विषय

वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण करते. दिवस डोळ्यासमोर येतो. ती कधी माझ्याशी स्वतःहून बोलणार याचे मन विचार करू लागते. मेंदू तिला दहा दिवसांपासून साधी आठवण देखील आली नाही, याची जाणीव करून देते. तीच्या मनात आपल्यासाठी काहीच जागा नाही, हा निकर्ष निघतो.

मी उदास होवून. नोंदीचा विषय बदलून ‘मृगजळ’ होतो. पुन्हा दीडशे शब्द होतात. मध्येच दुपारी ती कॅन्टीनमध्ये आली त्यावेळचा प्रसंग डोळ्यासमोर उभा रहातो. तीचा तो सकाळचा हसरा चेहरा आठवतो. पुन्हा मनात एक ताकद संचारते. विषय बदलून ‘मनातील तिला कसं सांगू?’ हा होतो. तिला कॅन्टीनमध्ये कसं बोलावू?, पण मग मी पुन्हा गोंधळतो. मन स्वप्न दाखवू लागते. आमच्या दोघांची पहिली भेट ही, एखादया छानशा हॉटेलात व्हावी. जिथे तिला आवडेल. आणि ती ‘अप्सरा’ माझ्याकडे नेत्रकटाक्ष टाकीत ‘मला का बोलावलेस?’ अस विचारेल. मी तिला ‘मला तुला काही सांगायचे आहे’ म्हणावे. ती हसून ‘काय?’. आणि स्वप्नातून मी सत्यात येतो. मग माझे मलाच हसू येते. मी नोंदीचा विषय बदलून ‘अस व्हावं’.

पुन्हा तीचा तो छानसा चेहरा डोळ्यासमोर उभा रहातो. तीचा तो गोड चेहरा, तिचे हसणे, बोलणे. तिचे स्वप्नातीत सोंदर्य, तिचे डोळे. मन उत्साही होते. माझा चेहरा खुलतो. रात्रीचा दीड वाजलेला असतो. आणि डोळ्यावरील झोप उडून जाते. जणू ती माझ्याच सोबत असल्याचा भास होतो. विषय पुन्हा बदलतो आणि ‘तिचे सौंदर्य’ होतो. मी तीन-चारशे शब्द खरडतो. अडीच वाजून गेलेले असतात. मध्येच ‘ती मिळणे कधीच शक्य नाही’ मित्रांचे शब्द आठवतात. काही मित्रांचे हे ‘नेहमीचेच’ झाले म्हटल्याचे आठवते. तीन वाजत आलेले असतात. मी विषय बदलून ‘आदर्शवादी’ सरकारवर नोंद लिहायला सुरवात करतो. सहज खिडकीतून बाहेर लक्ष जाते. तो बेभान वाहणारा वारा पाहून, पुन्हा तिची ओढ वाढते. तीच्या विचारापुढे मी मनाने हरतो. विषय बदलून ‘हे प्रेम काय आहे?’ करतो.

मी नोंदीमध्ये मनाला समजावतो. पण ते तिच्यासाठी हरलेले मन, काही सुचू देत नाही. एक अनामिक वेदना होतात. मी उदास होतो. पहाट झालेली असते. पण विषय काही ठरत नसतो. मी आरशासमोर उभा राहून माझ्यात काय कमी आहे, हे पाहू लागतो. पण मन ती तिथेही असल्याचा भास होतो. मन नाचू लागते. तीचा गोड चेहरा, तिचे बोलणे आठवून नशा चढते. यार मी कधी प्रेम अस असते याचा विचार केलेला नव्हता. प्रत्येक क्षणी तिचाच ध्यास. तीचीची ओढ. तिचे ते हसणे, जादू करते. इतकी अधीरता वाढवते ना! माझ डोके काम करायचे बंद होते. ती माझीच व्हावी, अस भाग्य मिळावे. मग पण त्या या सगळया गोष्टींपासून अनभिज्ञ असलेल्या त्या ‘अप्सरे’ला कसं सांगू या विचाराने मन बेचैन होते.

अचानक ब्लॉगवर काहीतरी खरडतोय याची जाणीव होते. मी पुन्हा ब्लॉगवर, लक्ष केंद्रित करतो. पाच वाजलेले असतात. तरीही झोप येत नसते. आता मात्र ‘उच्चांक’ झालेला असतो. तरीही ‘विषय’ नसतो. क्षणोक्षणी बदलणारे विचार आणि चंचल मन रात्र कशी गेली हे हसून सांगू लागतात. ही मात्र माझी ‘हाईट’ होते. मला माझाच राग येतो. आणि शेवटी ‘विषय’ नसलेली नोंद होते.

Advertisements

One thought on “विषय

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s