चुकाच चुका

काय चालू आहे यार माझे. नुसत्या चुकाच चुका घडत आहे. आता मी तिला कंपनीच्या आयडीवरून एक इमेल पाठवला. पाठवल्या नंतर चेक केल्यावर लक्षात आले की, त्यात मी माझा जीमेलचा आयडी सकट जसाच्या तसा इमेल फोरवर्ड केला गेला. हे अस रोजच झाल आहे. मागील आठवड्यात एका कंपनीच्या इंटरव्यूला जमणार नव्हते. तसा मी इमेल देखील पाठवला. पण चुकून दुसर्याच कंपनीला. यार! काय चालल आहे. चूक घडून गेल्यावर लक्षात येते. मागील वेळी चुकून मला एका मोठ्या कंपनीच्या एच आरने इंटरव्यूसाठी फोन केलेला. ती मला फ्रेमवर्क बद्दल विचारात होती. आणि मी मला आपला ‘येस’ करत बसलो.

गेल्या दोन महिन्यात एकदाही ना बहिणाबाई न माझ्या इतर कोणत्या नातेवाईकांना स्वतःहून फोन केला. काल रक्तदान करायला गेलो. त्यावेळेसही रक्तदान झाल्यावर हात आखडून ठेवायला सांगितलेला. मला कळल देखील ती ‘ताई’ काय म्हटली ते. पण तरीही मी हात मोकळा सोडलेला. रक्त वाहायला लागल्यावर लक्षात आले. सगळ्या नुसत्या चुकाच चुका घडत आहे. काल बस स्टॉप निघून गेल्यावर उतरायचे लक्षात आले. थोडक्यात आजकाल मी ‘हॅंग’ झालो, अस वाटत आहे. अजून ती ऑफिसमध्ये आलेली नाही. खरच मूड गेला आहे. सोडा, नंतरच बोलू.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s