पहिला दिवस

काल या नव्या कंपनीचा पहिला दिवस होता. आता दिवस म्हणू की रात्र? म्हणजे नाईटशिप होती. दिवसच मस्त होता. खर तर त्या कंपनीत जायची इच्छाच नव्हती. आणि मी काही आनंदी वगैरे नव्हतो. सकाळी लवकर उठून आवराआवर करायला सुरवात केली. मग लक्षात आले, आज पासून आपली कंपनी बदलली. मग मुडच गेला. पण नंतर ज्यावेळी जाग आली त्यावेळी तिचा ‘ऑल द बेस्ट’चा एसएमएस. त्यानंतर खूप मस्त!

दुपारी मस्तपैकी निगडीतील एका हॉटेलात जेवलो. त्यानंतर थोडा जीमेल चेक करू म्हटलं तर, मी म्हटलेलं ना! माझी काहीतरी चूक झालेली त्या दिवशी तिला इमेल करतांना. तिने तो इमेल मला पाठवलेला. त्यात मी इमेल आयडीच्या जागी माझा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरच्या जागी माझा इमेल आयडी टाकलेला. पण काहीही असो! तिचा इमेल पाहून इतका हुरूप आला ना. कंपनीत गेलो. तशी कंपनी खूप छोटी आहे. पण हरकत नाही. मला चांगले काम त्यांनी दिले. आणि फुल एक्सेस. हव ते डाऊनलोड करायची परवानगी. हव्या त्या साईट सर्फ करता येतील. एवढ नक्की की माझी कला आणखीन सुधारून जाईल. मला ते एक सॉफ्टवेअरवर काम करण्याची इच्छा आहे. त्याच नाव ‘एडॉब ब्राउझरलॅब सी एस५’. ते मागितले तर ते मिळाले. कसलं मस्त ना, जे मागेल ते सॉफ्टवेअर ताबडतोप आणि ते सुद्धा लायसेन्स व्हर्जन. माझ्या जुन्या मोठ्या कंपनीत रिक्वेष्ट टाकून, त्यांच्या मागे सहा महिने लागून देखील जे मिळाले नाही ते इथे एका दिवसात. बॉसशी बोललो. तो  एच आर तर दोस्तच झाला आहे. आणि सिस्टीम अँडमीनिस्ट्रेटर देखील चांगला आहे.

मला त्यांनी वेलकम पार्टी देखील दिली. त्या चांदणी चौकात ‘अप अँड अबाउ’ नावाच्या हॉटेलात गेलेलो. एकूणच मस्त. इथे एक पात्र आहे. खरच पात्र आहे. माझ्या बाजूला बसतो. ऑफिसमध्ये आल्यावर संगणकाच्या पाया पडला. नंतर संगणक सुरु झाल्यावर साई बाबांचा डेस्कटॉप वर फोटो, त्याच्या पाया पडला.  जाम हसू येत होते. म्हणजे अस मी पहिल्यांदाच पाहतो आहे. स्वतःहून बडबड बडबड. वागणे देखील तसेच. सोडा ते, काल तिने मला एक इमेल पाठवलेला. ती माझ्यावर ब्लॉग लिहिणार आहे. आणि लिहून झाल्यावर मला माझ्या ब्लॉगवर टाक म्हणाली. पाहून काय करू आणि काय नको अस झालेलं. तसं तिने आधी मला एसएमएस करून  सांगितलेलं. पण काल इमेल केलेला. आणि तिला माझी आठवण येत आहे हे सुद्धा सांगितलेलं.

काय करू यार? कधी कधी अस वाटत मी तिला माझ्या मनातलं सांगायला नको होते. कारण तीच वागण, बोलणे आणि मनाचा मोठेपणा पाहून मला ती आता आणखींनाच आवडू लागली आहे. काय माहित, ती माझ्यावर काय बोलेल? खर तर हीच सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे माझ्यात काहीच अस नाही जे बोलण्यासारखे आहे. काका टाईप जाड जाड मिश्या, जाड जाड भुवया आणि हे सागराच्या लाटा असलेले केस. आणि हा सावळा रंग. थोडक्यात, वक्रतुंड! आणि हे असले अगडबंब शरीर. ती कमिटेड नसती तरी सुद्धा तिने मला नकारच दिला असता यावर मला विश्वास आहे. माझे चित्र काढायचे ठरले तर एका मोठ्या गोलवर लहान गोल काढला की झाला हेमंत! आता ती काय बोलणार माझ्यावर! यापलीकडे काही शक्य वाटत नाही.

काल आणि आजही तिची खूप खूप खूप आठवण येत आहे. दोन वाजता माझा एच आर म्हणत होता की ‘तुला सवय नसेल ना रात्री जागायची?’ काय बोलणार हसलो फक्त. ह्याची देखील तिने सराव करून घेतलेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून हेच तर करतो आहे. तसं एक दीडच्या दरम्यान झोप यायला लागलेली. पण, माझा एक मित्र ऑनलाईन होता. त्याने तिचा विषय काढला आणि झोपच गेली. मस्त पण! अरे हो, तिने मला जी टॉकमध्ये एड केलंय. किती चांगली आहे यार ती! घरी आल्यावर देखील झोपच येत नव्हती. येतांना कंपनीने कॅब दिलेली. यार जरा जास्तीच होतंय अस वाटत आहे. माझी इतकी लायकी नाही.

ते कालच मी जे बोललं आहे ना, ते देखील याच अर्थाने. मला खूप जास्त होत आहे, अस वाटत आहे. खर तर माझ्यामुळे गेले अनेक दिवस अनेक जणांना खूप त्रास झाला आहे. आणि तरी देखील! तो ‘शुक्रवारी’ माझा एक मित्र आहे. प्रोजेक्टसाठी इंग्लंडमध्ये ऑनसाईट गेलेला आहे. त्याचा फोन. दोनदा! त्यासाठी त्याने एक कॉलिंग कार्ड घेतले. आणि तिच्या तर काहीच ध्यानी मनी नसतांना! जाऊ द्या! आता तो विषय नको! एकूणच खूप छान वाटत आहे. आणि तिची आठवण देखील खूप येत आहे. पण एकूणच दिवस एकदम मस्त!

Advertisements

3 thoughts on “पहिला दिवस

 1. कुसुमाग्रजांची कविता ह्या तुझ्या संपूर्ण प्रकरणाला अगदी चपखल लागु होतेय.

  प्लीज एकदा वाचुन पाहाच.(आधीही वाचली असशील पण आता वाचशील तर वेगळेच फिलिंग येईल बघ.)
  —————————————

  पुरे झाले चंद्रसूर्य
  पुरे झाले तारा
  पुरे झाले नदीनाले
  पुरे झाला वारा

  मोरासारखा छाती काढून उभा रहा
  जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
  सांग तिला तुझ्या मिठीत
  स्वर्ग आहे सारा

  शेवाळलेले शब्द आणिक
  यमकछंद करतील काय?
  डांबरी सडकेवरती श्रावण
  इंद्रधनू बांधील काय?

  उन्हाळ्यात ढगासारखा हवेत रहाशील फिरत
  जास्तीत जास्त बारा महीने बाई राहील झुरत
  नंतर तुला लागिनचिटि
  आल्याशिवाय राहील काय?

  म्हणुन सांगतो जागा हो
  जाण्यापुर्वी वेळ
  प्रेम नाही अक्षरांच्या
  भातुकलीचा खेळ

  प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाण
  प्रेम म्हणजे जंगल होउन जळत रहाण

  प्रेम कराव भिल्लासारख
  बाणावरती खोचलेल
  मातीमध्ये उगवुनसुद्धा
  मेघापर्यंत पोचलेल…

  शब्दांच्या या धुक्यामाद्ये अडकू नकोस
  बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
  उधालूं दे तूफ़ान सगळ काळजामाद्ये साचलेल

  प्रेम कराव भिल्लासारख
  बाणावरती खोचलेल
  मातीमध्ये उगवुनसुद्धा
  मेघापर्यंत पोचलेल…
  ——————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s