एच आर

जसा दहशतवाद्यांना कोणताच धर्म नसतो. तसा क्रेडिटकार्ड वाले, पॉलिसीवाले, लोन वाले आणि हे एच आर वाल्यांनाही काही धर्म नसतो. मागे लागले की पिच्छा सोडतच नाही. जवळपास सगळ्याचं कंपन्यांत एच आर ‘मुली’च का असतात? हा प्रश्न कायम मला पडतो. आजकाल नवीन कंपनी शोधतो आहे, त्यामुळे दिवसातून किमान दोन चार फोन येतात. कामाचा एकही नसतो. कधी क्रेडीटकार्ड घ्या, तर कधी पॉलिसी आणि नाहीतर तर एच आर. सगळ्याचं पोरी. बापरे काय बोलतो आहे मी! ते सुद्धा आज. महात्मा फुले आज स्मृती दिन आहे.

मी मुंबईत असतांना एका कंपनीच्या एच आर ने तीनदा इंटरव्यूसाठी फोन केलेला. फोन करण्यात काही हरकत नाही, पण इंटरव्यू दिल्यावर, पुन्हा इंटरव्यूसाठी ये म्हणून. पहिल्यांदी तिला गोडीत सांगितलं की माझी टेस्ट आणि माझा इंटरव्यू तुमच्या कंपनीत झाला आहे. तुम्ही चेक करा. जर पोझिटिव्ह असेल तर कळवा. ती आपली ‘हो’ म्हणाली. बर आधीही तिनेच इंटरव्यू शेड्युल्ड केलेला. म्हटलं चुकून केला गेला असेल. पण आठ दिवसांनी पुन्हा. पुन्हा तेच रिपीट केल. आणि त्यावर पुन्हा मी देखील तेच ‘रिपीट’ केल. पण पुन्हा महिन्याभराने तीचा फोन. मग तिला तीच्या नावानेच ‘हाय’ केल. मग मला कसं माहिती अस विचारल्यावर तिला घडलेला प्रकार सांगितला. मग जणू काही आपल्या बॉयफ्रेंड सोबत गप्पा मारते अशी गप्पा मारायला सुरवात केली. भयानक असतात यार! असाच प्रभादेवीच्या जवळ एक कंपनी होती. काय म्हणावं त्या बयेला. जणू माझ्यावर उपकार करीत आहे अशी ‘ऑफर’ची भाषा.

मागील आठवड्यातील गोष्ट. कुठल्याशा एका कन्सल्टन्सीने फोन केलेला. बर मी फोन नाही उचलला. तर मेसेज पाठवले. मेल पाठवला तरी मेसेज! मी इंटरव्यू जाईल अस मेला केला तरी! सकाळी ‘बेस्ट ऑफ लक्’ चा मेसेज. इंटरव्यू संपंत नाही तोच ‘इंटरव्यू कसा झाला हे मला कळव, किंवा फोनच कर..’ असा मेसेज.  पुन्हा कसा झाला म्हणून फोन. बर कधी फोन करावं? रात्री नऊ वाजता! तिला म्हटलं आपण सकाळी बोलू. बर हे एक वेळ हे तरी ठीक म्हणावे लागेल. परवा एका कंपनीच्या एच आरने फोन केला, इंटरव्यूसाठी मला एक्स्पेक्टेशन विचारले. मी सांगितल्यावर, इतके कशाला हवे तुला म्हणून फोनवरच वाद घालायला सुरवात केली. बर कोणत्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. तुझा एच आर कोण वगैरे. बर कंपनीपर्यंत ठीक आहे. पण डायरेक्ट माझ्या एचआरची पर्सनल गोष्टी कशा सांगू? कंपनीचा पत्ता मेसेज केलेला. कधी, तर रात्री साडेअकरा वाजता.

शेवटी हो नाही करीत गेलो काल इंटरव्यूला. ज्या कामाला दिवस लागेल ते काम तासाभरात करून दाखव अस सांगितलेलं. बर कोड करून दिला म्हणजे काम करून घेतल्या सारखंच की! मी आलो मग ‘टाईमपास’ करून. बर एच आर एखादा मुलगा असता तर फार काही वाटलं नसते. बर ह्याचे फोनपासून इंटरव्यू पासून ‘लटके झटके’. दोन आठवड्यापूर्वी, एका इंटरव्यूला गेलेलो. एकतर कंपनी कुठल्या टोकाला. गेलो तर ‘अप्सरा’ची आठवण यायला लागलेली. खर तर कंपनी इतक्या लांब. तिथे जायला बस नाहीच्याच बरोबर. ती कंपनी शोधतांना खूप कंटाळा आलेला. आणि कंपनी बघितल्यावर मूड गेलेला. त्यात ती एच आर पहिल्याच राउंडला आलेली. काय तिचे नखरे, काय तिची ‘बडबड’. कामाविषयी बोलायचे सोडून इतर गोष्टी. तू शॉर्ट टेम्पर आहेस, तुला कुठला रंग आवडतो? कंपनी कशी वाटली. उपकार म्हणायची ‘मी कशी वाटते?’ अस नाही विचारलं. कसाबसा तिथून सुटलो.

मागील आठवड्यात एका इंटरव्यूच्या शेवटच्या राउंडमध्ये ती एच आर! काय बुवा, जणू काही मी तीचा पाहण्याचा कार्यक्रम आहे. आणि रूममध्ये आम्ही दोघेही नव्हतो इतकं लाजायला! काय तऱ्हा असतात यार ह्या एच आर. जातांना सगळेच हस्तांदोलन करतात. रुढी परंपरा ‘प्रोफ्रेशनलीझम’च्या. सगळ्यांनी केल माझ्याशी पण ही ‘ताई’, तशीच गेली.

Advertisements

One thought on “एच आर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s