आज बोललो

झालं एकदाचं. आज मी तिच्याशी तीच्या त्या नव्या डेस्कवर जाऊन बोललो. सकाळी कंपनीत आल्यावर तीचा मेल पहिला. किती छान. आणि त्यात ‘टू’ मध्ये सुरवातीला मी. अगदी मस्त वाटायला लागले. मग हिम्मत करून तीच्या डेस्ककडे निघालो. पण कालप्रमाणे, तीच्या डेस्कजवळ जातांना पुनः हिम्मत गेली. मग तिथून त्या एपीएमच्या डेस्कवर गेलो. मुळात काहीच कारण नव्हते. पण तरीही विषय काढला. तिथून निघालो त्यावेळी काहीच सुचत नव्हते. पण केली हिम्मत. डेस्कजवळ जाऊन हाय म्हणण्यासाठी तोंड उघडले तर आवाजच निघेना. तसाच उभा राहिलो. तीच्या लक्षात आले त्यावेळी तिने हाय केले. मग ‘कंठ फुटला’. आज माझा ‘अवतार’ झालेला.

एकतर काल रात्री कधी झोप लागली ते कळल नाही. संगणक बंद देखील करायचे विसरून गेलो. सकाळी उठल्यावर वीज नव्हती. तसचं आवरून कपडे पाहतो तर, लक्षात आले की इस्त्री केलेले कपडे आणायचे राहिले आहे. त्यात उशीर झाला म्हणून दाढी सुद्धा नव्हती केलेली. एक जुना ड्रेस घालून गेलेलो. डोक्यावरचे तेल कपाळावर आलेले. असा अवतार करून तिच्यासमोर मी कधीच जात नाही. पण त्यावेळी जायचे टाळले असते. तर पुन्हा हिम्मत होईल याची शाश्वती नव्हती. खर तर काय बोलावं हा खूप मोठा प्रश्न होता. ती आज काय दिसत होती. ती खरंच सौंदर्याची देवी आहे. मग आपल ठरलेले ‘प्रोजेक्ट’ आणि कामाविषयी गप्पा. बोलता बोलता ती म्हणाली ‘खूप दिवसांनी दिसलास’. यार, हे ऐकून मी खरंच खूप गोंधळून गेलेलो. तस् अजूनही तोच विचार करतो आहे. ती अस का म्हणाली? कदाचित इतक्या दिवस मी तिच्याशी एकही अक्षर नाही बोललो नाही म्हणून की, तीच्या इतक्या दिवस मी आहे हेच ध्यानात आले नाही?.

सोडा, तिला म्हणालो, मला आज काम मिळाले. ती ‘बेस्ट ऑफ लक्’ म्हणाली. खर तर दोन पाच मिनिट देखील गप्पा नाही झाल्या. पण खर सांगू का, ती एकदा देखील हसली नाही. म्हणजे जशी ती नेहमी हसते तशी. ती नाराज आहे. गेले तीन दिवसांपासून ती एकदाही मनमोकळी हसली नाही. मग बोलल्यानंतर आनंद झालेला. पण ती उदास पाहिल्यावर मलाही बोर झालेलं. आज पाणी आण्यासाठी सुद्धा नाही गेली. मग आज दुपारी जेवायची देखील इच्छा होईना. कालही दुपारी जेवायची झालेली नव्हती. आणि आजही तसेच. आज बहिणाबाई बोललेली की उपास कर, म्हणून खिचडी आहे का पहिले तर कॅन्टीनमध्ये ते देखील नाही. मग खरोखरच कडक उपास झाला. त्यात त्या कामाच्या सर्व फाईल्स नसल्याने काम सुद्धा नाही. आणि ती एपीएम कुठे गायब झाली कुणास ठाऊक.

संध्याकाळी ‘काकू’ डेस्कवर आलेल्या. खर तर मला इतकं बोर झालेलं की, मी त्यांचा प्रश्न टाळला. ती का नाराज आहे हेच समजेनासे झाले आहे. काही तरी नक्की घडलं आहे. कदाचित कामामुळे? पण आज तीचे स्टेटस दिवसभर अव्हेलेबल होते. खर तर बोलायची खूप इच्छा झालेली. पण स्वतःवर कंट्रोल केल. कसं शोधू ती का नाराज आहे ते? तरी मी आजकाल जोकचे मेल तिला पाठवत असतो. ते सुद्धा याच कारणासाठी. तस् म्हटलं तर मस्त आणि उदास देखील दिवस गेला. असो, मैत्रीण आणि माझे फक्त मैत्रीचे नाते आहे. शनिवारी ती येईल, पण माझ्या लहान बहिणी सोबत. आणि मी तिला दुखावणार नाही. तीच्याही मनात माझ्याबद्दल तसे विचार वाढू नये म्हणून मी काळजी घेतोच आहे. आणि स्पष्ट सांगायचे झाल्यास मी अजूनपर्यंत कोणाशीच आणि कोणी माझ्याशी ‘फ्लर्ट’ केलेला नाही. आणि तस् तिने अतिरेक केला तर तिला स्पष्टपणे सांगून टाकील. फार काही वेळ लागणार नाही. माझ्या संगणकाच्या डेस्कटॉपवर ‘अप्सरा’चा फोटो आहे. तो दाखवला तरी ती जे समजायचे ते समजून जाईल. मला फक्त अप्सरा हवी. बाकी सगळया ‘ताई’मध्ये मला काहीच रस नाही.

Advertisements

4 thoughts on “आज बोललो

  1. बाकी काही असो तुझा ब्लॉग तुझ्या बायकोने वाचला तर लय अवघड होणार आहे तुझं.
    केस १. ती अप्सरा असेल.
    तेव्हा किती प्रेम करत होतास आता माझ्याकडे लक्ष द्यायला तुला वेळ नसतो. फसले रे देवा. पुढे चालून तू असा वागणार हे मला माहित असतं तर मी लग्नच केलं नसतं. तेव्हा दररोज लिहायचास माझ्याबद्दल. आता महिन्यातून एक ओळ पण लिहीत नाहिस.

    केस २. ती अप्सरा नसेल.
    तु माझ्यावर तिच्या एवढं प्रेम करत नाहीस. तिच्या साठी कसं रोज उठून ब्लॉग्स लिहायचास. आधी तेवढ्या पोस्ट्स माझ्यावर लिहून दाखव आणि मगच बोलायला ये माझ्याशी !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s