चूक करू नका

सगळ खरच खोट असत. आणि सगळ एकतर्फी असते. खूपच जास्त बेकार वाटत आहे. सगळीच नुसती घुसमट असते. आनंद आणि त्रास हा फक्त आपल्याला असतो. आपल्याला आवडणार्या व्यक्तीला कधीच काहीच जाणवत नाही. आपण वहात जातो. व्यक्तीत आपण बुडून जातो. ती व्यक्ती न कधी आपला द्वेष करते आणि ना कधी प्रेम. आपणच आपले मनाचे डोंगर रचत जातो. हळू हळू डोंगर मोठे होत जातात. आपण त्याच्या ओझ्यात दबून जातो. ती व्यक्ती समोर आली की, आपण आनंदी होतो. ती दोन शब्द बोलली की आपल्याला गगन ठेंगणे वाटायला लागते. कुठून तरी एक शक्ती, आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आकर्षित करीत राहते. आपण इतके बुडून जातो की, स्वप्न आणि वास्तव यातील फरकच आपण विसरून जातो.

व्यक्ती मुळातच इतकी गोड असते की, त्या व्यक्तीला पाहून आपण देहभान विसरून जातो. अगदी एखाद्या भक्ताप्रमाणे तिची भक्ती करू लागतो. प्रत्येक श्वास त्या व्यक्तीसाठी बनतो. झोपता उठता त्या व्यक्तीचाच आपण विचार करतो. ती व्यक्ती म्हणजेच जग असे आपण समजतो. पण या सगळ्या धामधुमीत त्या व्यक्तीला आपले प्रेम समजतच नाही. नाहीतरी त्या व्यक्तीचा काय दोष? प्रेमात आपण पडलेलो असतो. त्याला कधीच काही आपल्याबद्दल वाटले नसते. आपणच त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टींचा अर्थ एकच काढतो. आणि अधिकच गुंतत जातो. त्या व्यक्तीपेक्षा कुठलीच जगातील गोष्ट महत्वाची वाटत नाही. ती व्यक्ती नसेल तर सारेच निरस, उदास वाटते. आणि ती व्यक्ती उदास असेल तर अजूनच त्रास व्हायला लागतो. पण तिकडे त्या व्यक्तीला या गोष्टींचा गंधही नसतो. अगदी वेडेपणा असतो हा.

वस्तुस्थिती हीच असते की, ना ती व्यक्ती तिकडे आपल्याबद्दल सेकंदभर विचार करीत असते. आणि ना त्या व्यक्तीला तशी कोणती गरज वाटते. पण तिची कोणतीही गोष्ट आपण फक्त आणि फक्त ‘प्रेमच’ पाहतो. ती व्यक्ती असतेच मुळात प्रेमळ. आपण त्या व्यक्तीशी बोलायचा आणि त्या व्यक्तीच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. पण का कुणास ठाऊक त्या व्यक्तीला आपली जवळीक ही ‘त्रास’ वाटते. त्या व्यक्तीचे हे वागणे म्हणजे द्वेष नसते, परंतु आपण या गोष्टीमुळे दुःखाच्या दलदलीत फसत जातो. यात चूक कोणाची नसते. प्रत्येकाच्याच मनात एक व्यक्ती असते. जी फक्त ‘मनात’ असते, प्रत्यक्षात नसते. पण आपण त्या व्यक्तीला ‘ह्या’ लोकात शोधतो. कधी कधी मिळतेही. अनेकांना ती व्यक्ती मिळते देखील. आणि ते पाहून आपण त्याच भाबड्या आशेने, तिचा प्रत्येक क्षणी शोध घेतो. पण का कुणास ठाऊक, आपल्याला वाटणारी ती प्रेमळ व्यक्तीला तिला हवी असणारी व्यक्ती आपण कधीच नसतो.

तरीही आपण कधी ना कधी ती व्यक्ती आपली होईल या आशेने त्या व्यक्तीच्या ‘न घडणार्या’ गोष्टींबद्दल आपण विचार करू लागतो. आणि ज्यावेळी तो प्रेमाचा डोंगर खोटा आहे याची अनुभूती आहे असे जाणवते. त्यावेळी आपण आपल्यालाच दोषी मानायला लागतो. न्युनागंडचा तो ‘कर्करोग’ आपल्याला संपून टाकतो. झोपेचा आणि समाधानाचा किल्ला कोसळतो. आपण तरीही, सत्य आणि वस्तुस्थिती मानायला तयार नसतो. ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होवून देखील आपल्याला तीच व्यक्ती हवी असते. खर तर आपले प्रेम कधीच खोटे नसते. पण त्या प्रेमाची जाणीव आणि गंध त्या व्यक्तीला होताच नाही. पण मग मात्र आपण उदास आणि बैचेन होतो.

यात चूक असते ती आपल्या ‘मनाची’. ती व्यक्ती कधीच दोषी नसते. दोषी आपणही नसतो. पण मनाने ती व्यक्ती ‘आपली’ मानलेली असते. या गोष्टीमुळे, आपणच नव्हे आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जोडली गेलेली मने मात्र भरडली जातात. त्यांचा दोष नसतांना हे सगळे घडते. प्रेम करा, पण प्राण्यांवर, एखाद्या निर्जीव गोष्टीवर. पण व्यक्तीवर प्रेम हे शेवटी ‘चूकच’ असते. या एका मनाची सर्व मनांना एक छोटीशी विनंती आहे, प्रेमाची चूक करू नका..

Advertisements

14 thoughts on “चूक करू नका

 1. Hi Hemant,

  Baryach mahinya pasun me tumchya blog la follow karat aahe silently. Mala hi he asach vatat aahe. Kharatar he far ch personal aahe, n mala personal opinion denyacha kahi ch hakk nahi. Pan ek suggestion mhanun fakt aika n mag patel tase kara.

  He tar 100% barobar aahe ki ha tumchya manacha khel n akarshan aahe. Ani tumhi tyala ch prem manun basala aahat. Aata tumhi swatach he prakat kelay tevha tumhala practically kalale aahe ki, tumhi hyatun baher padaychay pan manala kase samjaval. Thoda tras hoil he many karayla n tumche man shant tevhach hoil jevha ti swata tumhala nakar deil ( asa kharach hou naye asa mala vatatay, pan practically v4 kela n je samor disatay tyavarun tari asach vatatay) So move ahead, tila vichara n hyatun mokale vha, nakar dila tar switch kara saral ( tasa hi tumhi switch karanar ch aahat) , aai – baba ni sangitlelya n tumhala avadel ashya ekhadya chan mulishi lagna kara n settle vha. Over a time period, u will come to know that it was so kiddish n infatuation, jyat tumhi nivval swatala gurphatun ghetla aahe.

  All the best.

  Me suddha hya ch paristhitun geli aahe, n kalantarane mala kalale ki kharach te nivval attraction hote, practically v4 kela tar doghamadhe julnare kahi ch navate, n asach kahi tumchyat pan disatay.

  He thode jast personal hote aahe , So mafi asavi.
  Personal life madhla interference samaju naye.

  Bhavi ayushya sathi shubbhecha.

 2. खरं आहे, अगदी खरं आहे…

  आपण आपल्या मनात इमले रचत राहतो, आपल्या स्वप्नांना फक्त त्याच्या रंगांनी रंगवतो आणि त्याला मात्र आपली तसूभरही पर्वा नसते.

  तरीही आपण वेड्या आशेपोटी मॄगजळामागे धावत राहतो. आणि हाती येतो निष्फळ एकटेपणा,आपल्याला वाटतं की त्याला आत्ता आपली किंमत कळेल नंतर कळेल, आणि म्हणून आपणच बोलत राहतो निरर्थक पण मग हे सारे नकोसं वाटतं आणि एका क्षणाला वाटतं खुप दूर निघून जावे या सगळ्या-सगळ्यांना सोडून. पण खरं सांगु जगणंच काय पण मरणंही त्याच्याशिवाय नकोसे वाटते. त्याची झलक पाहिल्याशिवाय जीवही जाणार नाही.

  तुझं एक बरेय रे ती तुझ्या समोर तरी असते रोज, इथे तर महिनों-महिने भेट नाही, फोन नाही आणि पण दुर्मिळच आठवड्यांनंतर एखादा…

  पण इतके असुनही प्रेम झालंय का मनातलं कमी? तर नाही. अजूनही प्रेम मात्र अबाधित आहे.कारण मी जपून ठेवलेय ते, फक्त त्याला देण्यासाठी… माझ्या मनाच्या कुपीत दुसर्‍या कोणाला स्पर्शही करु देणार नाही. ती एकच अशी माझी गोष्ट आहे की कोणीही हिरावून नाही घेऊ शकत.

  आणि एक जे अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले नसते तेच खरं प्रेम असते ना? मग तू तिच्याकडून ज्या अपेक्षा करतो आहेस त्यातरी कशाच्या बळावर ते एकदा तपासून घे? मला तरी वाटतेय की, तू न व्यक्त केलेल्या प्रेमाच्या बळावर हे अपेक्षांच ओझे हेलकावत ठेवलेयस तर त्याला आधार तरी कसला मिळेल?

  एकदा प्रेम व्यक्त तर करून बघ… कदाचित हे आत्ता भलताच ‘उपदेश’ देणारे नंतर काही भलतेच सांगत असतील.

  —प्रिया.

 3. Agree with Uttara…. ek tar tu tichyashi bolayala pan mahina ghet aahes… tila tuzya feelings samazalyashivay ti tuzyabaddal asa vichar karanarach nahi…. tuzya bolanyatun, vaganyatun tichyabaddalcha aadar, kalaji, prem aani barach kahi express vhyayala hav hot… je ki zalel nahi….

  aata ek kaam karr…. ek ghav don(2) tukade karun tak… HOY mhanali uttam aani NAHI mhanali tar ati uttam…

  tu tuzyalife cha vichar kar… sar(doke) salamat to pagadi pachass..ashyatala prakarr aahe… ajun baryach muli yetil ayushyat… so take a deep breath and make it happen…. HOY kinvha NAHI….. tuza marg mokala hoyeel……

  Zurat basun vel nako vaya ghalavu…..

 4. नॉट अग्रीड..नॉट अग्रीड..नॉट अग्रीड..

  काही अशी सतेज आलेली नाहीय्ये अजून..

  चूक एवढीच होतेय की “झुरत बसणं” आणि ती समोर आली की “वाचा जाणे”, “काही न सुचणे”, “दातखीळ बसणे”, “हृदय थांबणे” वगैरेचा अतिरेक झालाय. त्यात हेमंत काही मुद्दाम करत नाहीये पण तिला मिळवणे हे ध्येय ठेवून धाडस आणून स्वत:ला बदलत नाहीये.

  स्वत:ची इमेज उभी करावी लागते, बदलावं लागतं हे सेरीयासाली समजून कृती केलीन तर अशक्य नाही अजिबात..खूप शक्यता आहे काहीतरी छान होण्याची.

  आणि नाही तर नाही..दुसरी कोणी येईलच हे अगदी खरं..

 5. agdi khare ahe,
  kahi mulina mulich kimmat naste premachi apan karat aslelya kharya premachi kadar tya kadhich karat nahit.
  Jaat pat , dharm , money etc. Goshti muli premat padaychya agodar cheq krtat nantrch tya premat padtat.
  Ani aplya wedya jiwala matr tyanch sarv many aste tari suddha tyana kadhich kahi farq padat nahi……….
  Sagar,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s