आहे पण नाही

काय यार, सगळ आहे पण वेळेवर काहीच नाही. काल आई इथे माझ्या घरी आली. आज मी कंपनीत येतांना दिवाळीचा फराळ आणला.  खर तर तिच्यासाठी! ती आली सुद्धा. फराळ घेतल्यावर मला बोलली की, ‘नवीन मोबाईल कुठे आहे?’ काय सांगू? यार एकाच तर गोष्ट आमच्या दोघात कॉमन झाली असती. पण घर घेण्यासाठी रक्कम जमवाजमव केली. त्यामुळे मोबईलची इच्छा तूर्तास कंट्रोल करावी लागली. तिला घराचे बोलले तर पुन्हा ‘तुम्ही’ अस म्हणाली. काय यार, घर घेण्याची ताकद असलेले फक्त काय काका लोक असतात काय? असो, ते महत्वाचे नाही. मोबाईल घेणे फक्त निमित्त! तिच्या जवळ जाणे हे ‘ध्येय’. खर्चाला कधीच का अंत नसतो?

आता बहिणाबाई बोलते आहे की, माझ्या बंधुराजांना एक नवीन बाईक घेऊन दे. आता तिथे पैसे अडकवले तर, वर्ष दोन वर्ष शांत बसून राहावे लागेल. कारण पुन्हा सर्व शून्यावरून श्रीगणेशा. काय करू? आहे पण शेवटी नाही. आणि कालपासून तो ‘नारळ’ पुन्हा सुरु झाला आहे.  मुद्दाम. माझ्याबद्दल आता मलाच विश्वास वाटत नाही आता. काहीच सुचेनासे झाले. तिने काल मला कॅन्टीनमध्ये हाय केले. काल आणि आजही किती छान दिसते आहे यार. ती इतकी छान आहे ना! काय चालल आहे हे? प्रश्न असा की, मला तीच हवीहवीशी वाटते. ती सोडून कोणीच नको वाटते. तिच्याशी मी मोबाईलबद्दल बोललो होतो. यार एक छोटीशी इच्छा मी पैसे असून देखील पूर्ण नाही करू शकत. तिने आता ‘स्वतःहून’ दुसर्यांदा बोलली. नंतर बोलू. खूपच बेकार वाटत आहे.

Advertisements

5 thoughts on “आहे पण नाही

  1. प्रेमवेडे झाले आहात तुम्ही…लवकर निकाली लावा हे प्रकरण..
    एक महिन्यात तिचे बेस्ट फ्रेंड बना आधी…बोलता बोलता आवडी निवडी घरी कोण कोण असता वगेरे विचारा..एकदा दोनदा फक्त तिच्याबरोबर ब्रेक वर जा…तिला मदत करा..घरी सोडा वगेरे वगेरे..आणि मग एक दिवस मस्त तुमच्या लेखणीतून एक झत्यांग प्रेमपत्र लिहा आणि एन्डला PS म्हणून या ब्लॉगची लिंक द्या आणि मग keep rest for destiny. happy Diwali and all the best

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s