स्वप्नाहून सुंदर

आजचा दिवस काय बोलू? आज तिचे हसणे. आणि तीचा चेहरा आठवतो आहे फक्त. आज तिने मला स्वतःहून पिंग करून गुड मॉर्निंग केले. किती दिवसांपासून ही इच्छा होती. आणि आज दुपारी एक चॉकलेट सुद्धा दिले. आणि तिचे ते हसणे. तीचा तो गोड आवाज. अजून कानात तोच घुमतो आहे. आज ती काय दिसत होती म्हणून सांगू! बस्स!! आता तीच हवी फक्त. कालचा दिवसाबद्दल न बोललेलं बर. कारण, मी ‘हरलो’ असंच वाटायला लागलेलं. मला सर्वजण तिच्याशी बोलत रहा म्हणून सांगतात. म्हणून मी काल दुपारी तिला पिंग केल. आणि तिने तासाभराने रिप्लाय. मला खरंच नाही झालं सहन. डेस्कवरच गंगा यमुनेचा बांध फुटायला लागला होता. कसबस स्वतःवर कंट्रोल ठेवलं. पण मित्र आल्यावर नाही रोखता आला. पहिल्यांदा अस प्रोफेशन लाईफमध्ये घडलं. इमारतीच्या बाहेर गेल्यावर सगळ् मन मोकळ केल. रात्री देखील विचारांनी हैराण झालो होतो. आज सकाळी कशातच मूड नव्हता.

पण सकाळी सकाळी शेजारच्या ती ‘अ आ ई’ आली. नंतर बस स्टॉपवर मित्र भेटला. आणि नंतर ‘परीवहिनी’. त्यांच्याशी बोलल्यावर थोडा मूड आला. पण डेस्कवर गेल्यावर कालच खूप आठवत होते. मी रात्रभर ‘विचार’. नको आता त्या गोष्टी या ‘मम’ म्हणजे मन आणि मेंदूने खुपंच टोकाला नेली गोष्ट. त्यावर वेगळी ‘नोंद’ होईल. कंपनीत तिला पाहिल्यावर खुपंच छान वाटायला लागले होते. पण तिने एकदा तरी स्वतःहून पिंग करावं अशी खूप इच्छा होत होती. मी ठरवलेल. तिने दोन दिवसात किमान एकदा पिंग नाही केल तर कंपनीला ‘जय महाराष्ट्र’. पण तिला कसं कळत मनातले हेच कळत नाही. मी तिने पाठवलेला मेल पहात बसलेलो. आणि मनात तिचे विचार येत होते. आणि तेवढ्यात तिचे पिंग. मनात इच्छा यावी आणि ती ताबडतोप पूर्ण व्हावी, अगदी तस् झालं. मग मनच काय मी आणि मेंदू देखील आनंदित झालेला. रात्रभर काय काय विचार केला. आणि एक गोड सकाळ. त्यावर तिचे ते गोड हास्य.

आज ती खूप खुश. कलीजा खरंच खलास होवून जातो. तिला हसतांना पाहिले की मग दुसरे काहीच सुचत नाही. दुपारी मित्राने जेवायला जातांना खूप उशीर केला. आणि त्यात ती आजकाल नवीन कॅन्टीनमध्ये जेवायला येत नाही. म्हणून मलाही काही घाई नव्हती. दीडच्या सुमारास मी जिन्यातून कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी निघालो तर ती जिन्यात तीच्या ग्रुपसोबत होती. मी तिला पाहून परत वरती पळून जावस वाटत होते. कारण आज ती इतकी छान दिसत होती ना! माझी सगळी हिम्मत संपून गेलेली. मी मान घालून चाललेलो. तिने हाक मारली. किती गोड आवाज आहे यार तीचा. सुरवातीला विश्वासच बसेना. नंतर मान वर केल्यावर ती समोर चॉकलेटची पिशवी घेऊन. मला मी स्वप्नात असल्याचे वाटत होते. तिला म्हटलं ‘काय विशेष?’ तर काहीच बोलली नाही. मी तीच्या मित्राकडे पहात ‘आज वाढदिवस आहे का कुणाचा?’ पण तरीही ती काही नाही बोलली. तीचा दुसरा मित्र ज्याच्याशी माझी ओळख आहे तो बोलला की, ‘असंच’. तिला ‘थांक्स’ म्हणून तिथे सटकलो.

खर तर उड्या मारत गेलो कॅन्टीनमध्ये. किती छान आहे यार ती. बस तो क्षण! चॉकलेट एकदम मस्त होते. जेवण करून आल्यावर तिला पिंग करून थांक्स बोललो. असो ती खरंच बिझी असते. दुपारी पिंग केल्यावर सुरवात एकदम गोड होते. पण शेवट एकदम तिखट. यार तीचा स्वभाव तापट आहे. म्हणजे तीच्या बोलण्यावरून वाटत आहे. तसा मी देखील आहे. पण मी कधीच कोणती गोष्ट बोलून किंवा दाखवत नाही. न बोलता करतो. झाल्यावर समोरील व्यक्तीला आपोआप कळून जाते. असो, ती नंतर तीच्या मित्रासोबत जो आता तीच्या जुन्या डेस्कवर बसतो. तिथे आलेली. मन भरून तिला पहिले. खर तर ती माझ्या समोरून जस जशी चाललेली असते तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत असतात. मी वेड्यासारखा तिच्याकडे पहात असतो. जातांना बाय करायची खूप इच्छा झालेली. पण ‘डू नॉट डिस्टर्ब’ आठवलं. मग मनावर कंट्रोल करीत बाईकने घरी आलो. बस आता एखादया कंपनीचे ‘लव लेटर’ हवे. म्हणजे या कंपनीला मी ‘घटस्फोट’ची नोटीस देवून ‘शॉक’ देईल. आणि तसे आता लवकर होईल अस वाटत आहे. कारण आजच दोन मोठ्या कंपनीचे फोन आला होता की कधी ‘पाहण्याचा कार्यक्रम’ कधी करायचा म्हणून. घराच या शनिवारी निश्चित होईल. आजचा दिवस एकदम ‘स्वप्नाहून सुंदर’ होता.

Advertisements

3 thoughts on “स्वप्नाहून सुंदर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s