खरेदी

गेले काही दिवसांपासून आईचे एक कपाट आणि एक ‘इमर्जन्सी बॅटरी’ घे अशी इच्छा. वडिलांनी एक कपाट काही दिवसांपूर्वी तर पसंतही केलेले. आईसाहेबांनी सकाळमध्ये आलेल्या ‘दिवाळी ऑफर’चे पान अगदी पाठ करून घेतलेलं. काल ते कपाट घ्यावे अस ठरवून निघालो. सोबत बंधुराज होते. आईसाहेब त्यामुळे जाम खुश होत्या. एकतर खर्च संपायचे नाव घेत नाही आहे. त्यात रोज कोणाची ना कोणाची नवनवीन ‘इच्छा’ होते. प्रत्येकाच्या ‘छोट्या छोट्या’ इच्छा उर्फ आज्ञा पूर्ण करता करता मी हापूस झालो आहे. सुरवातीला माझ्या घराजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात गेलो. तिथे आधी वडिलांना आवडलेल ते गोदरेज कपाट. पण आईला आणि बंधुराजांना तीन दारांचे नक्षीदार ‘प्लाउड’चे हवे. तशी माझीही मूकसंमतीही होतीच.

तिथे एक हवे तसे कपाट आवडले. अकरा हजाराच्या आसपास आकडा होता. वडिलांनी पसंत पडलेल्या गोदरेज कपाटची किंमत आठ हजार होती. आई साहेबांनी कपाट त्या ‘हाउसफुल’ मधून घ्या अशी ताकीद असल्याने, त्या दुकानातून निघावे लागले. तिथून चिंचवड स्टेशनला असलेल्या त्या ‘हाउसफुल’ जाण्यासाठी निघालो. चिंचवड स्टेशनला आल्यावर बंधुराजांना घेउन आधी नोकियाच्या प्रायोरीटीमध्ये जरा चक्कर मारू म्हणून नेले. खर तर त्या ‘एक्स सिक्स’साठी. तिथे तो नवीन आलेला ‘एन ८’ पाहून बंधुराज पघळले. मला म्हणाला आता तोच घे. हो हो करीत त्या ‘ईझोन’ मध्ये पाहू म्हणालो. तिथे जावून त्याच्या डोक्यातून ते ‘एन ८’ चे भूत काढले. मग त्याची गाडी कशीबशी ‘कपाट’वर आली. मग तिथून बिग बझारमध्ये.

कपाट पहिले पण त्यांच्या किमती अव्वाच्या सव्वा. पण कपड्याचा मोह आवरता आला नाही. बंधुराजांना एकाही ड्रेस आवडेना. टी-शर्ट घे बोललो. तर तेही त्याला आवडेना. मनावर खुपंच ताबा ठेवला पण, एक टी-शर्ट मी घेतलाच. तिथेच वरती ‘फॉर्च्यून बझार’मध्ये गेलो. तिथे एक डबल बेड, एक कपाट, एक आरसा, अजून एक दोन सटरफटर गोष्टी. थोडक्यात बेडरूमचा पूर्ण सेट होता. किंमत चौतीस हजार. पण वस्तू दणकट आणि सेट चांगला वाटलेला. सगळ् फायनल केल आणि वडिलांचा होकार घ्यावा म्हणून फोन केला. तर त्यांचे म्हणणे पडले की, आपण बनवून घेऊ फर्निचर नव्या घरात. रेडीमेड नको. बराच वेळ चर्चा केल्यावरही त्यांचा होकार होईना. मग नाईलाजाने तो सेट रद्द करावं लागले. तिथून डी-मार्ट,  तिथेही त्याला काही कपडे आवडेना. हो नाही करीत कसाबसा एक शर्ट घेतला.

त्याच्या नादात माझाकडे एक टी-शर्ट एक फोर्मल, आणि एक जीन्स कधी आले ते लक्षात आले ते कळलेच नाही. तिथून निघालो आणि त्या ‘हाउस फुल’मध्ये बेडरूम आणि हॉलमध्ये ठेवता येईल असे सेट पहिले. पण काही उपयोग नव्हता. तिथून निघाल्यावर ‘इमर्जन्सी बॅटरी’चे लक्षात आले. मग त्या ‘स्टार बझार’ मधून ती इमर्जन्सी बॅटरी घेतली. संध्याकाळी बहिणाबाईकडे जायचे होते. तिचे पुन्हा ‘बाईक’ पुराण सुरु. घरी आल्यावर आईसाहेबांनी कपाट नाही म्हणून चांगलीच खरडपट्टी काढली. आणि नेहमीचेच वाढत चाललेले कपड्यांचे दुकान पाहून ‘लेक्चर’ दिले. असो, चार पाच हजार कसे संपले आता त्याचा हिशोब लावतो आहे.

Advertisements

One thought on “खरेदी

  1. Namaskar,
    Aai babanchya pasantichee kharedi asheech hote ka? Mazya mulaane mala n vicharata chhaan Shirt anaala . 1500/- rupayancha. Chhapeel 42 No. cha. Pan to chhota nighala. Tyachya maapacha asalya mule mi tyalach deun takala. Itar kharedit maazya shirtachya kharediche kay ha bahuda mala ekatyala padlela prashn. R.K. Deshpande—Pune.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s