ब्लॉग

इतक्या उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. माझा संगणक गेल्या काही दिवसांपासून ‘कोमात’ गेला असल्याने बोलणे शक्य नाही झाले. पण सर्वांच्या प्रतिक्रिया मी माझ्या मोबाईलवरून नियमित वाचत होतो. सर्वांच्या प्रतिक्रिया मला मान्य आहे. माझ्याकडून खूपच गोंधळ आणि रटाळपणा चालू आहे. जवळपास गेल्या दीड वर्षात ब्लॉगबाळ ३६३ पावले, म्हणजे ही नोंद पकडून ३६४ पावले दुडूदुडू धावला. त्यातील साठी पेक्षा अधिक नोंदी तिच्यावरच आहेत. गेल्या चार महिन्यात मी ‘अप्सरा’ सोडून इतर विषयावर खूपच कमी बोललो, हे खर आहे. प्रत्येक नोंदीत तेच तेच आणि तोच तोच पणा आला, हे देखील खर आहे.

पण ‘अप्सरा’ ही काही फॅंटेसी नाही. ती आहे. आणि मी कथाकार, कादंबरीकार नाही. यात काही खोटे नाही. उलट मी जे तिच्याबद्दल ‘अप्सरा’ विशेषण वापरतो. त्या ‘अप्सरा’ विशेषणाहून ती खूप सुंदर, आणि त्याहीपेक्षा खूप पटीने प्रेमळ आहे. अरे! मी पुन्हा सुरु झालो. कृपया मी तुम्हाला ‘फिरवत’ नाही. खर सांगायचे झाले तर, माझे मनच ‘अप्सरा’च्या भोवती फिरते आहे. अगदी आकाशगंगेतील ग्रहांप्रमाणे. खर तर मी आधीही बोललो होतो, आणि आताही बोलतो. माझा ब्लॉग हे माझे मन आहे. जी गोष्ट माझ्या मनात असते तेच ब्लॉगवर असते. मला हे देखील माझा ब्लॉग वाचून कोणीही माझ्या मनात काय चाललेलं आहे हे सहज जाणून घेऊ शकते. माझ्या कंपनीतील माझ्या मित्रांना हा ब्लॉग माहिती आहे. अशी शंका देखील येऊ शकते की, तिच्या मित्रांपैकी कोणाला माझा ब्लॉग कळला असेल तर ते तिला सांगतील.

कदाचित ती माझ्या नावाने शोध घेतल्यास हा ‘ब्लॉग’ तिला शोधणे सहज शक्य आहे. कदाचित तिला माझा ब्लॉग माहिती असेल! पण या सर्व ‘जर तर’च्या गोष्टी आहेत. तिच्या नावाने तिने नेटवर शोधले तर माझा ब्लॉग सापडणे शक्य नाही. माझे वागणे पाहून तिला कदाचित कळले असेल, असे देखील घडू शकते. परंतु हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी तिलाही माझ्याबद्दल असेच वाटेल. तिचे मित्र, तिचा ग्रुप आणि मी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मी निगेटिव्ह विचार मुळीच करीत नाही. मुळात माझ रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ आहे. असो, ह्या विषयावर फार चर्चा करत बसण्यात काहीही अर्थ नाही. मी जसा आहे, तो असाच आहे. माझ्यामुळे तुम्हाला झालेला त्रासाबद्दल क्षमा मागतो. मागील शनिवारी वडिलांनी अचानक स्थळाचा कार्यक्रम ठेवला होता.

असो, तो ‘पाचवा’ आणि आज संध्याकाळी ‘सहावा अध्याय’ होत आहे. या गोष्टींमुळे मला खरच खूप बेकार वाटत आहे. तिच्याशी मी गद्दारी करतो आहे, अस वाटत आहे. मी, ती समोर असतांना गेल्या दोन दिवसांपासून एकदाही नजरेला नजर भिडवली नाही आहे. कदाचित, या सर्व गोष्टी ‘फालतू’ असतील. परंतु माझ्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. मला संगणकाची इच्छा व्हायला, आणि घ्यायला एक दुपार, मोबाईल घ्यायला पाच तास, घर घ्यायला सहा महिने लागले. पण त्या सर्व निर्जीव वस्तू होत्या. आणि ते घेतांना मी असा काही वेडा वगैरे झालो नव्हतो.

आता फक्त तीच! मी खरच खूप गोंधळून गेलो आहे. वेळ संपला आहे. एकदा ते ऑफर लेटर आले की रिझाइन करावे लागेल. हा डिसेंबर शेवटचा.. भविष्यात काय घडेल काही सांगता येत नाही. कदाचित मी तिला आवडेल, कदाचित ती नाराज होईल. परंतु जे होईल ते होईल. तिला मनातील सांगितल्याशिवाय मी माझा कोणताही महत्वाचा निर्णय घेणार नाही. लग्नाची घाई मला नाही, माझ्या घरच्यांना आहे. जर माझे भाग्य असेल तर, कदाचित ती ‘हो’ देखील म्हणेल. तिच्या इच्छे विरुद्ध कोणताच निर्णय मी घेणार नाही. जरीही तिचा नकार असेल तरीही. असो, अन्यही विषय महत्वाचे होते. परंतु ही ब्लॉगबद्दल आणि अप्सरा बद्दलची संभ्रमावस्था, निर्माण झाल्याने माझे मत सांगणे, मला महत्वपूर्ण वाटले. बाकी बोलूच.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s