कसं विसरायचे?

आता हे रोजचेच रडगाणे आहे. ते हल्ला करतात. शे दोनशे मारतात. आम्ही नुसते पाहतो. फार फार तर चीडचीड करतो. आणि सरकार ‘शांतता’ पाळण्याचे आवाहन करते. हे सगळे मिडियावाले, राजकारणी त्या हल्ल्यांना ‘भ्याड’ म्हणते. त्यांची दहा सडक छाप, चौथी नापास पोर येतात. आमच्या इथे अंधाधुंदी गोळीबार करतात. आमची लोक मारली जातात. त्यांचे दोन लोक सीएसटीमध्ये नाचत गोळीबार करतात. त्यांच्याकडे ‘ए के फोर्टी सेवन’ आणि आमच्याकडे मेणबत्या. बर ‘कसाब’सा एक सापडतो. झालं! त्याला ३१ कोटींचे ‘पॅकेज’. ज्यांनी पकडले त्या पोलिसांच्या घरी अजून साधी मदतही मिळत नाही. तो थुंकतो काय, हसतो काय. आणि आमची कुत्र्याच्या जातीची मिडिया दिवसभर तेच तेच वर्षानुवर्ष उगाळत बसते.

तिकडे ती ‘थेरडी’. माफ करा, पण कसं विसरायचे सांगा. त्या थेरडीला सही करायला काय बिघडते? तिच्यामुळे देशाचे नुकसान होते आहे. त्या दोनशे लोकात तीचा एखादा असता तर, चालल असतं? आणि आम्ही देखील फक्त ‘प्रेक्षक’. हे देखील नेहमीप्रमाणे. त्या डीएन रोडवर, त्या गेटवे, त्या संपूर्ण भागात. त्या सीएसटी स्टेशनमध्ये कितीदा फिरलो आहे. मुळात मी मुंबईमध्ये असतांना त्याच भागात माझी कंपनी होती. तिथून इथे पुण्यात, इथे कोरेगाव पार्क मध्ये. तिथे दीड वर्ष. तोच नॉर्थमेन रोड. रोज त्या जर्मन बेकरी समोरून जायचो. सोडा, मला सांगा हल्ला झाला. त्याची नऊ माणसे मारली गेली. आपले दोनशे. काय झालं पुढे? सगळ् ‘जैसे थे’. सरकारला दोष देण्यात काय अर्थ आहे? चूक आपलीच आहे. आपण नेहमीच शांत रहातो. ना चिडतो, ना प्रतिहल्ला करतो. आणि ना तसे आपल्याला अस काही वाटते. आता अस शांत राहणाऱ्यांना भ्याड म्हणतात हे नक्की! कधी कधी वाटत, साल! नुसते अस जगण्यात काय अर्थ आहे.

देश रोज मरतो आहे. आणि आमचा ‘शेष नाग’ कधीच गांडूळ बनला आहे. आपले तेहेत्तीस कोटी देव आहेत. पण कोणताही देव निशस्त्र नाही. देव शस्त्रधारी का आहेत? शंकर पासून रामापर्यंत, हनुमान देखील शस्त्रधारी. ते देव असून शस्त्रसज्ज. आणि आम्ही ‘निशस्त्र’. नुसते शस्त्र असून देखील काय फायदा? मनाने देखील आम्ही खचलेलो आहोत. जणू जे विधात्याने आमच्या भाळी हेच लिहून ठेवले आहे. जे घडणार, त्याच्या बदल्यात आम्ही काही करू शकत नाही. अस समजून चुकलो आहोत. कुणाशी बोलतो आहे मी? मेलेल्या मनांना काय बोलून फायदा? नुसत्याच गप्पा होत आहेत. कसाबला नाही तर आता त्याच्या देशालाच फाशी द्यायला हवी. ह्याला मानवता म्हणतात. त्यांचे लोक ‘नागरिक’. आणि आपले मारलेले काय ‘जनावर’ होती काय? न्यायाची अपेक्षा मी तरी सोडली आहे. त्यांना ‘ऑर्डर’ सोडून दुसर काय येत नाही. हे विचार नेहमी, उफाळून आणतात. सरकार उर्फ शॉर्ट टर्म मेमरीवाल्या नेत्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो, कसं विसरायचे?

Advertisements

2 thoughts on “कसं विसरायचे?

  1. जशास तसे, काट्याने काटा काढावा, ही आणि अशी वाक्ये पुस्तकांची शोभा वाढवण्यासाठी नसून आचरणात आणण्यासाठी आहेत हे कोण कोणाला समजावून सांगणार?? आपल्या सर्व देवांच्या हातात शस्त्र आहे. प्राचीन धर्मग्रंथात, कथांमध्ये, पुराणात सर्व ठिकाणी अधर्माशी युद्ध करून मिळवलेल्या विजयाचे दाखले आहेत. आणि युद्धात कसलाही विधिनिषेध नसलेल्या अधर्मी शक्तींना आपणही कोणताही विधिनिषेध न बाळगता नष्ट केल्याचीही उदाहरणे आहेत. पण देशाने निधर्मी (हिंदुविरोधी) विचारसरणी स्वीकारल्यापासून आणि आंतरराष्ट्रीय शिष्टाचार आणि शांततेला अवास्तव महत्व द्यायला सुरु केल्यापासून देशाची सामरिक आघाडीवर पीछेहाट होत आहे. हल्ल्यासारख्या या गोष्टींना विसरून चालणारच नाही. उलट ते मनात ठेवूनच पुढची पावले उचलायला लागतील.

  2. हया सगळ्या गो्ष्टींचा आपल्याला इतका संताप येतो ,हया राजकारण्यांना खरच काही वाटत नसेल का…अमेरिकेवर हल्ला झाल्यावर त्यांनी काय केल पाहिल ना, पण आपल्या इथे मात्र प्रत्येक वेळी या आणि आम्हाला मारा हेच चालु राहील आहे …
    अपुर्व, मागे रामदेवबाबानीही एका मुलाखतीत तु सांगातलेले मुद्दे मांडले होते…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s