बाईक घेतली

एक आनंदाची बातमी द्यायची आहे. शेवटी दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तिची ‘चाक’ माझ्या घराकडे वळली. तिची म्हणजे बाईकची. मी मागील डिसेंबरच्या सोळा तारखेला तिला म्हणजे हिरो होंडा पॅशन प्रो बुक केलेली. आज माझा मित्र आणि मी तिला आणायला गेलेलो. आकाशी रंगाची, ती सकाळी आकाराच्या सुमारास शोरूम मधून घेतली. घरी आल्यावर तिची पूजा केली. या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणे’ ‘अआई’ होती. इमारतीच्या गच्चीत बसून त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली. माझ्या मित्राने पूजा सांगितली. तसे दोन देडफुटे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे स्थळ माझ्या इमारतीच्या बाजूला जोडून असलेले साई मंदिरा समोरील जागा. Continue reading

Advertisements

जय बिहार

बस अजून काही दिवस, मग हेच ‘जय बिहार’ म्हणावे लागेल. नाहीतरी ‘जय’ बिहारकडेच उरला आहे. आमच्याकडील ‘यशवंतांना’ जिवंत जाळले जाते. एका व्यक्तीला भर दिवसा जिवंत जाळले जाते. मारणारा कोण? ज्याला तडीपार केले आहे तो. पुण्यात महिन्याकाठी एक तरी रेप केस होते. तिथेही गुन्हेगाराची बाजू कोण घेत? तर आमचे माननीय आमदार साहेब. तडीपारी रद्द करायला डायरेक्ट मंत्रालयापर्यंत मजल. आमचे मुख्यमंत्री ‘आदर्श’ निर्माण करतात. कृषिमंत्री वाईन गाळत बसतात. ‘जातिवंत’ उपमुख्यमंत्री जमिनींचे व्यवहार करतात. नदीत आणि ओढ्यात भर टाकून जमिनी विकतात. Continue reading

जय बंदी

आजींचा कालचा लाल किल्ल्यावरील तो सोहळा पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आता मला जाम विश्वास बसला आहे की, कायदा कोणीही ‘हातात’ घेऊ शकत नाही. काय ते भाषण आणि काय ते संचलन. आजींचे भाषण मी मन लावून नेहमीच ऐकतो. काय गडकरी साहेब? तुम्ही काय फडतूस विषय घेता. म्हणे तिरंगा फडकवणार लाल चौकात. कळल न! आता पुन्हा असला वेडेपणा करू नका. तस् म्हटलं तर मी तुमच्या पक्षाला कधीच मतदान करीत नाही. परंतु, यावेळी मात्र मुद्दा चुकीचा होता, म्हणून बोलतो आहे. काय गरज होती तिरंगा फडकावयाची? आणि फडकून काय मिळणार होत? Continue reading

योगायोग?

काय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे जॉईन होण्याच्या खूप आधी म्हणजे बहुतेक जून वगैरे महिन्यात स्वप्नात पाहिलेला. त्यावेळेसही मी स्वप्नात हाच विचार करीत होतो. Continue reading

दिल्ली दरबार

महाराज दिल्लीला निघाले. महाराज दिल्लीला बडी बेगमच्या दरबारी निघाले ही बातमी अख्ख्या बारामतीच्या गडावर वार्यासारखी पसरली. दिल्लीला सोबती म्हणून महाराजांनी ‘उ’पटेल आणि बाळ राजांना सोबत घेतलं. ‘स्व’राज्याचा कारभार करण्याच्या सूचना सरदारांना केल्या. महाराज दिल्ली दरबारी निघाले. महाराजांवरील प्रेमाची पावती म्हणून, कोणी धान्यापासून तयार केलेली वाईन, कोणी ‘सकाळ’ वर्तमानपत्र, तर कोणी क्रिकेटची बॅट. महाराजांनी दिल्लीला कूच केली. महाराजांचे विमान दिल्लीला उतरले. सकाळचा गारठ्यात महाराज दहा जनपथच्या दरबाराच्या बाहेर पोहचले. बाळ राजे आनंदून ‘महाराज, हा पथ दहा लोकांसाठीच आहे का?’. Continue reading

प्रेम रोग

आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. Continue reading

हे काय आहे?

आज सकाळी सकाळी डोळे उघडले तर, ‘अआई’ माझ्याकडे पाहून ती तिच्या ठरलेल्या स्टाईलमध्ये, म्हणजे मान उजव्या बाजूला झुकवून हसत होती. एकदम मस्त! विसरला नाहीत ना! ‘अआई’ला? खूप दिवसानंतर आज एकदम मस्त वाटत होत. नंतर पुन्हा डुलकी लागलेली. म्हणजे धड झोपेतही नाही आणि जागा आहे असही नाही. मला माझ्या आईच्या आणि तिच्या गप्पा ऐकू येत होत्या. मागील महिन्यात वडिलांनी मला एक ‘टी-पॉय’ घेऊन दिलेला. तो ‘टी-पॉय’ स्टीलचा आहे. आणि वरच्या बाजूला एक जाड काच. तो मी बाहेरच्या खोलीत ठेवला आहे, त्यावर माझी मी बीसीएची आणि माझ्या कोर्सच्या वेळी मिळालेली पुस्तके ठेवलेली आहे. म्हटलं कोणी घरी आल्यावर तेवढंच आपल इम्प्रेशन! Continue reading