आदर्श

प्रिय ‘सोनियाच्या अंगणातील’ फुलांनो, आयुष्यात एखादा तरी ‘आदर्श’ असावा. आता आमच्याही पिताश्रींनी ‘आदर्श घे’ असे अनेकदा सांगितले. पण आम्ही कधीही तसा ‘आदर्श’ घेतला नाही. पण आता सर्व सारासार आणि ‘अर्थ’पूर्ण विचार केला आहे. याआधी देशाचा विचार करतांना ‘अर्थ’ला हीन समजत होतो. कदाचित, तुम्हीही हे ‘पाप’ केले असेल. पण आता न्यूनगंड सोडा. उठा राष्ट्रवीर हो! सज्ज व्हा, आणि जमेल तितके, शक्य होईल तितका ‘शिष्टाचार’ करा. ‘यस वी क्यान’ अस कोणी तरी मुंबईत मध्यंतरी बोललेलं. हो! मी ‘राजा हिंदुस्तानी’चा आदर्श घ्यायचे ठरवले आहे. सतराशे कोटीचे ‘अर्थ’पूर्ण काम तमाम केले. पहा, याला म्हणतात ‘सो कलमाडी की आणि एक राजा की’. तसे या आदर्शवादी मायबाप सरकारने खरंच एक मोठा ‘आदर्श’ निर्माण केला आहे. सर्वच ‘आदर्श’ मंत्री लोकांचे सरकार आहे.

पहिला मान देशाच्या ‘राष्ट्रपती’ द्यायला हवा. कशाही असल्या तरी ‘आजी’ आहेत. अजूनपर्यंत कधीही राष्ट्रपती भवनचे अजून वीज आणि दूरध्वनी बिल भरलेली नाहीत. देशाच्या पहिल्या ‘नागरिका’चा आदर्श नको का घ्यायला? वर्ल्ड टूर बद्दल सांगायलाच नको. आणि ‘सही’ बद्दल नेहमी काय तेच जुने उगाळायचे? फुलांनो, दुसरी आदर्श व्यक्ती पंजाब दा पुत्तर देशाचे वन आणि ओन्ली ‘मौनी सिंग’. पहा ना, काय म्हणावं त्यांच्या मौनाला? आता ‘संता’चे हेच लक्षण असते. ते म्हणतात ना ‘जो जे वांछील तो ते लाहो’, तीच प्रवृत्ती. आणि इतके पाकने डिवचले पण महाराज ‘मौनी सिंग’ बाबा आपले ध्यानमग्न. हे ही नाही आवडले आदर्श म्हणून. आदर्श ऑलराऊंडर म्हणून विश्वविख्यात असलेले सरद पवार उर्फ मैदानाबाहेरचा ‘सचिन’. कुठल्या बाजूला ‘आदर्श’ केले नाहीत म्हणून सांगा? अगदी किल्लारीच्या भुकंप पासून ते आताचे ‘लवासा’. खर तर ‘लवासा तो झाकी हे, हिमालय अभी बाकी हे!’ असंच म्हणावं लागेल.

राजा हिंदुस्तानी बद्दल आता पुन्हा बोलायला नकोच. डबल ग्लुकोजचे ‘जी’ घेतलेला ‘दबंग’. ‘कोट्टी कोट्टी उड्डाणे’ घेणारा ‘आदर्श’ श्रेष्ठ. शुरेश कलमाडीला विसरलात बुवा! पुण्याचा ‘(आय)डॉल’. राष्ट्रकुलसाठी केलेले ‘शरम’ खरंच वाखाणण्याजोगे आहेत. अरे ‘शीला’ने देखील दिलेलं ‘कॉँट्रीब्युशन’ तितकचं महत्वाचे. काय बोलणार?, शीला की जवानी, .. तेरे ‘हात’ ना आनी!. चिंटू बद्दल बोलायचे राहूनच गेले की! ‘लुंगीवाले कभी तो दहशदवादी को बजा’. देशात इतके फटाके फुटले, इतकं प्रदूषण झालं! मनी मऊ रोज दंतेवाड्यात ‘रक्तचरित’ घडवते. पण आमचा चिंटू बसला ‘लूंगी’ नेसत. पहा, कसला ‘कुल’ आहे. प्रणवदा तर ‘आमार पैसा’ सोडून कायच बोलत नाही. डबल ‘जी’ आणि राष्ट्रकुल ‘दा’ ने ‘पैसे’ दिले नसते तर झालेच नसते.

सोडा, जनताही तशीच ‘मऊ’ला मांडीवर घेऊन बसते, तीच्या ‘बाडी’मध्ये. आम्हीच फक्त ‘पागोल’ आहोत म्हणा. पहा, घ्या आदर्श! कसला विचार करीत आहात? पेट्रोल बॉय ‘मुरली’ धरण! ‘हू लेट डॉग्स आर’ सारखं ‘हू लेट पेट्रोल आर’. नुसतंच पेट्रोल आणि डिझेलचे भाववाढच्या ‘हू हू’ करतो. आमचा कृष्ण कान्हाच्या ‘चीनलीला’ पहिल्याच असतील. रामगोपाल फेम जडणघडण मंत्री विलासराव आठवलेच असतील. तोच हसरा चेहरा! हम्म, तोच दोनशे लोक मारले गेल्यावरही चेहर्‍यावर ‘तोच’ हसरा भाव. कधीच नवीन वीज निर्माण करू न शकलेले ‘शुशी लकुमार’. कुठेच ‘पॉवर’ नाय. पण हे त्याचे मिनिस्टर. आमचा सीमावादाचा खरा ‘खलनायक’ मोईली अण्णा. कसले ढेकळं कायदा. काय द्यायचं ते बोला.

लवकर बोला, अजून एकाही ‘आदर्श’ला आदर्श नाही निवडलं? करा विचार! या मौनीबाबाच्या रथाची सारथी ‘सोनिया’. आणि ह्यांचा ‘शिष्ट रथ’ वेगाने आपल्या सर्व फुलांवर रोज चालून येत आहे. पहा, घ्या आदर्श आणि बोला ‘यु आर माय सोनिया’. गोंधळून जावू नका. या ‘शिवशाहीत’ किंवा ‘स्वराज्यात’ आता काय नाय राहिलं आहे. जे होत ते सुरु होण्याआधीच संपल. आता जे आहे ते ‘आदर्श’ लोकांचे राज्य आहे. त्यांना नुसते पाहून फुलांनो, काय ‘अर्थ’ नाय. आदर्श घ्या. आणि शिष्टाचार कराच. तुम्ही करू शकता..

Advertisements

4 thoughts on “आदर्श

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s