चायनीज

आम्ही चिनीमातीच्या ‘लाल’ चिंग च्यांगचे जाहीर आभार मानतो. सर्व चिंग च्यांग आणि चिंगीने जो लाल आणि पिवळा आणलेला महापूर पाहून आम्ही देखील गदगद झालो आहोत. काय प्रेम म्हणावे? प्रत्येक रस्त्याच्या कडेला तुमचे प्रेम पाहून आम्ही ‘लाल’ होणार नाहीत तर नवलच. ती आमच्या लोकांची रस्त्याच्या कडेला उभा राहून ‘करण्याची’ सवय यामुळे नक्कीच कमी झाली असेल. काय बोलाव! पहा ना, किती महान काम केलंत, अन्नाचे विविध पदार्थ कसे असतात, हे आम्हाला माहीतच नव्हते. कितीही नावे उच्चारता आली नाहीत तरी पदार्थ एकाच पद्धतीचा. त्या शेवया आणि ते सूप, आणि त्या दोन काड्यांनी खायची पद्धत. वाह वाह! किती व्यायाम होतो. भूकही वाढते. त्यामुळे खाल्लेलं पचते देखील. पोट बिघडू नये, हेच बहुदा त्यामागील लॉजिक असावे. नाहीतर आम्ही, हाताने पट्टा सुरु.

परवा ती दिल्लीतील इमारत कोसळल्याची बातमी पाहून, खरच तुम्हा सर्व चिंग च्यांगची आठवण झाली नसती तर नवल. तुम्ही दिलेली ‘फेंग शुई’च्या देणगीचा वापर झाला असता तर नक्कीच ती इमारत पडली नसती. अध्यात्म सोडले तर मनशांतीचे दुसरे काहीच माध्यम नाही असा गैरसमज पसरला आहे. कदाचित ‘रेकी’चा प्रसार कमी झाला असेल. त्यामुळेच देशात आजकाल प्रत्येक जण मानसिक व्याधीने त्रस्त झाला आहे. परंतु जिकडे तिकडे भारतीय मुलेच काय पण तरुण देखील चीनी वस्त विकत घेऊन देशाचा ‘उद्धार’ करीत आहे. पण हे नामुराद सरकार त्यावर बंदी आणून ‘स्वातंत्र्यावरच’ घाला घालीत आहे. खरंच किती अन्याय सहन करीत आहात चिंग आणि चिंगी लोक तुम्ही. मलाही हळहळ होते. आज राहवलेच नाही.

खरंच किती मुर्ख आहे आपले सैन्य आणि सरकार देखील. आता सीमेवर राहून चीन पासून देशाचे संरक्षण करीत आहे म्हणे. काय गरज आहे. इथे तर आता चिंग च्यांग आणि चिंगी लोक दुसरा ‘चीन’ बनवून टाकला आहे. म्हणजे शत्रुत्व संपलेच म्हणा की! तुम्ही खरंच ग्रेट आहात. बापूजींची शिकवण तुम्ही सत्यात आणलीत. ‘हिंदी चीनी भाई भाई’ या घोषणेचा अर्थ तुम्ही सत्यात आणलात. खरंच तुम्हा सर्व चिंग च्यांगचे देशप्रेम पाहून मन भरून आले आहे. मला तर आताच आपली राजधानी नक्कीच ‘बीजिंग’ होईल यावर खात्री पटली होईल. आणि नक्षलवाद राहणारच नाही. मुंबईचे नक्कीच शांघाय होईल. ‘बिना खड्ग, बिना ढाल’ तुम्ही हे करीत आहात याचा खूप अभिमान वाटतो आहे. नाही काही अडचण नाही. तुम्ही करता ते अगदी योग्य आहे. आणि मनापासून तुमचे हे ‘लाल’ प्रेम पाहून, आमच्याकडे शब्द नाही आहेत. बस फक्त एक विनंती आहे. प्रेमाचा महापूर कितीही आला तरी सर्वच विचार करून ‘खा आणि घ्या’.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s