नो पिंग पॉंग

काय बोलू तेच समजत नाही आहे. म्हणजे अगदी, सुरवातीपासून हेच चालू आहे. असो, आता या सर्व गोष्टींचा कुठे तरी शेवट करावं अस वाटते. आज मी तिला हाय करून गुड मोर्निंग केल्यावर तिनेही हाय केले आणि नंतर ‘बाय’. पाहून ‘शॉक’ बसला. म्हणजे मला हेच नेमके कळल नाही, की तिने अस का केल. मी तिला रिप्लाय म्हणून प्रश्नचिन्ह टाकल. पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही. कदाचित कामात खूप बिझी असेल म्हणून? की मला टाळायचे होते म्हणून. साल, माझ्या डोळ्यातल्या धरणाचा बांध इतका का कच्चा झालाय कुणास ठाऊक. मग मी दुपारपर्यंत ते कम्युनिकेटर बंद केलेलं.

खर तर सगळ्या गोंधळाचे कारण ते ‘कम्युनिकेटर’ आहे. आता यापुढे कधी त्याची मदत घेणार नाही. पण वॉशरूममध्ये जातांना माझ्यासमोर. यार मी तिचाच विचार करीत चाललेलो. मग आलेला सगळा राग निघून गेला. काय करू? जेवणं नंतर पुन्हा सुरु केले. तिचाच विचार करीत बसलेलो त्यावेळी माझ्या डेस्क जवळून ती चाललेली. काय सांगू, किती दिवसांपासून इच्छा होती. ती माझ्या डेस्कजवळ थांबून हाय केल आणि गेली. हा पुन्हा एक ‘शॉक’ बसला. माझी गाणी ऐकण्याची इच्छाच बंद. धडधड खूपच वाढलेली. म्हणून मी बाहेर एक चक्कर मारावी म्हणून निघालो तर तिथेही जिन्यात दिसली. काय सांगू तो देखील गोड ‘शॉक’.

पण मला एक गोष्ट सारखी खटकते आहे. ती दोन दिवसांपासून खूपच नाराज वाटते आहे. म्हणजे हसते, पण ते समोरच्याला दाखवण्यासाठी. इतकी गोड मुलगी का नाराज? मला त्या कार्टून मित्रावर शंका येत आहे. कदाचित त्याने तिला प्रपोज वगैरे नाही ना केला. म्हणजे आधी म्हटलं ना, तो तिच्या जुन्या डेस्कवर बसतो. तो तिचा गावाचा आहे आणि जुना मित्र देखील आहे. छान दिसते दोघांची जोडी. असो, जगातील पहिला प्रेमी असेल मी ज्याला आपल्या आवडत्या मुलीची जोडी लावतो आहे असा. मला फक्त ती खुश हवी. उद्या जावून ती माझ्या सोबत नसेल तरी काही हरकत नाही. पण ती नाराज नको. मला मान्य आहे की, ती मला खूप आवडते. रोज तिचीच स्वप्न पडतात. मी तिला पहिल्यापासून दुसर्या कोणत्या गोष्टीत रसच घेतलेला नाही. पण तरीही! मला ती खुश हवी.

नाराज होवून माझ्या सोबत राहण्यापेक्षा एखाद्या दुसर्या सोबत आनंदी मला आवडेल. पण मला नेमक हेच समजत नाही आहे, की तिच्या नेमक मनात काय आहे? बर, तिच्याशी बोलायला तिच्या डेस्कवर जायची माझी हिम्मत होत नाही. आणि पिंग केल तर तिला वेळ नसतो. आणि आजच्या सकाळच्या प्रकारानंतर तिला पिंग करीत जाणे योग्य अस मला तरी योग्य वाटत नाही. मला तिला त्रास द्यायचा नाही. माझी प्रत्येक इच्छा आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. अगदी लहानात लहान पासून मोठ्यात मोठी पर्यंत. पण याचा अर्थ असा नाही की, माझी ही देखील इच्छा पूर्ण व्हायलाच हवी. काही हरकत नाही. आणि मी नाराज, उदास वगैरे काही नाही. फक्त थोडासा बोर झालो आहे. पण चिंता नसावी, थोडा वेळ लागेल पण मी माझ्या ‘बाल’मनाला नक्की समजावेल. तो बालीशपणा नाही करणार. आणि मी देखील काहीच वेडेपणा नाही करणार. तिला त्रास नाही देणार. आणि आतापासून तुम्हालाही. जर ती माझ्यासाठीच असेल, तर ती मला नक्की मिळेल. उगाचच सर्वांना मी यात इंव्होल्व केल. माझाच चुकल. क्षमा असावी. आणि मदतीसाठी खूप खूप आभार!

Advertisements

4 thoughts on “नो पिंग पॉंग

 1. mitra, aaj pahilinydach pratikriya det ahe.

  he bhag, vel nighun gelyvar radnyat kahi aarth nahi. je kahi karayacha ahe te aata. nusta jhurat basnyapeksha ekdacha vicharun tak. ho kiva nahi kahitari mhanen. ho mhanali tari anandi anand , nahi mhanali tar punha prayant kar. ekdachi ghalmel tari sampen. tila dusrybarobar pahun tu ticha anand pahat ahe he movie madhye aiknyala/pahyalag thik ahe re, prratyksh jivanat tras hoto. tyamule tujhya bhavana honestly tichyparyant pochav. kadachit ti pahilynada ho mhannar nahi pan jevha tila kalen sara kahi tevha ti jarror seriousally vichar karen.

  ani baiksarakhna radna sodun de ha ek premal salla. mulina ashi mula avadat nasavit.

  -Ajay Sonawane

 2. Hi Hemant ,
  I fully agree with Ajay.how long will you keep craving for her and in doing so how long will you remain static .You have to take the initiative now .I think beginning next week , take her for a cup of coffee after offce hours. I am sure coffee will melt the icewall that may have been formed between the two of you
  All the best
  JKBhagwat

 3. इमेसनल होवू नको राजा. विजेता बनण्यासाठी स्ट्रॅटेजी आख. नॉर्मल रहा. डेस्क वर जायला जर तू घाबरत नसतास तर आता पर्यंत तू तिचा चांगला मित्र झाला असतास. घाबरायचं काय त्याच्यात? मच थिंकिंग ब्लंट्स द ऍक्शन. अल्टिमेटली विचार करुन करुन आपणच सगळं बिघड्वतो. अप्सरा एक नॉर्मल मुलगी आहे. तिला नॉर्मल मुली सारखंच वागव. जाऊन बोल बिनधास्त. ती काय विचार करेल तिला काय वाटेल. हे थोडंस ठीक आहे. जास्त नको. न बोलुन झुरुन झुरुन मुलगी हातची जाण्याचे चांसेस जास्त आहेत. असं व्हावं असं वाटत नसेल तर स्वत:ल चॅलेंज दे आणि जाऊन भिड तिला बिनदास.
  शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s