जाणता भजा

दरबार सुरु होण्याची वेळ होते. ‘स्व’राज्यातील सर्व सरदार आणि महाराजांचे ‘आम आदमी’ जमा होतात. कुजबुज चालेली तेवढ्यात, घड्याळाचे दोलक जोरजोरात वाजायला सुरवात होते. सर्वजण हातातील घड्याळे छातीवर ठेवतात. दरबारात शांतता पसरते. दारावरील दोन सैनिक मोठमोठ्याने महाराज आल्याची घोषणा करतात. ‘प्रौढ प्रताप बंदर! बिल्डर, चोर, घोटाळे प्रतिपालक! शेतकरी कुलावतंस कृषीसानाधीश्वर, महाराजा अधिराज! शी शी शी भाव वाढपती सरद महाराज !!’ सर्वांच्या मान झुकतात. डाव्या हातात फाईलीचे बंडाले आणि डोळ्यावरील जाड भिंगाचा चष्मा, ते साडेपाच इंचची मूर्ती दरबारात दाखल होते. सिंहासनावर बसल्यावर सर्वजण माना वरती करून महाराजांकडे पाहू लागते. महाराज दरबाराकडे एक नजर टाकतात. आणि पहिली ‘टीक’ करा असा आदेश देतात. एक ‘आम आदमी’ समोर येतो. महाराजांना मुजरा करून उभा राहतो. महाराज त्याच्याकडे पाहून ‘बोल’.

आम आदमी ‘मायबाप सरकार, मी बारामतीकर.. इंद्रायणीकाठी माझी एक पाच एकर परिसरात अमेनिटी आहे. पण मायबाप त्या निर्दयी न्यायालयाने..’. पुढे काही म्हणणार तोच त्याचा शब्द तोडत महाराज गरजले, ‘नारायण नारायण!! आम्ही जाणतो तुमची व्यथा. ए कोण आहे तिकडे, नारूला फोन लावा. तुमचे काम झाले अस समजा’. तो आम आदमी डोळे पुसत महाराजांच्या हातातील घड्याळाचे दर्शन घेऊन आपल्या जागी जावून उभा राहतो. दुसरे काही आम आदमी येऊन महाराजांना लवून मुजरा करतात’. आणि वरद विनायक बोलायला सुरवात करतो ‘महाराज, घात झाला!’. महाराज हसर्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहतात. आणि म्हणतात ‘आम्ही जाणतो, आम आदमीचे दुख:. लवासाकरांनो तुम्ही चिंतीत होवू नका. आताच आम्ही बाळ राजेंना दिल्लीवर स्वारी करून तुमची अडकलेली फाईल सोडवून आणायचे आदेश देतो’. महाराज दरबाराकडे पाहत मोठ्याने ‘बाळराजे..’. येवल्याचा सरदार मान झुकवून ‘महाराज, बाळराजे आज जनता दरबारात हजर नाहीत’. महाराज येवल्याच्या सरदाराकडे पहात बोलतात ‘आणि ते का?’. येवल्याचा सरदार मान वर करीत ‘बाळराजे, मुख्यमंत्र्यांच्या गडावर मिटिंगला गेले आहेत’. महाराजांचे डोळे लाल झाले. महाराज करड्या आवाजात ‘पण जनता दरबारात हजर राहायला नको?’.

महाराजांनी जितेंद्र गीध्धाडकडे पहात ‘धरमेंद्र, बाळ राजेंना हव्या त्या ठिकाणावरून उचलून आताच्या आता दरबारात हजर करा’. ‘पण महाराज’ सरदार जितेंद्र बोलला. महाराज त्याच्याकडे पहात ‘आता काय झाल?’. महाराज म्या जितेंद्र हाय, धर्मेंद्र नाय’. महाराज हसून ‘अच्छा, जा गुमान. आदेशाचे पालन करा’. जितेंद्र मुजरा करीत निघून गेला. महाराज लवासाकरांकडे पहात ‘तुमचे काम होवून जाईल’. लवासाकर चिंतेत महाराजांकडे पाहतात. महाराज ‘तुम्ही चिंता करू नका. असे अनेक प्रश्न मी आधी सोडवलेले आहेत. आणखीन एक खिल्लारी, अजून ते काय’. तेवढ्यात, धावत एक दरबारात माणूस येतो. आणि महाराजांचे पाय पकडतो. सैनिक धावत जावून त्याला पकडतात. महाराज हसर्या चेहऱ्याने त्याच्याकडे पहात ‘बोला भाई!’. ‘महाराज, मला तुमच्या छत्र छायेत घ्या’ तो आम आदमी रडत बोलतो. दरबारातील इतर आम आदमी हसू लागतात. महाराज मोठ्याने ‘खामोश! काय झाल ते तरी सांगा भाई’. भाई डोळे पुसत ‘राज, तुम्ही सर्व जाणता. कशाला गरीबाची मस्करी’. महाराज ‘बर, पाहू’.

तेवढ्यात एक सरदार येतो आणि म्हणतो ‘महाराज मी पुणेकर. यावर मी एक पोवाडा रचला आहे. इच्छा असेल तर सादर करू?’. महाराज ‘जरूर’. सरदार ‘सीबीआंय हुआ मादधाम, शीला जलने लगी. भाई येह है क्यून पिघलने लागा’. महाराज शाहीर सरदारला हात दाखवत, भाईकडे पहात बोलले ‘कधी ख़ुशी कधी गम. चालायचेच’. तेवढ्यात मोठ्या आवाजात ‘काका मला वाचवा’. महाराज गडबडून सिंहासनावरून उठून उभे राहतात. दरवाज्यातून हसण्याचा आवाज येतो. गीद्धड बाळराजेंना उचलून आणतात. बाळराजे गीद्धाडच्या पाठीवरून उतरून, धडपत ‘काय काढली ना हवा, काका’. महाराज आणि त्यासोबत सर्व दरबार नाक दाबतात. हेलकावे खात ‘अबे सुळे!’. महाराज बाळ राजेंना दरडावत ‘कुठे गेला होतास रे?’

बाळ राजे ‘बार मध्ये’ हे ऐकताच तासगावचा सरदार आबा चिडून ‘कायदा तोडनार्यला,..यावर कडक कारवाई केली जाईल’. बाळ राजे ख्या ख्या हसू लागतात ‘आरs आरs आबा, जरा गप पड. मी चौहानच्या जनता दर बारमध्ये गेलो होतो’. महाराज ‘जाणतो आम्ही’. ‘मग आता तुम्हाला लोक काय म्हणू लागले आहे आहे हे देखील तुम्ही जाणत असाल’ बाळ राजे बोलले. ‘जाणतो’ महाराज उत्तरले. बाळ राजे ‘च्छ्या, म्हणून घ्यावी लागली’. महाराज ‘जाणतो बाळ राजे, पण आपल्या ह्या सर्व आम आदमीचा मी पोशिंदा आहे. मला हे सर्व करणे भागच आहे’. बाळ राजे हेलकावे खात ‘भाव वाढ करणे भाग आहे? घोटाळे करणे भाग आहे?’. महाराज डोक्याला हात लावत ‘हो! माझी ही गरीब बिल्डर, दलाल आणि चोर आणि तुझ्यासारखे सरकारी जमिनीवर तव मारणारी आम आदमीला वाचवणे. ह्याच साठी तर केला होता हा अट्टाहास. ह्याच करता तर केली होती ही पार्टी’.

‘लोक मला काहीही म्हणो, अगदी भजा म्हणो. ती सोनिया काहीही बोलो. न्यायालय काहीही आदेश देवो. पण हे घेतलेले घोटाळ्यांचे व्रत आता ठेवता येणार नाही’ महाराज बोलले. यासाठी ही भाववाढ अटळ आहे.. तेवढ्यात दिल्ली दरबारी हजर होण्याचा आदेश घेऊन एक दूत आला. महाराज मनोमन ‘तुम न होते तो ऐसा होता, तुम ना होते तो शायद मे पंतप्रधान होता’.. टू बी कंटिन्यू…

Advertisements

7 thoughts on “जाणता भजा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s