हे क्षण

काय बोलू अस झालं आहे. नुसतेच रोमांच सगळया शरीरभर उठत आहे. नुसते क्षण आठवून ही अवस्था आहे. प्रत्यक्ष असेल त्यावेळी! ऑफरसाठी एका कंपनीने फोन केला होता. म्हणजे थोडा जॉईनिंग डेटचा घोळ चालू आहे. काळजी नसावी दोन एक दिवसात त्याचा निकाल लागून जाईल. पण आता का कुणास ठाऊक तिची इतकी ओढ वाढली आहे ना! कालचा दिवस तिने इतका छान केला ना. तिचे ते इमेल. काय कळेनासे झाले आहे, ज्यावेळी ज्याची गरज असते ते तिला कळून जाते. गेले काही दिवसांपासून मी खुपच बैचेन झालो होतो. काल सकाळी सगळंच संपले अस वाटू लागलेलं. खुपंच मूड गेलेला. तीचा ते तीन इमेल आले. आणि सगळ् बदललं.

मस्त आहेत. मुळात ती मस्त आहे. त्यानंतर, एका कंपनीचा फोन. त्यानंतर त्या एका कंपनीचा ऑफरचा फोन. तासाभरात सगळ् बदलून गेल. मला पंधरा दिवसाचा नोटीस पिरेड देत आहेत. जमू शकते. पण आता तिला सोडून जावे अस मुळीच वाटत नाही. पण इथे मी कंत्राटी पेक्षा तिथे परमनंट होईल. म्हणून त्या एच आर ‘ताई’ला एक महिना लागेल म्हणून कळवले आहे. पाहुयात काय बोलते ती ‘ताई’. ते महत्वाचे नाही. अप्सराला आता मी सांगून टाकायला उतावीळ झालो आहे. मला माहिती आहे की, हे एक ‘हरलेले युद्ध’ आहे. उत्तर माहिती आहे. पण तरीही ती मला मनापासून आवडते. काय जादू आहे ती. तिचे डोळे, तिच्याशिवाय कोणीच आपले वाटत नाही. तिचीच आठवण. सगळ् स्वप्नवत. ती आली आणि सगळंच बदलून गेल. अचानक सगळ् सुंदर झालं. तिला अगदी पहिल्यांदा पहिले त्यावेळी ती आहे की स्वप्न हेच कळत नव्हते. ती माझ्या डेस्कच्या बाजूने जातांना तिची अनुभूती.

प्रेम खरंच खूप छान असते. कधी हिमालयाच्या उंच शिखरावर असल्याप्रमाणे वाटते, तर कधी समुद्राच्या तळाशी. बस प्रत्येकवेळी तिचाच ध्यास. हे घडतं किंवा कसं होते याचा मात्र शोध लागत नाही. म्हणजे अचानक अगदी स्वप्न सत्यात घडावं. मी काय बडबडतो आहे. अजून थोडे दिवस. मग नाही. तिला सांगितल्यावर कदाचित ती मला ‘आकाशातून’ जमिनीवर आणेल. पण हरकत नाही. तीचे असणे, तिचे माझ्याशी बोलणे हे माझ्यासाठी स्वर्गीय अनुभव आहेत. आयुष्यभर मी ते जपून ठेवील. ती इतकी सुंदर आहे ना! आणि ते पाणीदार डोळे, तिची नजर.. नाहीत माझ्याकडे काही शब्द. तिचे ते केस, तिचे हसणे, तिचे बोलणे! अहाहा. बस आता महिनाभर सगळ् डोळ्यात साठवून ठेवत आहे. पुन्हा ती कधी भेटेल देव जाणे. जबरदस्त दिवस होते सर्व.

ती एकदाचं, एकदाचं का असेना ती माझ्या डेस्कवर आलेली माझ्याशी स्वतःहून बोललेली. त्या सुंदर स्वप्नाचे बोलणे. कोणीतरी मला गुदुगल्या करीत आहे. तिथेच नाचावं अस वाटत होते. ती बोलतांना, कानात मध ओतत असल्याप्रमाणे! ती हसतांना, आहाहा! काय क्षण असतात. आणि ती ज्यावेळी समोरून जात असते त्यावेळी अंगावर उठणारे रोमांच. अगदी पावसात भिजल्याचा आनंद. अतिशयोक्ती काहीच नाही. मी खरंच अनुभवतो आहे. मलाही अजून हे स्वप्न असल्याचे भासते आहे. हाच एक विषय ज्यावर मी कधीही आणि कितीही वेळ न थकता बोलू शकतो. मन इतकं वाहून कसं गेल? अजूनही आठवलं की हसू येत. हे क्षण कधीही न विसरू शकणारे. तीचा नकार असेल तरी मी दु:खी होणार नाही. आणि ना ते हिमेशची गाणी ऐकेल. आणि ना ‘बेवडा हीरो’ बनेल. आणि ना पुन्हा याविषयावर बोलेल. अर्थहीन आयुष्य तीच्या असण्याने अर्थपूर्ण झाले. तेच रोज रटाळ जीवन अगदी हजार किमीच्या वेगाने धावू लागले.

असो, तीची भक्तीची ही देणगी आहे. अजून मला काय हवं आहे. पण हेही खर की हे स्वप्न माझ्यासाठी आहे. माझ्यासाठीच आणि फक्त माझ्यासाठीच ‘स्वप्न’ सत्य व्हावे अस खूप वाटते. मनातून हीच इच्छा आहे. पण वस्तुस्थितीची जाणीव आहे. हे सोन्याचे दिवस मी जपून ठेवील. हे क्षण अनमोल क्षण आहे.

Advertisements

12 thoughts on “हे क्षण

 1. नवीन नोकरीसाठी आपल्याला शुभेच्छा….

  आणि तिच्यासमोर आपले मन मोकळे करण्यासाठीही अनेक शुभेच्छा..
  All the Best

 2. mala vatat ki tumachya blog madhe aata toch to pana aala aahe…
  gele kitek diva..nahi kitek mahine tyach vishayavar tumhi lihata aahat…
  bt no progress at all….
  mala vatat aata tumhi vegal pan kahi tari blog var lihala pahije…

 3. मला तर ब्लॉग इंटरेस्टिंग होत आहे असे वाटतेय.रोज मी आज हेमंतने काय केले? त्याला अप्सरा भेटली का नाही? हे वाचण्यासाठीच ब्लॉगला भेट देतो.
  हेमंत तू ज्या दिवशी अप्सरासमोर आपले मन मोकळे करशील त्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे.तो अनुभव वाचायला अगदी उत्सुक आहे.

 4. १) इतके महिने या विषयावर लिहून
  २) हपीसातल्या मित्रांना माहीत असून
  ३) ट्विटरात “तिच्याविषयी” चिवचिव करुन
  ४) आंतरजालावर अनेक सोर्सेसवर ही माहिती उघड होऊन
  ५) ब्लॉग वरचेवर पोस्ट येत असल्याने नेहमीच टॉपवर असून
  ६) तिच्यासमोर घाबरटपणा दाखवून आणि नियमित नर्व्हस होऊन

  तरीही

  १) अप्सरेने स्वतः याच्या नावाची आंतरजालावर साधी सर्च मारली नसेल
  २) एकाही मित्राने, तिच्या ओळखीच्या मराठी वाचकाने, कलिग्जमधे कोणी तिला ही माहिती सांगितली नसेल
  ३) अप्सरेला हपीसातील भप्पकन पेटणार्‍या कापरासारख्या असंख्य गॉसिप्समधून याचं वेड्यासारखं वागणं कळलं नसेल.
  ४) अप्सरेला सर्व काही नव्यानेच कळेल आणि धक्का बसेल
  ५) तिने असा विचारसुद्धा कधी केला नसेल.

  असं सर्व मानणं

  याला:

  १) डोळे मिटून दूध पिणं.
  २) जगातील सर्वोच्च आशावाद किंवा निराशावाद (ज्या बाजूने बघावं तसं)
  ३) कमालीचा बावळटपणा
  ४) टोकाचा भोळसटपणा
  ५) विशफुल थिंकिंग

  यांपैकी काहीही एक म्हणता येईल.

  शुभेच्छा..

  आमेन..

 5. नचिकेत, कॉमेंट खूप आवडली…मस्तच विश्लेषण आहे.
  मला आता असं वाटू लागलं आहे की अशी कुणी अप्सरा बिप्सरा नाहीच आहे, हेमंत उगीच आपल्याला फिरवतोय!
  किंवा असेलही तरी बाकी सगळ्या गोष्टी इमॅजीनरी आहेत.

 6. “नचिकेत, कॉमेंट खूप आवडली…मस्तच विश्लेषण आहे” — सहमत

  “मला आता असं वाटू लागलं आहे की अशी कुणी अप्सरा बिप्सरा नाहीच आहे, हेमंत उगीच आपल्याला फिरवतोय!”— आरती,मलाही हे अगदी असेच वाटायचे. पण हेमंत ज्या गोष्टी लिहितोय त्या कोणाच्यातरी बाबतीत खर्‍या आहेत, Believe me.
  मी हेमंतला Personally ओळखत नाही, पण त्याची ‘डोकेदुखी’ सोडली तर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कोणाच्यातरी बाबतीत घडतायत, आणि हे असं काही तुझ्या बाबतीत घडलं ना तर तुला कळेल…

  आणि हेमंत,

  तुझ्यासाठी कितीतरी शुभेच्छा आहेतच…

  —प्रिया.

 7. अर्थातच सत्यतेविषयी शंका नाहीच. इतकं मनापासून लिहिलंय.

  फक्त त्याचं अत्यंत जास्त पब्लिक पब्लिकेशन होऊनही तिला अजूनही “कायबी कळलंच नसेल” अशी अपेक्षा भोळेपणाची आहे.

  शुभेच्छा आहेतच

 8. ती बोलतांना, कानात मध ओतत असल्याप्रमाणे!<<<<<< 😀 हसून हसून पुरी वाट…..मुंगी आणि हत्तीची गोष्ट आठवली, बाकी तुझ्या नव्या जॉबसाठी आणि अप्सरेसाठी शुभेच्छा ! 🙂

 9. नचिकेत एकदम बरोबर…

  हेमंत, गेले एक वर्ष मी हा ब्लॉग वाचतोय. मित्रा तुला आता “आर या पार” करावच लागेल. जे होईल त्याचे परिणाम, चांगले किवा वाईट भोगायला तय्यार रहायला हव, कारण जे पण होईल त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असशील.
  ना तो देव, ना ते नशीब ना ती अप्सरा…बघ विचार कर 🙂
  मनापासून शुभेच्छा..

  – सुझे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s