सीमोल्लंघन

नाक भलतंच जाम झालं आहे. खर तर इथून घरी जातांनाच झालं होते. असो, खूप दिवसांनी, नाही जवळपास एका वर्षांनी ‘तीच्या’ सोबत होतो. सगळे जुने आठवले. तिची स्टेशनवर वाट पहात होतो. रात्री दहाची वेळ. दहा दहाला येते बोललेली. पण नेहमीप्रमाणे ती उशिरा नखरे करीत, नाजुकशी चालतांना नागमोडी वळणे घेत आली. एक वर्ष आधी जशी होती अगदी तशीच. तिची ती धडधड, तीचा तो आवाज. जुन्या कंपनीत असतांना नेहमी आम्ही सोबत जायचो. रोजचं हेच ठरलेलं. ती मला नेहमी पुणे स्टेशनला ‘ड्रॉप’ करायची. तसे आमची ‘अमर प्रेम कहाणी’ मुंबईत देखील होती. मुंबईत तर तीच तर होती सोबत. निम्मा दिवस तिच्याच सोबत गेलेत. पण पुण्यात आलो तर वेगळे. तिची चाल, नखरे वेगळे.

काहीही असो. माझ्या जीवनातील खूप मोठा काळ ‘तीच्या’सोबत गेला आहे. तिच्यामुळेच कदाचित माझा हा स्वभाव असा झाला. किती अनुभव दिले मला तिने. मुख्य म्हणजे ‘वेळच महत्व’ कळले. ती दिसताच माझा चेहरा खुलायचा. तिच्यासोबत असतांना सगळ् कसं छान वाटायचे. ‘हवा हवाई’ आहे ती. तिचे ते मध्येच काहीही कारण नसतांना थांबणे. किंवा घाई असतांनाच मला उशीर करायची. आणि कितीही समजावले तरी ती निघायची नाही. कधी कधी तर रुसून यायचीच नाही. त्यावेळी मात्र जाम पंचाईत व्हायची. एकदा तर तीला म्हशींनी धक्का देवून पाडलेले. ती इतकी नाजूक. किती मोठा अपघात झालेला. इतरांसारख कधीच नाही. तरीही पुन्हा दुसऱ्या दिवशी आलेली. आणि पालखी/दिंडी असो. त्यावेळी वेळेवर मला घरी पोहचवणार.  सगळे रस्ते जाम. पण ही मात्र वेळेत. पण नाही त्यावेळी, तस् तासभर यायला उशीर. पावसाळ्यात अस नेहमी करायची. पण पावसात भिजणारी ती ‘सुंदरी’ पाहून, माझेही मन घसरायचे. आणि मी देखील तिच्यसोबत पावसाचा आनंद लुटायचो.

काल आम्ही दोघे सोबत असतांना देखील पाऊस पडतो अस वाटलेलं. किती मन दाटून आलेल माझ. आणि झालेला बदलही जाणवला. जातांना तीचा तो ‘बाय’ येतांना तीचा तो ‘हाय’. किती नाजूक. पण कंपनी बदलली, आणि विरह. काल तिची खूप आठवण आली म्हणून मी मुद्दाम घरून येतांना पुणे स्टेशनला उतरून सहा रुपयांचे तिकीट काढले. आणि फलाट क्रमांक ‘पाच’वर तिची वाट पहात उभा होतो. दहा दहाची वेळ. आणि दहा:दहा झाले तरी ती नाही आलेली. पण मला तीच्या या नाखार्यांची. तिच्यासोबत घरी येत असतांना गेटवर उभा राहून मस्तपैकी हेडफोनचा आवाज वाढवून गाणी ऐकत घरी आलो.

तिच्यासोबत, म्हणजे ‘लोकल’सोबत असतांना भरभर येणारे वारे, ते ढगाळ वातावरण. आणि ती सुंदर रात्र. ‘अप्सरा’ची आठवणीने खुपंच बेचैन केले. मी काय करू, अप्सराची हसतांना पडणारी नाजुकशी खळी, तिचे ते मदहोश करणारे डोळे, आणि ते गुलाबी रंगाचे ओठ दुसरे काहीच सुचून देत नाहीत. नगरहून बसमध्ये बसलो. शिरूरला तीन मुली उतरल्या. त्यातली एक अगदी ‘अप्सरा’ आहे असा भास झालेला. तिचाच तो पांढरा रंगाचा ड्रेस. सेम केसांची स्टाईल. ती सर्व ठिकाणी माझ्या सोबत आहे अस वाटते. लोकलच्या गेटवर उभा राहून पळणारी झाडे, घरे पाहतांना सगळा इतिहास धावला. म्हणजे खर तर सगळ् तिनेच केल आहे. मी कुठे रहातो? मी काय काम करतो? माझ शिक्षण? माझ वय सुद्धा. आणि मी फक्त शाळेत परीक्षेत येणाऱ्या ‘एका वाक्यात उत्तरे द्या’ प्रश्नांप्रमाणे उत्तरे देत गेलो. मी तिला कधीच काहीच तीच्याबद्दल विचारले नाही. मुळात हिम्मत झाली नाही ही खरी गोष्ट. या भीतीने ‘सीमा’ आखून दिल्या. कधीच कुठलीच गोष्ट तिला नाही विचारली. काहीच केल नाही अस वाटत आहे आता.

किती सीमा आखून ठेवल्या मी स्वतःलाच? कदाचित यामुळे तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल का? कदाचित असेलही. तिच्याशी बोलतांना, ती समोर आल्यावर वाटणारी भीतीचे ‘दहन’ कसे करायचे? श्वासावर आणि हृदयावरील होणारे तिचे ‘वार’ कसे झेलायचे? मला या सगळया गोष्टींची सीमा आता मोडायची आहे. थोडक्यात सीमोल्लंघन करायचे आहे. काल प्रभू रामचंद्रांनी रावणाला जस केल ना. तस् मला माझ्या भीतीचे करायचे आहे. किती कमी वेळ उरला आहे. त्यात ती दोन दिवस का नाही आली हेच कळत नाही आहे. मनात ‘शंकासुराने’ धुमाकूळ घातला आहे. त्यात ती एक ‘तिचे लग्नाच तीच्या घरचे पहात असतील’ प्रतिक्रियेने आणखीनच झोप उडवून टाकली आहे.

मी आधी म्हटलेलं ना, मी एक वन बीएचकेसाठी पाहतो. तर माझ्याच इमारतीत एक. म्हणजे नवीनच आहे. अजून तरी विकला गेलेला नाही. बहुतेक बिल्डरचा वेगळा हेतू होता. आता त्याने तो विकायला काढलेला आहे. आताचा माझा चारशे स्क़ेफुटचा वनएचके आहे. आता देवून तो घेईल. म्हणजे तिला तो नवीन नाही आवडला तर, दुसरा घेईल. आणि अजून एक छोटेसे काम आहे, की या कंपनीला ‘शॉक’ द्यायचा आहे. म्हणजे सरळ वागतील. आणि मला इथेच ठेवण्यासाठी मला यांच्या पे रोल वर घेतील. सोडा तो मोठा प्रश्न नाही. मी आज ‘सीमोल्लंघन’ करतो. पण काय करू? तिला तीचा मोबाईल नंबर मागू? पण तिने ‘का? का?’ सुरु केल्यावर काय बोलू? काढतो काहीतरी ‘आयडिया’..

Advertisements

One thought on “सीमोल्लंघन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s