सांगू??

काय करू यार, जाम टेन्शन आले आहे. कस बोलू? आता नाश्त्याला येतेस का विचारू? की, कॉफीला बोलावू. कालपासून हाच विचार करतो आहे. यार, ना झोप येते ना चैन पडते आहे. फक्त मोजून तीन दिवस उरले आहेत. आता आज गेला की दोनच दिवस उरतील. झालेत सगळे सोपस्कार. आणि गोडी गोडीत त्या डीएमला देखील ‘जाऊ दे’ म्हणून मागे लागलो. यार जणू काय मी ह्याची गर्लफ्रेंड आहे, आणि ह्याने मला प्रपोज केल आहे. आणि मी नकार देतो आहे, अशी नाटके. यार माझा डीएम जाम नाटकी आहे. अजून तीन वर्ष थांब आणि तुझे शिक्षण कर. मग मी तुला पे रोलवर घेतो. अस म्हणत होता.

हुश्श! ती डेस्कवर आलेली आता! किती छान आहे ती! किती सुंदर, आणि किती स्वभावाने गोड. मी तिला सांगून टाकल आहे आता की, मी जॉब सोडला आहे. आणि ती मला ‘आय विल मिस यु’ देखील म्हणाली. मला खरच काही सुचेनासे झाले आहे. ती इतकी छान आहे. मी तिला माझ्या मनातले सांगितले की ती नाराज होईल. आणि पुन्हा कधीच आयुष्यात मला ‘मिस’ नाही करणार. खर तर आज तिला सगळ सांगून टाकायचे अस ठरवून मी आलेलो. पण आता पुन्हा गोंधळ होतो आहे. कस सांगू तिला? तिच्याशी बोलतांना तिला सगळ आठवते आहे. एकही गोष्ट ती विसरलेली नाही. पण ते खोट होत. मी तिला तिचे आडनाव आणि माझ्या जुन्या बॉसचे आडनाव एक आहे, म्हणून बोललो अस म्हणालेलो.

पण खर तर हे आहे, मी ज्या दिवसापासून पहिले त्या दिवसापासून माहित नाही. पण ती सोडून कोणीच छान वाटले नाही. तिच्याशी बोलण्यासाठी मी खोटे बोललो. बर्याच गोष्टी मी तिच्यापासून लपवल्या. अगदी, माझ तिच्यावर प्रेम आहे हे सुद्धा. पण कस? तिच्या मानाने मी काहीच नाही. ना शिक्षणात, ना सौंदर्यात आणि ना इतर कोणत्या गोष्टीत. आणि आमच्या आवडी निवडी देखील खूपच टोकाच्या. पण तिच्याशिवाय सगळ निरस! ती दिसली की, अंगावर रोमांच उठतात. ती हसली की, सगळ छान आणि आनंदी वाटायला लागते. ती आली एका वादळाप्रमाणे. आणि मी आता दूर जाणार. ती पुन्हा कधीच भेटणार नाही. यार, कस सांगू? तिला मी कधीच नाराज नाही करणार अस म्हणतो. आणि मी तिला सांगितले की, ती नाराज होवून जाईल. त्यापेक्षा नकोच. निदान ती मला ‘मिस’ तरी करेल. नाहीतरी सांगितले काय आणि नाही सांगितले काय, उत्तर माहिती आहे. ती माझी कधीही ‘मिसेस’ होणे शक्य नाही. हे ‘एक हरलेले युद्ध’ आहे. अगदी पहिल्या दिवसापासून हे माहिती होते. पण तरीही ‘मन’ हे ऐकत नव्हते. आणि आताही तेच होते आहे.

सगळ तेच! तिला सोडून जाण्याची माझी मुळीच इच्छा होत नाही आहे. पण आता सगळ झाल आहे. खर तर हे सगळ बदलू शकतो. पण तिला नाराज करून मी काय मिळवेल? ती डिस्टर्ब होईल. नाहीतरी ती आता माझ्याशी बोलतांना तिच्या कोणीतरी ‘बेस्ट फ्रेंड’ने तिचा नेटचा प्रॉब्लेम त्याने सोडवला. तिला मित्र खूप आहेत. नाही नाही, मला खरच काही जेलसी वगैरे नाही. बस, प्रश्न हा आहे की, सांगू की नको? तिच्याशी बोलायचे भाग्य. तिच्या सोबत एकदाच का असेना ‘लिफ्ट’मधून शेजारी जाण्याचे भाग्य मिळाले हे काय कमी आहे. तिने आजच तिच्या इमेलची ‘हाफ सेंच्युरी’ मारलेली आहे. काय करू? मला सगळ माहिती आहे, की ती माझ्याशी एक मित्र म्हणूनच कायम माझ्याशी बोलत आली. तिच्या मनात अस कधीच माझ्याबद्दल काही नव्हते.

पण मी देखील हे सगळ मुद्दाम नाही केले. ती सोडून दुसरे कोणी आणि दुसरा कोणताच विषय मनात येत नाही. ती सोडून दुसरे कोणीच छान वाटत नाही. ती सोडून जगावेसे सुद्धा वाटत नाही. मी कुठलीच गोष्ट, किंवा कुठलाही शब्द बोलायचं म्हणून बोलत नाही. तीला ज्या दिवशी पहिले तेव्हापासून ती ‘माझीच’ वाटते. तिला मी खूप आधीपासून ओळखतो असच वाटत आले आहे. कायम त्या कार्टून पीएम म्हणजे सध्याचा माझा एचसीएमला मी घाबरत आलो. ती आली आणि सगळच बदलून गेल. मग तो एचसीएम नाही तर डीएम ला सुद्धा बिनधास्त बोलू लागलो. तिच्या नुसत्या असण्याने, एक वन बीएचके, एक नवीन मोबाईल, एक बाईक आणि एक परमनंट जॉब. सगळ बदललं. अगदी माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट. पण आता.. मी तिला सांगू की नको?

शेवट गोड असावा असा नियम नाही पण एक संकेत आहे. तिच्यामुळे मला इतक सार मिळाले. आणि मी असा तिचा डीस्मूड करून, तिला नाराज करून, तिला गोंधळ करून जाण्यात खरच काहीच अर्थ वाटत नाही आहे. पण हे द्वंद देखील संपत नाही आहे. ना काही समजत आहे. सोडा, मी सांगूनच टाकतो. हे बैचेनीचे व्रत गेल्या पाच-साडेपाच महिन्यापासून घेतलेलं आहे. निनाद ते तरी.. माझ मूर्ख मन निदान ह्या गोष्टीने तरी समाधानी होईल? देवाला एकच प्रार्थना आहे, ती नाराज होवू नये..

Advertisements

21 thoughts on “सांगू??

 1. जाताना तूच सेन्ड ऑफ पार्टी दे आणि त्यात तिला बोलव.

  आणि वेळ पाहुन तिला सांगुन टाक.

  तिला हे ही सांग की तुला मनात काहीच ठेवायचे नव्हते. त्यामुळे बोलुन मोकळा झालो.

  माझ्याही बाबती असे घडले होते.टीममधली एक मुलगी आवडु लागली होती आणि तेव्हाच घरचे माझ्या लग्नाचेही ठरवु लागले होते.

  मी विचार केला जर का आताच मी तिच्याशी ह्याबाबतीत बोललो नाही तर लग्न झाल्यावर आयुष्यभर मी माझ्या होणार्या बायकोची आणि तिची तुलना करत राहणार.

  नको नको त्यावेळी तिच आठवणार.. म्हणुन मी मनाचा हिय्या केला आणि माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहेस का म्हणुन विचारले.पण तिला हे ही सांगितले कि तुझ्या होकारा इतकाच मी तुझ्या नकारातही इंटरेस्टेड आहे.ती नाही म्हणाली.पण नंतरही आमचे मैत्री कायम राहीली.

  आज माझे लग्न झाले आहे आणि मी माझ्या बायकोवर फार प्रेम करतो.

  थ्री इडियट्स मध्ये तो डायलॉग आहे ना (माधवनला आमीर खान त्याच्या बापाला सांगायला सांगतो की मी फोटोग्राफी मध्ये इंटरेस्टेड आहे ते)…घर के बाहर कार खडी थी..तुम्हारे हाथ मे लेटर था…उस वक्त अगर तुम थोडी हिम्मत दिखाते तो जिंदगी आज कुछ और होती…

 2. Boss…please please please..take this risk
  anyways you are leaving company (& her) You have nothing to loose but if she says yes you are winner..

  Going by your blog..it seems that she likes you..you just need to convert that like into need..
  only 2 dys left boss Do it! its very simple
  Ping her that you want to tell something only to her..(she will get the idea)
  Then go in a quite place for coffee and simply express..then tell her frankly all information about yourself and give her a time to decide..
  In every culture in the world boy asks girl so whats wrong in it? You are using this blog to clear your thoughts to people you don’t know..why cant you express this to the person who knows you for 6 months?????
  To get something you have to put something at risk…dare this time or you will regreat later..

  If you really love her you will have no doubt in your mind..
  Ask her out dude..be a MAN

 3. great comments by Yogesh and Samu above.

  Oh. They are so much right..

  Please go ahead. Believe me, nothing wrong will happen by letting her know.

  There’s a fair chance that she knows it by now. Girls DO understand such things soon.

  Don’t put it forward as question Like Do you also love me? Or what is your answer? Etc

  Just LET HER KNOW. ONLY TELL, DONT ASK ANYTHING IN RETURN.

  This will leave a fond memory for you while you leave and not cause any pressure or embrassment for her.

  Please make sure that it is your LAST conversation before you disappear not to return to that office.

  Also exchange contact number if you havent.

  If she calls or smses you back after you leave, or replies to your hi sms later, you have won..!

 4. मुद्दा चांगला आहे. पण प्रत्यक्ष अनुभवाने असे दिसते की अशी सर्व माहिती देऊन तिच्यावर अत्यंत प्रेशर येण्याची शक्यता दाट आहे.

  आपल्याला कोणी सांगतंय की बघ तुझ्यासाठी मी इतका बदललो , घर घेतलं, शिकतोय, नोकरी बदलली इ.इ.

  असं वाटून जणू आता इतकं मी केलंय तर तू हो म्हणाली नाहीस तर काय होईल तूच विचार कर असं जबरदस्त प्रेशर नाही का येणार?

  एकदम गृहीत धरल्यासारखं वाटेल ना?

  प्रेशरमधे निर्णय घेण्याची वेळ आली तर बहुधा तो “नकोच आत्ता एवढी कमिटमेंट.. जाऊ दे” असाच होण्याची शक्यता असते.

  आपल्या बाजूने निर्णय व्हायचा असेल तर तो विना दबाव होण्याची गरज आहे. हे बोलणं ही पहिली स्टेप असावी. म्हणजे दूर गेला तरी नवीन वेल डिफाईन्ड नातं फुलवत ठेवणं सोपं होईल.

  अन्यथा आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माईन्ड हे कटू सत्य आहे.

 5. agree with nachiket…….. first thing, ti mulagi tuzyakade aali nhavati ki tu hey mazyasathi karr mhanun…. it might be just coincidence or might be your stars were good enough to do such things….. so mi tuzya sathi kai kai kel hey sangnyapekhya fakt tila bolun de ki tula ti avadate aahe aani tula company sondanya purvi hey tichya kanavar ghalayach hot…. ajun hey sudh bol ki tuzya kadun tass kahi nasel tari tula kahi problem nahiye & we can continue our friendship as it is….Best Of Luck!!

 6. मी बा नीलम साळुंखेच्या मताशी सहमत आहे…सहसा पुरूष आपला हेका,स्वभाव बदलत नाहीत आणि कुणा स्त्री साठी तर स्वतामधे एव्हढा बदल करणार नाहीत !खरे प्रेम एथेच दिसते हेमंतजी लागनाआधीच एव्हडे बदलले आहेत,त्यांचे प्रेम जाहीर आहे योग्य वेळी त्यानी त्याचा ड्न का पिटला आहे..लग्नानंतर ते चांगले बदल करू शकतात हे त्यांच्या वागणुकीतुन दिसते….घर घेणे ही त्याचीच उत्तम पावती आहे.

 7. बदलण्याची तयारी बर्‍याचजणांची नसते. (आणि ज्यांची तशी तयारी कोर्टशिप पीरियडमधे दिसते त्यांची लग्नानंतर ती तशीच टिकून राहील हे एक गोड दिवास्वप्न आहे. पण ते आत्ता चर्चेस घ्यायला नको. ते लग्नानंतरच कळलेले बरे असते. नपेक्षा लग्नेच होणार नाहीत..)

  तर हे सर्व तिला कळावे हा विचार अगदी योग्य.

  पण प्रपोज (किंवा डिक्लेअर हा शब्द जास्त चांगला) करण्याच्या वेळीच सर्व हिशोब मांडला तर त्याक्षणी एकदम अति होऊ शकते. ही माहिती हळूहळू नंतरच्या स्टेजेसना समजलेली जास्त चांगली.

  बदलण्याची तयारी, त्याग, घर घेणे, या गोष्टी मुळात नसलेले नाते तयार करू शकत नाहीत.. पण बनलेले नाते फुलवू शकतात.

  यू जस्ट कांट “मेक” एनीवन फॉल इन लव्ह विथ यू..

 8. Nachiket,
  Apan far involve hoto ahot yat…..Ani aaj kuthe gelay ha?
  “You just can’t make anyone fall in live with you….” Khara ahe…Pan tarihi mala vatata ki jar 50-50 asel, tar it will help to go little above….say 60-40 yes-No…….

 9. Exactly.. 50 50 asel tar.

  hech 50 50 aahe kaa? te samajoon ghenyaachyaa first step chyaa aadhee sarv ughaDe karaayalaa have kaa?

  ekadaa 50 50 hou de kinvaa asalyaachi khaatri hou de..

  tichyaasaathi sarv karunahee vele aadhee te sarv bolaNyaane tyaache mahatv jaayalaa nako.

 10. Hi Hemant,

  I read your blog and each and every page on your blog whole night. I could never realize your feelings towards me. I m extremely sorry for hurting you unknowingly. I had a doubt regarding this and I had even spoken to “Pasara” that you try to help me out of your way. She explained saying that you do not have much work in office, so you pass your time helping others since you have interest in technical matters.

  I am already committed to someone and I could never look at anyone else in that sense. So I can not accept your proposal. But I am absolutely okay with the fact that you have expressed yourself to me. At least you have guts to face a girl and her denial. We will be friends. Don’t worry about me, I am neither upset or feeling bad. Take care of yourself and all the best for new job. And of course, Happy New Year!! May you find another Apsara who will be much better than me 😉

  Good Luck ! Keep in Touch.

 11. आयला, ही खरी अप्सरा आहे काय?? : o , हेमंतची अप्सरा??? (कुणी उगाच खोटी प्रतिक्रिया देऊ नका रे!! चला गृहीत धरुया की ही खरी अप्सरा आहे! ;))हेमंतने प्रपोज केले तर… अप्सरे गं, फ़ेरविचार कर !! हेमंतसारखा प्रेम करणारा मिळणार नाही कदाचित…
  आम्ही जुलैपासून सुरु झालेल्या या अप्सरायणात इतके गुंतलो होतो की गुरुदेव आणि त्यांची अप्सरा हा आमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला होता.. आणि आम्हाला अप्सरायणाची happy ending हवी होती. काही हरकत नाही. मुली निर्णय बदलतात कधीकधी!!! 😉
  हेमंतराव, शुभेच्छा आणि नूतन वर्षाभिनंदन!!! तुझ्या मनोकामना पुर्ण होवोत..

 12. हो, ही खरी अप्सरा आहे.

  आपण सर्वच या प्रकरणात इतके गुंतत गेलो कि या कथेचा शेवट चांगला व्हावा हिच देवाला प्रार्थना करत होतो. पण दुर्दैवाने तसे घडले नाही.
  थोड्या वेळापुर्वी हेमंतशी झालेल्या बोलण्या प्रमाणे त्याने अप्सरेचा वरिल अभिप्राय खरा असल्याचे सांगितले. व खर्‍या अप्सरेनेच हा अभिय्राय दिला असल्याचे पण सांगितले.
  हेमंतला आपण नविन वर्षाच्या शुभेच्छा देऊया. व खरी अप्सरा आपला निर्णय बदलेल अशी प्रार्थना करुया.

 13. wohaaa man….you did it..am feeling sad for you.
  I was following this blog for longgg time. Every reader of this blog lived your moments through your words. I think you will not blog soon..please don’t stop blogging..after every end there is new beginning! Sometimes we ourself have to clear out our illusions and welcome reality!!!

  Happy New Year to you!

 14. I dont and cant know about genuinity and genesis of these comments but if true, I am so much proud of you Hemant.

  You are a man and you deserve being called a proud loving and caring person..

  There is no win-lose game or END per se when it comes to relationships being built between two people.

  This is probably most inappropriate time to say this,but, if along this blog journey,if you started to believe me as a friend, please keep the faith that new dreams will be enjoyed along your way whether you want or not…

  Life goes on whether you want or not.

  It is absolutely alright on part of the girl you love, to be committed to someone else.

  In case she was committed to you and someone else would have presented similar proposal,she would have said the same thing to that someone too..

  Dont take it as anything that is less in you..

  You are a man and you will be a better man next time.

  Best advice I can give after my many such experiences,and lot of life is that get married to one of those come your way through arranged proposal.

  In such a relation love is so easy to build after getting married that loving first and seeing it decline after you get married..

  If this whole Apsara comment thing is prank then I have nothing to name it..

  All the best..

 15. माननीय हेमंत भाऊ,
  अरे तुमच काही उत्तरच दिसत नाही इथे????????
  हे योग्य नाही ……………….

  director ne film chya shevati THE END chi pati takayali havi

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s