अगदी छान

अगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर!!! नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान! अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. माझा मित्र मला नाश्ता करायला बोलावत होता. त्याला थोड्या वेळ थांब म्हणालो. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तसं तशी, माझी हालत खराब होत होती. तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. आज तिने इतक्यांदा पिंग केल आहे ना! मला मी हवेत असल्याप्रमाणे वाटत आहे.

दोन दिवसांचा विरह आणि आलेली बेचैनी सगळी कुठल्या कुठे पळून गेली आहे. आज ती माझ्या डेस्कवर आली. पेन ड्राईव्ह दिल्यावर तिला मी विचारलेलं की, तुझा लॅपटॉप रिपेअर झाला का?. तर ‘हो’ बोलली. मला म्हणाली ‘ते प्रिंट स्क्रीन चालते आहे, अजून काय म्हणाला होतास?’. मी तिला लॅपटॉपचे प्रिंट स्क्रीन चालत नाही अस म्हणून बोललेलं. तिला म्हणालो ‘डीव्हीडी रायटर’. तर ती’हा, ते चेक करते’. तिला म्हटलं अजून काय केलस?. तर म्हणाली ‘मी एक डीव्हीडी आणली. आर्ट फिल्मची’. तिला पेन ड्राईव्हमध्ये दे म्हणालो. ती म्हणाली ‘आता नको. नेक्स्ट विकमध्ये घेईल’. का विचारल्यावर ती उद्यापासून गावाला चाललेली आहे. तिला घरी जाणार का अस विचारल्यावर नाही म्हणाली. फिरायला जाणार अस म्हणाली. नंतर पुन्हा ती डेस्कवर गेल्यावर पिंग करून ‘मी नेक्स्ट विक मध्ये तुझा पेन ड्राईव्ह घेईल’ अस म्हणाली.

मी तिला माझ्याकडे देखील काही मुव्हीज आहेत अस म्हणालो. तिने कोणत्या विचारल्यावर ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’, ‘हॅरी पॉटर’ आणि अजून एक दोन चित्रपटांची नावे सांगितली. ती म्हणाली ‘इंग्लिश नको’. असो माझ्याकडे इंग्लिश टू हिंदी डबिंग मुव्हीज आहेत अस सांगितल्यावर, चांगली क्वालिटी असेल तर घेईल अस बोलली. किती मस्त! तिला म्हटलं व्हेरी गुड नाही पण गुड क्वालिटीच्या आहेत. मग ठीक आहे म्हणाली. पुढच्या आठवड्यात ती येईल त्यावेळी तिला मी माझी हार्ड डिस्क देईल. नंतर पुन्हा पिंग करून मला तीन तिला आलेले प्रोब्लेम विचारले. पण मला एकही वेळेत सोडवता आला नाही. काय यार, इतकी छान संधी घालवली.

असो, मी मागील आठवड्यात या कंपनीला ‘प्रेमपत्र’ पाठवलं आहे. माझ्याकडे दोन ‘ऑफर’ आहेत. पाहूयात, माझा थोडा गोंधळ झाला आहे की, कोणती फायनल करावी म्हणून. खरच डोकच चालत नाही आहे. म्हणजे आजचा दिवस स्वप्नापेक्षाही सुंदर. तिने मला पिंग केलेलं. माझ्या डेस्कवर आलेली आणि मी देखील तिच्या डेस्कवर गेलेलो. थोडी हिम्मत वाढली आहे. बस दुख: या गोष्टीचे आहे की आठवडाभर ती येणार नाही. कसा जाणार हा आठवडा. आज दोघांचे ड्रेसचे रंग देखील सारखे. मी बाईक घ्यायचे ठरवतो आहे. त्यामुळे मोबाईल पुन्हा एकदा पुढे ढकलतो आहे. असो, खूप खूप बोलावस वाटत आहे. पण.. ए तिचा पुन्हा पिंग… ती खूपच गोड आहे. काय बडबड केली. माफ करा, मला काहीच कळत नाही आहे. आपण नंतरच बोलू.

Advertisements

3 thoughts on “अगदी छान

  1. हेमंत तुझा ‘अप्सरा’ हा लेख http://marathi-indian.blogspot.com/2010/07/blog-post_3406.html या इथे तुझ्या नावाशिवाय चोरण्यात आला आहे. तुला याने काही फरक पडतो की नाही मला माहित नाही. पण मी आपलं सांगायचं कर्तव्य केलं. बाकी मी त्या ब्लॉगखाली कॉमेंट टाकून तो लेख तुझा आहे आणि लवकरात लवकर काढून टाकावा असं सांगितलं आहे. त्याने माझाही लेख चोरला आहे आणि अनेकांचा चोरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s