वनवास संपला

किती सतावलं यार तिने! पण आता मस्त वाटत आहे. काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त. आणि आज मी आता एक इमेल तिला पाठवला आहे. आणि पिंग करून गुड मोर्निंग सुद्धा केल. कालपासून सगळंच छान वाटत आहे. दोन नोव्हेंबरला मला तिने स्वतःहून पिंग करून ‘गुड मोर्निंग’ केलेलं. त्यानंतर काल दुपारी तिचे दोन इमेल. मध्यंतरीच्या काळात का रागावली होती कुणास ठाऊक! मी तिला दिवाळीनंतर दहा तारखेला पिंग केलल. पण तिने रिप्लाय दिलाच नव्हता. वाटल ती बिझी आहे म्हणून. नंतर स्वतःहून करेल. पण त्यानंतर ना तिचा इमेल आणि ना साधे पिंग. बरोबर चौदा दिवस. पण अशी माझी काय चूक झाली होती, काय माहित.

आता खूपच छान वाटत आहे. ते चौदा दिवस, चौदा वर्षांपेक्षा काही कमी नव्हते. नुसतेच हाल. ना झोप आणि ना चैन. आज ती खूप खूप सुंदर दिसते आहे. तिला कॉफीला बोलवावं अस खूप वाटत आहे. पण कसं विचारू तिला? ती बिझी असते. मागील वेळी, तिच्या डेस्कवर गेलो त्यावेळी तिला माझ्याशी गप्पा मारायला वेळ नव्हता. म्हणजे तसं दहा एक मिनिटे बोलली. पण माझे मन भरतच नव्हते. ती इतकी छान दिसत होती त्यावेळी. म्हणून मला कंट्रोल होत नव्हते. आणि ती गप्पा मारतांना ती सोडून काहीच दिसत नव्हते. खर तर ती काय बोलत होती याकडेही लक्ष नव्हते. मी काय करू, ती इतकी सुंदर आहे की, मला स्वतःवर कंट्रोल ठेवणे अशक्य होते.

आणि ज्यावेळी ती हसते त्यावेळी तिच्यावरून नजर हटवणे शक्यच होत नाही. यात कुठेच अतिशयोक्ती नाही आहे. जेव्हापासून तिला पहिले आहे, हे नेहमीचच झाल आहे. काल सकाळी माझा मित्र मला इतक चांगल समजावीत होता, आणि मी तिचा राग त्याच्यावर काढला. दुपारी दुसर्या मित्रामुळे नवीन कॅन्टीनमध्ये जाव लागल. त्याचा उपास होता. आणि त्याच्याबरोबर माझा सुद्धा उपास झाला. जेवणाचा मुडच गेला. एकतर परवा आई गेल्यापासून जेवणाचे पुन्हा हाल सुरु झाले आहे. असो, पुढील रविवार पर्यंत येते अस बोलून गेली आहे. पण कधी कधी आई नसते तेच चांगले वाटते. कायम तो ‘लग्न’ विषय. घरी कुणी आले की मग तो विषय अजूनच वाढतो.

शुक्रवारी माझा कंपनीतील एक मित्र आलेला. झाल! मी स्थळांना होकार देत नाही म्हणून, तिने आणि त्या त्याने पेट्रोल ओतायचे काम केल. शनिवारी माझ्या मैत्रिणीची आई आलेली. तिनेही तेच. काय मनात असेल ते बोलून टाक. तुला जशी हवी तशी मुलगी तशी घरचे शोधतील. नाहीतर तुला कोणी आवडले असेल तर तेही सांग. काय बोलणार? मी काहीच नाही बोललो. आजकाल ‘लग्न’ विषयावर बोलावस वाटत नाही.  दुसरा मित्र आलेला शनिवारी रात्री आलेला. आई आणि तो, दोघांनी जाम टेन्शन दिले. रविवारी त्या टेलिफोनिक इंटरव्यू झाल्यावर मग आई तर जाम खुश. आता पुन्हा त्याच विषयासाठी गावी गेली आहे.

पण कसं सांगू तिला? तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. माझा मित्र म्हणत होता, की मुली सुरवातीला नाहीच म्हणतात. मग पुन्हा पंधरा वीस दिवसांनी पुन्हा प्रपोज करायचे म्हणजे निदान ते विचार तरी करतात. की नाही म्हणून सुद्धा, पुन्हा आपल्याच बद्दल विचार करतो आहे. मी नाही अस काही करणार. आणि मुळात तिच्या मनात काय चालू आहे, हे तर स्पष्टच आहे. उगाचंच, माझ्यामुळे ती डिस्टर्ब होणार. इकडे मी बैचेन आणि तिकडे ती माझ्यामुळे डिस्टर्ब. त्यामुळे कधी कधी वाटत, तिला काही सांगूच नये. असो, हे द्वंद्व कधीच न संपणारे आहे. पण काहीही असो, वनवास संपल्याने आनंद होतो आहे. बाकी बोलूच!

Advertisements

9 thoughts on “वनवास संपला

 1. नमस्कार,
  मी आपला ब्लॉग अधूनमधून वाचतो.
  लेखन मला आवडते.

  माझा अनुवादावर आधारीत ब्लॉग असून मला तांत्रिक शंका विचारायची आहे.
  आपण अनुभवी ब्लॉगर आहात म्हणून विचारीत आहे.
  मी लिहिलेल्या पोस्टस प्रकाशित केल्यावर सर्वात वरील बाजूस दिसत नाहीत. जुन्या पोस्टच्या खालीच नवी पोस्ट दिसते.
  असे का होत असावे, याबद्दल सांगावे.

 2. मित्रा, तुझ्या ब्लॉगवर सातत्याने अप्सरेबद्दल वाचून मी तिच्या प्रेमात पडलोय. love triangle झालाय. आता तू तिला प्रपोज कर नाही तर मी करेल.

 3. संकेत तु पण….
  माझ्या पण मनात अपसरेबद्दल प्रेमभाव निर्माण झाला आहे,हेमंतच्या पोस्टस वाचुन वाचुन…आणि मला वाटते त्यात माझा दोष काही नाही…

 4. हो.. 🙂 सगळेजण याच्या स्टोरीत इतके इन्व्होल्व झालेत की “कशी असेल ती” असा विचार सगळे करत असावेत.

  पण हेमंत. तू लक्ष देऊ नको. आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नको.

  प्यार किया तो डरना क्या?

 5. नचिकेताला १००% अनुमोदन. संकेत, देवेंद्र काय हे, मदत करायची सोडून ….हेमंत यांच काहीही ऐकू नकोस
  .
  .
  काल दुपारी मला तिने दोन इमेल पाठवले. किती मस्त.>>>>> मलापण Forward कर 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s