give her a chance to think of you.

  आणि म्हणून पुन्हा सांगतेय, आधी चांगली मैत्री होउ दे आणि तिलाही विचार करायला थोडा वाव मिळू दे.

  नचिकेत सांगताहेत ते सगळं बरोबरच आहे.

  बाकी आमच्या शुभेच्छा आहेतच आणि असतील.

  —प्रिया.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s