उदास

आज खूपच जास्त बोर झाले आहे. म्हणजे तसा मी ‘बोरकर’च आहे. पण आज जरा जास्तच बेकार वाटत आहे. कालचा दिवस आणि आजचा. थोडक्यात दोन टोक. म्हणजे धो धो पावसात चिंब भिजावं. सगळ शरीर रोमांचून निघावं. आणि अचानक कडक तळपत्या उन्हात शरीर भाजून निघावं. काल ती! यार खूप आठवण येते आहे. कस होणार कंपनी सोडल्यावर माझ? मी आलेल्या ऑफर नाकारू का? ‘तिच्याशिवाय’ कस राहू? तिचे येणे, तिचे बोलणे, तिचे पाहणे काय नाही अस विचारा. पण ती आज नाही. सकाळपासून ते खोट हास्य आणून वैताग आला आहे. ती नसते तर सगळाच एकदम उदास झाल्याप्रमाणे वाटते.

आज तर मला ना, नाही करमत आहे. तसा मी ‘बोरकर’ आहे, हे मला माहिती आहे. पण आज, खूपच वेगळे वेगळे वाटत आहे. म्हणजे तिच्या खूपच आठवणी दाटून आल्या आहेत. अस का असते? सर्वात जवळची व्यक्ती इतकी दूर का असते? आताच तर शनिवार रविवार गेला. ते दोन दिवस, शिवाय त्यात तो संगणक बंद. वेड लागायची पाळी आली होती. आज ती असल्याचे इतके भास होत आहेत ना. काल तिच्याबद्दल स्वप्न पडलेले. ती इतकी सुंदर, छान आहे ना! मुळात तीच एक स्वप्न आहे. गेल तीन दिवस न झोप आली आहे न चैन. काल बहिणाबाई वीस एक मिनिटे माझ्याशी फोनवर बोलली. पण यार, मला काहीच कळत नव्हते. मी नुसताच हो ला हो करीत होतो. तीला आठवण येत असेल माझी? वाह! काय बडबडतो आहे मी सुद्धा. पण खरच! सगळ कळून देखील काहीच ‘वळत’ नाही आहे.

ती मिळणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती. खरच ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही अजूनही, तिला मी खूप पूर्वीपासून ओळखतो. ती फक्त माझ्यासाठीच आहे अस वाटत. आज बसमध्ये देखील त्या ‘परीवहिनी’च्या जागी मी ‘अप्सरा’ला पाहून थबकलो होतो. आज बस फुल झालेली. शेवटच्या मोठ्या बाकावर परीवहिनीच्या शेजारी बसायला जागा उरलेली. मी परी वहिनींकडे पहिले, त्यावेळी तीच असल्याचा भास झालेला. जवळ जातांना लक्षात आले. मग काय, रस्ता बदलला ड्रायवरच्या केबिनमध्ये जाऊन बसलो. म्हणजे ‘अप्सरा’ इतकी छान कशी हेच कळत नाही आहे.

ती असते तर सर्वकाही असल्याप्रमाणे वाटते. ती हसते तेव्हा, ती बोलते तेव्हा अगदी अंगावर रोमांच उठत असतात. पण ती नसते तेव्हा सगळेच बेकार, भकास वाटते. कालचा दिवस आयुष्यातील सर्वात ‘सुंदर’ दिवस. मी आतापर्यंत प्रत्येक गोष्ट ‘आउट पुट’ पाहून काम केले आहे. म्हणजे ‘फळ पाहून कर्म’. कुठल्याच गोष्टीत ‘रिस्क’ घेतलेली नाही. मुळात माझा हाच स्वभाव आहे. पण यावेळी काहीही मिळणार नसून देखील ‘कर्म’ करीत आहे. सगळंच अस घडते आहे. कुठेच स्वतःवर कंट्रोल राहिलेला नाही. कदाचित हे मी याआधी हजारदा बोललो असेल. पण हेच चालू आहे. मला फक्त ‘ती’ हवी. दुसर्या सर्व गोष्टी गौण आहेत. ती खरच अमुल्य, अनमोल आहे. तिची प्रत्येक गोष्ट, एक उर्जास्त्रोत आहे. त्यामुळेच की काय माझ्याकडे आज ‘भारनियमन’ चालू आहे. कुठल्याच गोष्टीत उत्साह वाटत नाही आहे.

दुपारी जेवतांना माझे मित्र ती ज्या ठिकाणी बसते त्याच्या बाजूच्या ‘रो’मध्ये बसलेले. मलाही बसावे लागले. असो, मी म्हटलं ना! ही माझी सेना, म्हणजे जवळपास निम्मा फ्लोर तसा करतो. हे कार्टून तिच्या मैत्रिणीवर ‘टाईमपास’ करीत बसलेले. मला बेकार वाटत होते. म्हणजे उद्या तीला कळले तर ती मलाही तसाच समजेल. कधी कधी वाटते ती! सोडा.. मला खूपच बोर झाल आहे. तसं या बोरकरमुळे आज तुम्ही देखील बोर झाला असाल. क्षमा असावी. पण आज खरच तिची आठवणीने भंडावून सोडले आहे. दुसरे अनेक गोष्टी आहेत. पण तिच्याविना सगळंच बेकार वाटत आहे. बस्स! थांबतो इथे. नाहीतर अजून तासभर बोलून शेवटी तात्पर्य ‘बोर’ हेच असेल.

Advertisements

5 thoughts on “उदास

 1. “बस्स! थांबतो इथे. नाहीतर अजून तासभर बोलून शेवटी तात्पर्य ‘बोर’ हेच असेल.”

  ha ha ha हे एकदम बरोबर! कितीही विचार केला तरी काही गोष्टींचा निष्कर्श शेवटी एकच असतो.

 2. हेमंतजी,
  प्रेम हे प्रेमच असु द्यावे..स्वप्न आणि सत्य यात खुपच फरक असतो..स्वप्न जर सत्यात उतरवले तर सत्यानाश होतो..
  खरे प्रेम जर टिकवायचे असेल तर त्या प्रेमाशी लगीन गाठ कधीच बांधू नये..जे मिळते त्याची किंमत नसते…जे मिळत नाही त्याची कदर असते…प्रेमात दुसरे काय हवे? स्वप्नातला राजकुमार काय किव्हा राजकुमारी.. ही स्वप्नातच ठेवावी..त्यात्च जीवनाचा मोठा आनंद सामावलेला असतो…

 3. Hello Hemant,

  Can you please contact me on my email address, on my website there is a comment by an user that the article published was originally written by you. I want to discuss it with you as at this time the article is credited to some other user because he said it was written by him.

  Please get in touch with me.

  Thanks
  Ashish

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s