स्वभाव

स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. स्वभाव म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही. आपले वागणे म्हणजे स्वभाव अस म्हणणे चुकीचे वाटते. कारण, व्यक्तीनुसार आपले वागणे बदलते. हो, खरंच! स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असेच असते. पण ‘स्वभाव’बद्दल सगळीकडे सारखाच असतो. माझा एक मित्र आहे. त्याला राग आल्यावर तो, समोरच्या व्यक्तीला मनाला टोचेल असे बोलतो. किंवा अनेकदा त्याला न पटलेल्या गोष्टीत देखील मन दुखावेल अस बोलून जातो. आता त्याच्या घरी देखील तो तसाच आणि बाहेरही तसाच.

काल मैत्रिणीला दिलेला पेन ड्राईव्ह आणायला गेलो होतो. निघतांना काकूंना, फराळाला या अस म्हटलं. लगेच माझी मैत्रीण ‘फक्त काकूच का?’ अस म्हणाली. मैत्रिणी बद्दल काय बोलावं? प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेते. माझा स्वभाव थोडक्यात बोलायचे झाले तर, ‘जशास डबल तसे’ असा आहे. आता नेमक कसं सांगू? माझा पीएम यावर नीट बोलू शकेल. अप्सरा खुपंच रागीट आहे. राग नाकावर असतो. तस् प्रत्येक जण तसा असतो. प्रत्येक जण जितका प्रेमळ तितकाच रागीट असतो. जितका चांगला तितकाच वाईट देखील. आपण आपल्यातील वाईट रूप लपवून ठेवतो. आईचा स्वभाव जे काही आहे ते तोंडावर सांगणे. आणि वडील कधीच काही बोलत नाही. आपल्या कृतीतून दाखवतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभावात खुपंच विशेष आहे.

स्वभाव बदलणे खुपंच अवघड आहे. थोडक्यात आपण स्वतःला नवीन रूप दिल्याप्रमाणे असते ते. गांधीजींनी गोळी खाल्ल्यावर ‘हे राम’ म्हटले. कदाचित राहुल बाबा ‘हे मॉम’ म्हणेल. कारण फक्त स्वभाव. स्वभाव हे देखील आपले एक रूप असते. जसे आपण दिसतो, अगदी तसे. स्वभाव आणि रूप यात थोडेफार साम्य जरूर असते. म्हणजे काही व्यक्ती पाहिल्यावर आपल्याला नकोसे वाटते. मला अनुभव आहेत. ते म्हणतात ना ‘लव्ह एट फस्ट साईट’, तसेच काही व्यक्तींना पहातच ‘इरिटेट एट फस्ट साईट’. त्या व्यक्तींचा स्वभाव तसाच असतो. प्रत्येकाच्या स्वभावावर ते अवलंबून असते. स्वभाव सारखे असतील तर मैत्री होते. काहींचा स्वभावच मनमिळावू असतो. त्यांचा मित्रपरिवार बनतो. काहीजण एकलकोंडे. स्वतःतच रममाण होणारे.

शेवटी सगळंच स्वभावावर अवलंबून असते. म्हणजे जर बुशचा स्वभाव आपल्या मनमोहनसिंग सारखा असता तर.. अमेरिकेत अजून दहावीस इमारतीवर विमाने येऊन धडकली असती. प्रत्येकाच्या स्वभावावर आवड निवड ठरते. वातावरण आणि परिस्थिती यावर स्वभाव बनतो. काहींना घराचा सहवास कमी मिळाला तर त्यांच्या स्वभावात ‘घराबद्दल ओढ’ निर्माण होते. काहींचे अगदी उलटे. मग असे ‘विजय दिनानाथ चौहान’ बनतात. थोडक्यात, मला फक्त अस म्हणायचे आहे की स्वभाव आपल्याला सुधारू अथवा बिघडून टाकू शकते.

Advertisements

4 thoughts on “स्वभाव

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s