मन, मेंदू आणि मी

मी सकाळी उठतो. उशीर झालेला असतो. मी पटापट आवरण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मन मात्र भलतीकडेच. मी दाढी करायला आरशात पाहतो. आणि मन आरशात तिला. ‘बस’ला उशीर होत असतो. आणि मन मात्र तिला कोणता ड्रेस आवडेल ते सांगत असते. पण लगेच मेंदू हटकतो. मी आवरून धावपळ करीत बससाठी स्टॉपवर जातो. तिथे ‘परीवहिनी’ येतात. मी ‘परीवहिनी’कडे पाहतो त्याही हसून माझ्याकडे. पण मन तीच्या स्वप्नात. तिथेही तीच असल्याचा भास होतो. मी हरखून पहात असतो. बसमध्ये बसतो. मोबाईलचे हेडफोन कानाला लावून गाणी सुरु करतो. मन प्रत्येक गाण्यात तिचाच भास करते. मला तिची आठवण येत असते. कंपनीत उतरतांना मन प्रश्न विचारते ‘ती आजारी तर नाही ना? मग ती का नसेल आली दोन दिवस? की घरी गेली’. मेंदू उत्तरतो ‘तुला काय गरज नसत्या चौकशा’. मी खिन्नपणे इमारतीच्या जिन्यातून चाललेलो असतो.

मन ‘ती आज यायला हवी. देवा ती आज येऊ दे’. मेंदू ‘कसं शक्य आहे? हा काय चित्रपट आहे का? की मागितले आणि मिळाले?’. मी डेस्कवर येतो. मन ‘तीच्या डेस्ककडे एकदा तरी पहा ती आली असेल’ असे म्हणत माझ्या मागे लागले असते. पण मेंदू ‘तू वेडा झालास का? काल ती समजून तू तीच्या मैत्रिणीकडे पहात होतास? मुर्खपणा करू नकोस’. मी मित्राला फोन लावतो. तो कॅन्टीनमध्ये असतो. त्याला येतोच म्हणत मी डेस्कवरून उठतो आणि रडक्या चेहऱ्याने कॅन्टीनमध्ये जातो. कॅन्टीनमध्ये पाऊल ठेवताच मन सगळीकडे तीचा शोध घ्यायला सुरवात करते. पण तिथे ती नसते. मित्रासोबत नाश्ता करतांना तू का नाराज आहेस असे विचारतो. आणि मन त्याच्या वेदना सांगायला सुरवात करते.

मी डेस्कवर येतो. मेंदू बोलतो ‘मेल चेक कर. काही काम आहे का ते बघ’. आणि मन ‘कम्युनिकेटरवर ती ऑनलाईन आहे का ते आधी पहा’. मी कम्युनिकेटर पाहतो. आणि अचंबित होवून तीच्या डेस्ककडे पाहतो. ती आलेली असते. मन नाचू लागते. मेंदू काम करायचे बंद होतो. माझा रडका चेहरा बदलून हसरा बनतो. सगळ उत्साही वाटायला लागते. मी पिंग करून तिला ‘गुड मॉर्निंग’ करतो. मी पिंग केल्यावर ती तिचे स्टेटस ‘बिझी’ करते. मन खुश असते. पण मेंदू मला ‘पहा तिला तुझ्याशी बोलायचे नव्हत म्हणून बिझी स्टेटस केल. बंद कर पिंग करायचे’. मन मला तिला विचार का नाही आली दोन दिवस म्हणून विचार असे बोलते. मी टाईप देखील करतो. पण मेंदू पुन्हा ‘ विसरलास का? ती एकदा मी बिझी अस बोलायला तू भाग पाडलस. नको पिंग करू. डिलीट कर ते’. मी निमुटपणे लिहिलेलं डिलीट करतो. मन उदास होत. पुन्हा वेड्यासारखे तीच्या डेस्ककडे मी पहात रहातो.

थोड्याच वेळात तीचा एक मेल येतो. माझा चेहरा अजूनच खुलतो. मन पुन्हा नाचायला सुरवात करते. पण मेंदू मध्येच आम्हा दोघांना हटकतो. आणि बोलतो ‘जरा टू मध्ये बघ. किती भाऊगर्दी आहे ती’. मी पाहतो आणि शांत बसतो. पण मन मात्र तिच्यात धुंद झाले असते. मी तीच्या दर्शनासाठी आतुर झालो असतो. आणि तो क्षण येतो. ती काही कामासाठी चाललेली असते. आणि मला ती दिसते. मन तृप्त होते. डोळे सुखावून जातात. पण हृदयात सेकंदाला हजार ठोके पडायला लागतात. मग मनाला आणि मला मेंदू ठिकाणावर आणतो. मी दुपारी कॅन्टीनमध्ये जेवायला जातो. खर तर मनाची इच्छा असते. जेवण फक्त निमित्त. पण ती आलेली नसते तिथे. मी ताट घेऊन बसतो. हात धुवून येतांना मला ती दिसते. आणि मन पुन्हा खुश होते. ती तीच्या ग्रुप सोबत जेवायला बसते. मन जेवतांना तिला पाहण्याची इच्छा करते. आणि मी मनाच्या इच्छा पूर्ण करीत रहातो. मन त्या देवीचे डोळेभरून दर्शन घेत असते. मी सुखावत असतो. पण मेंदू सावध करीत असतो. जेवतांना मित्र बोलत असतात. आणि मी मान डोलवत असतो. पण लक्ष सगळे तीच्यात.

मेंदू ती हसतांना ‘तो तीचा दोस्त जरा अति करतो आहे अस वाटत नाही तुला?’ म्हणून मनात खळबळ माजवून टाकतो. पण मन तिच्यात पूर्ण बुडून गेले असते. जेवण झाल्यावर मनाच्या इच्छा वाढायला लागतात. ‘जा तिच्याशी बोल’ अस मन सांगू लागते. मी डेस्कवरून उठतो. आणि तीच्या डेस्ककडे पाहतो. पण तीच्या डेस्कवर कोणीतरी टपकलेले असते. मी पुन्हा डेस्कवर बसतो. मग मेंदू माझ्यावर राज्य करायला सुरवात करतो. नाही नाही त्या शंका उत्पन करायला लागतो. पण मन नाही काही ऐकत. आणि मी सुद्धा. जाण्याची वेळ येते. मन पुन्हा ‘तिला पिंग करून बाय बोल’. मी कम्युनिकेटरवर पाहतो. तर ‘डू नॉट डिस्टर्ब’ची पाटी लागलेली असते. मेंदू मला ‘तुझ्यासाठी आहे तो मेसेज’. मी खिन्न होतो. पण मन ऐकत नाही. मला म्हणते ‘कदाचित तिला तू तीच्या डेस्कवर जाऊन बाय केलेलं आवडेल. उठ आणि जा तीच्या डेस्ककडे’. मी तीच्या डेस्ककडे जायला निघतो. पण मेंदू ‘तुला खरंच काही कळत नाही. ती कामात आणि तू वेड्यासारखा गेलास तर ती चपलेने मारेल’.

मी माझा मार्ग बदलतो. आणि वॉशरूम मध्ये जातो. माझा फडतूस चेहरा चांगला करण्याचा प्रयत्न करतो. पण मन सारखं सारखं ‘तिला बाय बोल’ म्हणून मागे लागलेलं असते. पुन्हा मी हिम्मत करतो. वॉशरूम मधून निघून मी पुन्हा तीच्या डेस्ककडे जात असतो. तीचा चेहरा पहातच मेंदू ‘नको रे, तिला त्रास नको देवू’. मग मी आणि मन दोघेही खिन्न होतो. स्वाप केल्यावर पुन: एकदा इच्छा अनावर होते. डोळ्याच्या कडा पाणावतात. पण मेंदू ‘वेळ नाही. आणि ती तरी कधी तुला बाय बोलली? उगाचंच कशाला कोणाच्या गळ्यात पडायचे’. मग तिथून घरी येईपर्यंत मन आणि मेंदू दोघेही खूप भांडतात. जय कोणाचाच होत नाही. मीच उदास होवून जातो. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी बोलायचे ठरवतो. पण स्वप्नात ती येते. आणि आणखीन इच्छा वाढवून जाते. मी तडफडत रहातो. मन उदास आणि मेंदू हजारो प्रश्न निर्माण करीत रहाते.

Advertisements

3 thoughts on “मन, मेंदू आणि मी

 1. हेमंत,

  इतक्या उशिरा कमेंट करतेय म्हणुन Sorry.

  ती खरोखर Busy असते की नाही माहिती नाही, पण Communicator वर Status ‘Busy’ केल्याने येणार्‍या message साठी Popup Blink येत नाही, जेणेकरुन आपण ज्यांच्याशी बोलतोय त्यांच्याशी निवांत बोलता येतं (दुसर्‍यांचे लक्ष वेधून न घेता)…

  त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. आणि तिच्याशी बोलत रहा…

  डोक्याला जास्त ताण दिल्याने डोके दुखतं. बाकी Post खरंच मस्त(असंच युद्ध असते मन आणि मेंदुचं)…

  —प्रिया.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s