घटस्फोट

खूप आनंद होत आहे. काय करू काय नाही आणि अस झाल आहे. कालच एका स्थळाचा ‘मला’ पाहण्याचा कार्यक्रम झाला. मला ते ‘स्थळ’ पसंत आहे. आणि तिलाही ‘मी’. दोघांची पसंती झालेली आहे. बस काय तो ‘होकार’ येणे बाकी आहे. त्यांचा ‘होकार’ आणि ‘प्रेमपत्र’ आले की, माझ्या सध्याच्या ‘भार्या’ला घटस्फोटाची नोटीस देऊन टाकील. खूप नखरे सहन केले तिचे. आणि विशेषत: तिच्या आईची. जणू काय माझाशी लग्न केले म्हणजे ‘उपकार’ केल्याची भाषा. तशी तिची काय चुकी म्हणा? ‘सासू’बाई. फारच पाडून बोलायच्या. चुका त्या करणार, आणि ‘सॉरी’ मी म्हणायचे. वर्षभर सहन करतो आहे.

सासरी आल्यापासून, म्हणजे पहिल्या महिन्यात हनिमूनचा सॅडमून केला.  हे जुने ‘मंगलसूत्र’ दिले. घराच्या चाव्याही जुन्याच. कामही तसेच. सासूबाई कायम पाणउतारा करायच्या. नवीन स्थळे माझी पत्रिका पहायच्या. पण पाहण्याचा कार्यक्रम होताच नसायचा. बर एक घरंदाज स्थळ मागे लागलेलं. पण मी इतका ‘फ्लेक्स’बल नाही तिच्या कामात. शेवटी काल त्यांचा दुपारी कार्यक्रम झाला. फार फार तीन मिनिटांचा. त्यांना मी माझा स्पष्ट नकार सांगितला. त्यानंतर रात्री त्या नव्या स्थळाचा कार्यक्रम ठरलेला. नऊ वाजता ओबामाच्या गावातील थोडक्यात ‘युएस’चे स्थळ आले.

जवळपास चाळीस मिनिटे कार्यक्रम झाला. आता मुलीच्या आईला मी पसंत आहे. अजून मुलीला मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. पण नेटवर तिचे रूप पहिले आहे. इतकी सुंदर नाही आहे. पण ठीक आहे, चालेल मला. बस तिच्या वडिलाच्या फोनची वाट पाहत आहे. बस एकदा ‘हुंड्याचे’ बोलून झाले म्हणजे फायनल. त्यांनी होकार कळवला की, मी इकडे घटस्फोटाची तयारी करतो. पुढील महिन्यात, बार उडवून टाकील. चला खूप मोठ काम झाल आहे. म्हणजे त्याच्या होकारानंतर मी ‘अप्सरा’ला मनातील सांगून टाकील. असो, उत्तर तर स्पष्टच आहे. पण तरीही, तिला मनातील सांगेन. मागील दोन दिवस कसे गेले म्हणून सांगू. ढकलले.. आज ती किती छान दिसते आहे ती! खूप खूप छान! मला तर तिला पाहून आताच कंट्रोल होत नाही आहे. काय यार, ती अजून एकदाही माझ्याकडे साधे पहिले नाही. बोलायचे तर दूरच आहे. बस एकदा होकार आणि ते प्रेमपत्र येवू द्या. तिला मनातील सांगून टाकील. आणि हिला ‘घटस्फोट’.

Advertisements

5 thoughts on “घटस्फोट

  1. I m visting dis blog since last 3 days……i have got addicted to ur writings….. i loooooooove D way u write…… 🙂
    But there is a biiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiggggggggggggggggg confusion…….. u got married 2 sum1……now u r going to get divorce from her…… and after dat 2nd wedding………………..
    U still love Apsara….. and still haven’t told her anything………… ????????????????????????? How cud u resist with ur feelings……???? Bosss hats off to ur patience………… 😀

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s