विनंती

‘आवरा’ साहेबांना, व सर्व ‘आवरा’ परिवाराला एक विनंती आहे. आपण सर्वज्ञानी आहात. खर तर आपणाबद्दल मी बापुडा काय बोलणार. म्हणून विनंती करीत आहे. आपण आपला इमेल आयडी खरा टाकावा. दुर्दैवाने आपण कोण आहात हे कळल्यावर खरंच मला खूप दुख झाले. पण लपून काही बोलण्यापेक्षा सरळ बोलणे कधीही चांगले. काय करणार हे वेब आहेच असे आहे, सर्वच रेकोर्ड होत जाते. आपण केलेले क्लिक पासून ते वेळेपर्यंत. त्यामुळे माझ्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसाला देखील सापडणे फार अवघड गेले नाही. परंतु आनंद या गोष्टीचा झाला की, आपण माझ्या नोंदींना भेट देता.

काहीही असो, इमेल आयडी म्हणजे सर्वच नाही. घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देणे हे मनुष्याचे लक्षण आहे. आणि मुळात प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मला नेहमीच मान्य असतात. प्रत्येकाचे मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. आणि जसा मी माझ्या मताचा आदर करतो तसाच इतर मतांचा देखील. प्रतिक्रिया हे एक माध्यम आहे. पण मग यात खोटा इमेल आयडीचा ‘बुरखा’ कशाला? हा ब्लॉग, मुळात याचा मुख्य विषयच ‘मी’ आहे. म्हणजे देशात खूप प्रश्न आहे. अनेक लोक या सरकारला, प्रशासनाला नाराज आहेत. मी सुद्धा आहे. न्यायव्यवस्था काहीच उपयोगाची नाही अस आता माझे मत झाले आहे. कसाबचे लाड पाहता कदाचित उद्या जाऊन सर्वोच्च न्यायालय ‘कसाबची इच्छा असेल तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी’ असा निर्णय देईल. आपल्या देशात काहीही घडू शकते.

हो खरंच! काल परवाचीच एक बातमी होती औरंगाबादमधून. इंडिका मधून गाय चोरून नेत होते. चोर किती होते तर चार. असो, तीन जण पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडले. असो, चोरी पेक्षा मोठी गोष्ट अशी की, ते चौघे अधिक एक गाय इंडिकामध्ये कसे बसले असतील? हाहा!. अजूनही आठवले तरी हसू येते आहे. त्यामुळे, आपल्या इथे काहीही घडू शकते अस बोललो. मला हे मान्य आहे की मी सर्वांना खुपंच ‘पकवत’ असतो. पण हे असेच ‘पकाऊ’ माझे आयुष्य आहे. वाटलं तर माझ्या पहिल्या ‘नमस्कार‘ पासून हवं तर पहा.

त्यामुळे, कदाचित हे विचित्र वाटेल, पण मला हे कळून चुकले आहे की, कितीही शिव्या शाप देऊन हे प्रशासन आणि सरकार सुधारणार नाही. त्यामुळे आपण आपले रक्त जाळून काहीच उपयोग नाही. रक्त जाळा, पण स्वतःच्या विकासासाठी. देश आपला आहे पण, कर भरतांनाच. आणि हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. याला बदलण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते वैकुंठात आहेत सध्याला. त्यामुळे दोन पाच नोंदी त्यावर टाकल्याने न माझे आणि ना देशाचे काहीच भले होईल. मी इतका हुशार किंवा तत्वज्ञ नाही. त्यामुळे फार ‘पकपक’ नाही करीत. फक्त एकच विनंती आहे. आपण जर आपला स्वतःचा खरा इमेल आयडी टाकल तर, स्पॅममध्ये जाऊन ऑटोमॅटिक डिलीट होणार नाहीत. आज एक ‘आवरा’ची प्रतिक्रिया वाचली. कालही, एका ‘चॉकलेट’ ने टाकलेला. मी तो दाखवला. माझी काही हरकत नाही. आवडला नाही ब्लॉग तर बिनधास्त बोला. पण तेवढ इमेल आयडीचे पहा. बाकी बोलूच.

Advertisements

2 thoughts on “विनंती

  1. प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रतिक्रियेवर लक्ष केंद्रित व्हावे, माझ्या पर्सनॅविटीवर नव्हे असा माझा निनावी प्रतिक्रिया देण्यातील हेतू असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s