दिवस असा की

काय बोलावं अस झालं आहे. आजचा दिवस! सर्वात सुंदर दिवस. मला आता नाही रहावत. मी बोलून मोकळा होतो. मला खरंच, नाही आता कंट्रोल. खूप दिवसांनी सकाळी उठून पळायला गेलो. आवरून पहिल्या इंटरव्यूसाठी गेलो. या कंपन्या सुद्धा असले अर्धवट पत्ते देतात. दोन किमी पायपीट करावी लागली. कंपनी फार काही खास नव्हती. ते नेहमीप्रमाणे बराच वेळ बसून राहावे लागले. त्या कंपनीची एच आर ने दहा जणांमध्ये सुरवात माझ्यापासून केली. असो, सध्याच्या कंपनीची ‘महिमा’. आता पहिल्याच राउंडला एच आर कशी आली कुणास ठाऊक. बर ती ‘ताई’ जरा जास्तच करीत होते. काय बोलायचे आणि ही काय बोलत होती. मला म्हणाली ‘तुझ्यातील एक कमतरता सांगू का?’. आता मी ह्या ताईला ‘नाही’ अस का म्हणेन? मला म्हणाली, ‘तू शॉर्ट टेम्पर आहेस’. काय बाई होती, चेहरा पाहून चक्क ‘खोटे भविष्य’. मी नाही म्हटल्यावर, तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

असो, आकड्याला किरकिर करीत होती. माझा खरंच मूड गेलेला. काय भाजीपाल्याचे भाव करतात यार हे. त्यात ‘अप्सरा’ची खूप आठवण येत होती. कधी जातो आणि तिला पाहतों अस झालेलं. लगेच त्या बयेने पुढचा राउंड ठेवला. मला एकतर कंटाळा आलेला. त्यात तो हीरो असे प्रश्न विचारात होता. आयुष्यातील पहिला इंटरव्यू ज्यात मी एकाही प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले नाही. खर तर कोण कोणाचा इंटरव्यू घेते हाच मोठा प्रश्न होता. कसाबसा तिथून सटकलो. कंपनीत यायला दुपार झाली. फ्लोरवर येतंच तीच दर्शन झालं. किती छान! ती खुपच सुंदर आहे. आज तिचे रूप पाहून माझे सगळेच ब्रेक फेल होत होते. कॅन्टीनमध्ये देखील कुपन घेतांना दोघात एक होता फक्त. किती जवळ उभी होती. वाटलं होते, तिथेच तीचा हात हातात घेऊन सांगून टाकावे मनातलं सार काही. जेवण झाल्यावर ती दिसलेली. पण ती अस माझ्यासमोर येऊन मला न पाहता जाणे, मला खटकले. म्हणजे खूप छान वाटले. पण तीला ही माझ्याप्रमाणे होते की काय अशी शंका आलेली.

सोडा, माझ्या मनात हे ‘मनाचे खेळ’ कायमचं सुरु असतात. माझ्या इमारतीत जातांना थोडे अंतर ठेवून मी आणि माझे मित्र, आणि बाजूने ती आणि तिचे मित्र मैत्रिणी चाललेले. खूप धडधड वाढलेली. कसबस मी धावत पळत डेस्कवर आलो. आज ती इतक्यांदा समोरून गेली ना, माझी हालत खराब झालेली. सगळाच कंट्रोल संपलेला. कृपा झाली डेस्कवर आली नाही. नाहीतर ‘हाय’च्या ऐवजी नक्कीच ‘आय लव्ह यु’ म्हणून गेलो असतो. त्यात तिने आज इतके मस्त इमेल पाठवले ना. आणि तेही फक्त माझ्यासाठी. ‘टू’ मध्ये फक्त मी. काय सांगू किती आनंद झालेला. या गोष्टीची किती दिवसांपासून वाट पहात होतो. आता नाही होत यार कंट्रोल. मी म्हणून टाकतो. मित्रांशी बोललो तर जातांना शेवटच्या दिवशी बोल असा सल्ला दिला. अरे एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. दुपारी एक इंटरव्यु होता. पण तीला पाहिल्यावर तिकडे जायची इच्छाच होईना. नाही गेलो. माझ्या सिनिअरने माझ्या कंत्राट कधी संपणार बद्दल विचारात होती. तीला घेणार असेल तर थांबतो नाहीतर बाहेर शोधतो अस बिनधास्त बोललो.

आता बस एक अजून चांगल्या पगाराची पर्मनन्ट नोकरी हवी. पण खरंच मी तिला म्हणून टाकू का? उत्तर माहिती आहे मला. पण तरीही मला नाही सहन होत आता. संपली सहनशक्ती. दिवसभरात ज्या ज्या वेळी खूप आठवण दाटून आली त्या त्या वेळी ती माझ्या समोर होती. पण काहीच नाही बोलता आले. निदान आता कॉफीला तरी! मी नक्की सोमवारी तिला कॉफीची येतीस का म्हणून नक्की विचारेल. मला खरंच, नाही काही सुचत. तिला बोलून टाकू का?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s