वर्ष

काय दिवस होता कालचा! सही! मागील वर्षी म्हणजे सात डिसेंबर २००९ला ही कंपनी जॉईन केलेली. थोडक्यात वर्ष झाले. काय बोलू? हे एक वर्ष म्हणजे ‘पिकनिक’ होती. म्हणजे तशी अजूनही चालू आहे. ते म्हणतात ना ‘नाव मोठ आणि लक्षण खोट’ तसं अगदी. कंपनीच्या इमारती आणि इथल्या सुविधांबद्दल काहीच वाद नाही. अतिशय उत्तम आहे. परंतु इथली जत्रा पाहून अचंबा वाटतो. मागील सात डिसेंबर २००९ ला सकाळी सव्वा सातला आलेलो. आठ वाजता येण्याचे सांगितलेलं. मस्त धुक्यात टिवल्या पावल्या केलेल्या. पुढचा इतिहास उगाळत नाही. पण एकूणच छान अनुभव. तो दिवस आणि कालचा दिवस. खर तर कालच या विषयावर बोलणार होतो. परंतु, तो माझा सखा उर्फ लॅपटॉप कोमात असल्याने गेल्या काही दिवसांपासून इच्छा असून बोलता येत नाही. काल अप्सरा आणि मी ब्रेक आउट रूममध्ये जवळपास पंधरा एक मिनिटे बोलत होतो.

काय सांगू! एकदम मस्त. तिच्या असण्याने वर्षाचे सेलिब्रेशन झाल! माझ्या जवळ बसलेली. स्वप्नात देखील अस कधी घडेल अस वाटलेलं नव्हत. इतक्या जवळून प्रथमच! किती सुंदर आहे ती! कदाचित तिनेही मला इतक्या जवळून माझे रूप पहिल्याने म्हणून, मला ‘तुम्ही’ म्हणत होती. पण ते काहीही असो, तिच्याशी बोलल्यावर खूप छान वाटते आहे. अरे, विषयाबद्दल बोललोच नाही. ते पाचवा अध्याय आणि सहावा अध्यायाने जरा टेन्शन वाढवलेल. लक्षात आले ना? ते पाचवे स्थळ. कुठेच चान्स नव्हता ‘नकार’ द्यायला. मुलगी एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. पगारही चांगला. शिक्षण मास्टर डिग्रीपर्यंत. दिसायलाही चांगली. बोलणे देखील व्यवस्थित. तिचे आई वडील आणि त्यांचे एकूणच स्वभाव चांगला. थोडक्यात सर्व चांगल आहे. त्यात छत्तीस गुण जुळलेले.

तिच्या वडील काय पक्क होकार ठरवून आलेले. आई आणि ती थोडी कन्फ्युज वाटली. मग काय माझे पॉज़िटिव पॉइंटला निगेटीव्ह पॉइंटचा मुलामा देऊन सांगितले. तसं सुरवात फूस झालेली. तिला म्हटलं मी या कंपनीत ‘कंत्राटी’ नोकरी करतो. वाटल ती गडबडून जाईल. पण ती उलट ‘मी देखील ‘कंत्राटी’च नोकरी करीत होते. आताच दोन महिन्यापूर्वी परमेनेंट झाली’. झाल! म्हटलं आता मुख्य कारणच संपले. पण काही अडचण नाही. हळू हळू गाडी वळवली. आता गेल्या तीन दिवसात त्यांचा काही वडिलांना फोन आलेला नाही. त्यामुळे बहुतेक, माझी मेहनत कामी आली असे वाटते आहे. सहावे स्थळ, फार काही बोलत नाही. आमच्या दोघांचा जोड ‘विजोड’ वाटत होता. म्हणजे ती छान नाही अस नव्हते. फक्त काय बोलतात ते ‘हेल्दी’ होती. थोडे स्वतःकडे लक्ष दिल तर ती अजूनही खूप छान दिसेल. तिथे ३१ गुण जुळलेले. त्यामुळेच फार टेन्शन वाढलेलं. पण आता नाही.

काल मित्रासोबत बराच वेळ ह्याच विषयावर गप्पा मारत होतो. तो मला, खर बोलायचे झाले तर जवळपास सर्वच मला हेच सांगत आहेत की! ‘अप्सरा’ मिळण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. त्यामुळे, चांगली स्थळ नाकारू नको. काल खूप वेळ चर्चा केल्यावर थोड्या वेळासाठी मी गोंधळलो होतो. वाटल माझा निर्णय चुकीचा आहे की काय. पण नंतर व्यवस्थित विचार केल्यावर निर्णय योग्यच आहे. आता ‘ती मला मिळेल’ असा विचार मी कधीच केला नव्हता. मला माहिती आहे, ती मिळणे अशक्य आहे. पण मला ती माझीच वाटते, अगदी पहिल्या दिवसापासून. काल दुपारी जेवणानंतर ब्रेक आउट रूममध्ये, माझा मित्र आणि मी दुपारी याच तिच्या विषयावर बोलत होतो. तेवढ्यात ती फोनवर बोलत तिथे आली. सकाळी देखील पॅंट्रीमधून तिचा विचार करीत निघालो, तर ती समोर! मला साध हाय सुद्धा बोलता आलेलं नव्हते.

दुपारी आल्यावर मी एक टोकाला आणि दुसर्या टोकाला बसलेली. मी तिच्याकडे पहिले त्यावेळी तिचे लक्ष माझ्याकडे. मग हात हलवून हाय केल. मग पुन्हा तिच्याकडे पहायची हिम्मतच होईना. म्हणजे इच्छा खूप होत होती. पण तिचे लक्ष माझ्याकडे असेल तर.. म्हणून! आणि जिचा विचार करावा तीच समोर म्हटल्यावर. असो, तिच्या फोनवरील बोलण्यावरून तिचा लॅपटॉप खराब झाल एवढे कळले. तिचा फोन झाल्यावर तिला लॅपटॉप खराब झाला का म्हणून विचारले. ती ‘हो’ म्हटल्यावर, तिच्या माझ्या जवळ येऊन बसली. तिने सांगितले की तिचा लॅपटॉप चालूच होत नाही. एक मेसेज येतो ‘बूट.इक्सइ इझ नॉट फाउंड’. आता हा व्हायरस आहे. असो, तिला हे मी सांगितले नाही. तिला तिने केलेले उपाय विचारले. ती आज सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन नीट करून घेणार आहे. ती खूपच छान आहे.

बापरे! किती बडबडतो आहे. थोडक्यात, तात्पर्य सांगतो, यार तिचा स्वभाव, बोलणे. माझी कॉपी आहे. पण थोडीशी स्वतःवर नाराज असणारी. बोलतांना तिचा चेहरा. आणि तिचे सौंदर्य आहाहा! ती इतकी छान आहे, पण बोलतांना कुठेच गर्व नाही. कुठेही कोणाला कमी न लेखणारी. मला म्हणाली ‘मी जी गोष्ट प्रथम घेते ती खराब होते’. अजूनही ते आठवल की हसू येते. पण एक मस्त! माझा लॅपटॉप आणि तिचा लॅपटॉप एकाच कंपनीचा. असो, त्या लॅपटॉपचे प्रोब्लेम मला माहित आहेत. ती वैतागलेली, म्हणून जास्त सल्ले दिले नाही. बोलतांना मोबाईलचा विषय तिने काढलेला. पण! माझ्या लक्षात आले नाही. तिचा मोबाईल नंबर मागण्याची संधी घालवली. पण काहीही असो! मागील जन्मी काहीतरी पुण्य केले होते मी. म्हणून इतका स्वर्गीय अनुभव आला. मागील एका वर्षातील सर्वात सुखद अनुभव.

अरे, काय विषय आणि काय बडबडलो! हाहाहा! ते दुसर्या ऑफरसाठी उद्या संध्याकाळी जायचे आहे. एकूणच वर्ष कसे गेले कळलेच नाही. आज कंपनीला ‘प्रेमपत्र’ टाकतो आहे.

Advertisements

7 thoughts on “वर्ष

 1. कसं सांगू तेच कळत नाही. आत्ता पटणं इतकं कठीण आहे की सांगण्यातच अर्थ नाही दोस्ता की तू तुझ्या लाईफची वाट लावून घेतोयस..

  स्वप्नाच्या पाठीमागे धावतोयस. खरं तर धावतही नाहीयेस. नुसती कल्पना करतोयस आणि सत्यात समोर आलेलं लाईफ वाहून जाऊ देतोयस.

  खरोखर मित्रा..अगदी खरोखर.. वाटलं तर आईबाबांच्या थ्रू एका रेग्युलर मुलीसारखी अप्सरेच्या घरी मागणी पोहोचव पण असा अधांतरी राहू नको.

  नसेल होणार ते स्वप्न खरं तर सांगून आलेल्या मुलींपैकीही कोणी तुझ्या आयुष्याचा स्वर्ग करेल. खात्री बाळग.
  लग्न आणि लाईफ हे स्वप्नाळू प्रेमापेक्षा खूप वेगळं आहे यार.

  ..आत्ता नाही पण नंतर पटेल कधीतरी तुला काय म्हणतोय ते.

 2. मी नचिकेतशी पूर्णपणे सहमत आहे.अप्सरेच्या नादात तू चांगली स्थळे हातातुन घालवशील.

  >>मग काय माझे पॉज़िटिव पॉइंटला निगेटीव्ह पॉइंटचा मुलामा देऊन सांगितले. तसं सुरवात फूस झालेली. तिला म्हटलं मी या कंपनीत ‘कंत्राटी’ नोकरी करतो. वाटल ती गडबडून जाईल. पण ती उलट ‘मी देखील ‘कंत्राटी’च नोकरी करीत होते. आताच दोन महिन्यापूर्वी परमेनेंट झाली’.

  मित्रा.. तिच्या ह्या समजुतदारपणाचे खरेतर कौतुक करायला हवे.

  मी असे म्हणत नाही कि केवळ एका बैठकितच तू लग्नाचा निर्णय घ्यावास.पण कमीत कमी स्वतःला व ह्या मुलीला एक संधी द्यायला हवी होतीस.

  तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s