किती कठीण..

ती दुपारी ऑफिसात येते. तिचा आणि माझ्या ड्रेसचा रंग सारखा. मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा असते. पण कस? सुचत नाही. कॅन्टीनमध्ये मी मित्रांसोबत जेवायला बसतो. सर्वजण गप्पात रंगलेले असतात. मी तिच्या येण्याची वाट पाहत असतो. ती येते.. ती कोमल, ती सुंदर! ती गोड, ती छान! पाहून मी सुखावतो आणि हालहाल सुरु होतात. अगदी पहिल्यांदा पहिले त्यावेळी जस झाल होत तसं! तसं हे आता ‘नेहमीचेच’. मग तिच्याच आठवणी. जेवणानंतर, डेस्कवर बसल्यावर तिला पाहणे हाच ‘एक कलमी कार्यक्रम’ सुरु होतो. तिच्याशी कस बोलू? तिच्या डेस्कवर कसा जाऊ? काय कारण सांगू? सगळा विचार करतो. पण.. हा ‘पण’ मध्ये येतो.

दुपारच्या चारच्या आसपास ती मला पिंग करते. तसं आदल्या दिवशी ती मला तिच्या ‘लॅपटॉप’ रिपेअर करण्यासाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जाणार अस बोलून गेलेली. ती मला पिंग करून ‘मी आज लॅपटॉप रिपेअर करण्यासाठी सर्व्हिस सेंटर मध्ये दिला’ अस सांगते. मी तिला तुझ्या लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे अस सांगतो. आणि ती मला ‘मी आज एक वाजता एक वाजता आले’ अस सांगते. मी इकडे तिच्या या बोलण्याने घायाळ होत असतो. मी तिला एका एन्टीव्हायरसचे नाव सांगतो. ती मला त्याचा सेटअप माझ्याकडे आहे का? अस विचारल्यावर मी तीला ‘तुझ्याकडे इंटरनेट आहे का? तो एन्टीव्हायरस फ्री आहे’ अस बोलतो. तिचे उत्तर येण्याच्या आत मी तीला ‘नसेल तर मी तुला सेटअप पेन ड्राईव्ह मध्ये देतो’ अस बोलून मोकळा होतो. तिच्याकडे इंटरनेट नाही अस ती सांगते. ती एका कंपनीच्या इंटरनेटबद्दल मला विचारते. मी तीला, मी ज्या कंपनीचे इंटरनेट वापरतो त्याबद्दल सांगतो. आणि तिने सांगितलेल्या कंपनीच्या इंटरनेटबद्दल माहित नसल्याचे सांगतो. मी तीला ‘तू त्या कंपनीचे इंटरनेट घेण्याचे ठरवते आहेस का?’ अस विचारतो. ती ‘नाही, फक्त ऑफर होती’ म्हणते.

मी तीला माहिती असलेल्या इंटरनेट देणाऱ्या कंपन्याची मला माहिती असणारी माहिती तीला सांगतो. पण तिचा रिप्ल्याय येत नाही. मी गडबडून तिच्या डेस्ककडे पाहतो. तिचा सिनिअर तिच्या बाजूला डेस्कजवळ बसलेला असतो. माझा एक मित्रही माझ्या डेस्कवर आलेला असतो. पण तिच्या डेस्कवरून तिचा सिनिअर आणि माझ्या डेस्कवरून माझा मित्र हलायला तयार नसतो. माझी घरी निघण्याची वेळ येते. मी माझा संगणक बंद करून मित्रासोबत निघतो. कॅन्टीनमध्ये ती तिच्या ग्रुप सोबत दिसते. किती छान दिसत असते. मी पाहून न पाहिल्याप्रमाणे करतो. घरी आल्यावर मित्राकडे जावून नवीन आणलेला पेन ड्राईव्ह उघडतो. आणि सेटअप डाऊनलोड करतो. रात्रभर तिच्याशी काय बोलू? कस बोलू? काय कारण काढू? सर्व काही ‘प्लान’ करतो.

दुसर्या दिवशी सकाळी लवकर कंपनीत येऊन तिची वाट पाहत असतो. पण हा ‘क्षण’ युगापेक्षाही हळूहळू चाललेला असतो. मी तीला असेच दोन एक इमेल टाकतो. ती येते. पण.. पुन्हा हा ‘पण’ येतो. माझ्या जुन्या कंपनीतील माझ्या सहकारीला जीटॉकवर ती आल्याचे आणि तीला मी आज सेटअप देणार असल्याचे सांगतो. ती ‘मला ताबडतोप जा. आणि बोल तिच्याशी, आणि पेन ड्राईव्हसुद्धा दे’ अस सांगते. मी मनाची तयारी करतो. पण ज्यावेळी तिच्या डेस्ककडे पाहतो त्यावेळी ती तिच्या मैत्रिणीसोबत पॅंट्रीकडे निघालेली असते. मी तीला न्याहाळत असतो. ती पुन्हा डेस्कवर येते त्यावेळी, मी पुन्हा मनाची तयारी करतो. पण थोड्याच वेळात तिची दुसरी सिनिअर तिच्या डेस्कवर येते. झाल! बराच वेळ थांबते ती तिथे. त्यांनंतर मी पुन्हा मनाची तयारी करून उठणार तेवढ्यात, ती वानरसेना तिच्या डेस्कवर! थोड्या वेळाने तिचा एक इमेल येतो. पाहून मी गोंधळून जातो. ‘गर्लफ्रेड बॉयफ्रेंड’वर जोक असतात. मग राहवत नाही. तिच्या डेस्ककडे जाण्यासाठी मी निघतो. पण ती! कोणाच्या तरी डेस्कवर ‘स्वीट’ घ्यायला गेलेली असते. नंतर ती वानरसेना लवकर तिचा पिच्छा सोडत नाही. त्यानंतर तो ‘नारळ’. नक्की मी एकदा त्या नारळाला फोडणार आहे.

माझा राग अनावर झालेला असतो. पण मी काहीच करू शकत नसतो. दुपारी कॅन्टीनमध्ये तिची वाट पाहतो, पण ती येत नाही. दुपारी जेवण झाल्यावर एका कंपनीचा इंटरव्यूसाठी फोन येतो. मी मित्राच्या संगणकावरून इमेल करीत असतो. ती तिच्या मैत्रिणीसोबत पॅंट्रीकडे चालेली असते. काम झाल्यावर मी सहज ती कुठे म्हणून लक्ष देतो, तर त्या दोघी कोणत्या तरी मित्रांसोबत गप्पा मारीत असतात. का कुणास ठाऊक, मला खूपच बेकार वाटायला लागते. अगदीच उदास. मी तिथून काहीच न बोलता माझ्या डेस्कवर येऊन बसतो. नेहमीप्रमाणे ‘डोक’ दुखायला लागते. नंतर नंतर खूपच त्रास वाढतो.

थोड्या वेळाने मित्राची हाक ऐकू येते. त्याच्यासोबत बोलण्याने मन हलक होते. तो पुन्हा जाण्याची हिम्मत देतो. पण, पुन्हा तिचा सिनिअर कामासाठी म्हणून तिच्या डेस्कवर आणि ती त्याची डेस्कवर. मी ती पुन्हा तिच्या डेस्कवर येऊन बसण्याची वाट पाहतो. माझी जाण्याची वेळ होते. पण ती तिच्या डेस्कवर नसते. शेवटचे दहा मिनिटे उरतात. मी पुन: एकदा हिम्मत करून ती ज्या ठिकाणी बसलेली आहे तिथे जाण्यासाठी निघतो. पण.. हा ‘पण’ पुन्हा येतो. मी वॉशरूम मध्ये माझा मोर्चा वळवतो. शेवटच तीन मिनिटे उरतात. शेवटी कशीबशी हिम्मत करून मी तिच्या जवळ जातो. तिच्याशी बोलतो देखील. पण बोलतांना, वाटणारी भीती, अंगात त्यावेळी साथ सोडणारी ताकदमुळे मी थोडेफार जे काही बोलतो, ते देखील तोंडातल्या तोंडात.. पण तीला कसेकाय कळत असते, कुणास ठाऊक! ती पेन ड्राईव्ह घेते. जणू काही हिमालय चढला याप्रमाणे मी थकून रात्री झोपी जातो. किती कठीण कठीण…

Advertisements

5 thoughts on “किती कठीण..

  1. >> नक्की मी एकदा त्या नारळाला फोडणार आहे.

    हा हा हा.. पहिल्यांदा या ब्लॉगवर ‘कुछ मर्दोवाली बात’ वाचायला मिळाली.. !

  2. आज तू ‘त्या क्षणी’ होणार्‍या मनाच्या अवस्थेचं अगदी सुंदर पद्धतीने चित्रण केलं आहेस. खूप आवडलं! अगदी जवळचं वाटलं! छान लिहिलं आहेस! कदाचीत तुझ्या प्राप्त परिस्थितीतून तुला काही मिळणार नाही. पण भविष्यात अनेकांना या शब्दांचा आधार मिळेल, मला विश्वास आहे. लिहित रहा!

  3. तो मूर्ख आणि बावळट नाहीये! ती त्याच्यासाठी इतकी ‘अनमोल’ आहे की, ती दूर जाईल या विचाराने तो काहीच करु शकत नाही. अगदी स्वतःला ‘त्या क्षणात’ सावरु देखील शकत नाही. प्रपोज कर म्हणनं सोपं आहे.. आत्ताच्या क्षणी तोच त्याचे हाल जाणत असेल!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s