बाकी शून्य

शून्य नेहमी विचार करतो की मी ‘शून्य’च का? माझे मूल्यही शून्य का? गणिताच्या ह्या विश्वात, मला कधीच का कोणी नाही मिळणार, ज्याच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तो अंक सर्व काही असेल. एके दिवशी अपघाताने शून्याला दहा अंक मिळाला. त्याच्या सोबत राहून शून्याची किंमत वाढली आणि त्या दहा अंकाची देखील. पण थोड्याच क्षणात गणिताचे नियम बनले आणि शून्य ते नऊ हेच अंक मुलांक म्हणून ग्राह्य  धरले गेले. आणि त्यामुळे बाकी शून्य राहिला.

शून्य कायम इतरांप्रमाणे कोणी सोबती असावं अस विचार करायचा. त्याने नऊ अंकासोबत गणित करण्याचा निश्चय केला. पण नऊला गुणाकार आवडायचा. त्यामुळे, शून्याला नऊने गुणले आणि बाकी शून्य आली. पुढे, आठ अंकाशी त्याची मैत्री झालेली. पण आठ अंकाला सातशी आकडेमोड. त्यामुळे शून्याला तिथे गणित करावे अस वाटेना. त्यामुळे त्याने गणित सोडवलेच नाही. बाकी पुन्हा शून्य. सहाला वजाबाकी, तर पाचला भागाकार आवडायचा.

शून्य ते पाहून निराश झाला. मग पुढे जावून चार, तीन, दोनचा तो गणित करावे असा कधी त्याच्या मनात विचारच आला नाही. आणि एके दिवशी त्याला एक अंक भेटला. खरच प्रत्येक गोष्टीत ‘नंबर वन’. देवाने आतापर्यंत अस का घडवले याचे त्याला उत्तर कळले. पण गणित कसे करावे हेच कळेना. पण शून्याचा प्रमेयांनी शून्याला मदत केली. आणि त्याने एका दिवशी, गणित केले. परंतु, तिथे ‘घात’ होता. एकाचा ‘वर्ग’ झालेला. एकाचे आधीच गणित सुटलेले. आणि त्या गणिताचे उत्तर बाकी शून्यच..

Advertisements

5 thoughts on “बाकी शून्य

  1. Come on, Hemant! Don’t repeat it in different different words and ideas!
    You have got good talent…use it. Don’t waste your creativity in frustrations! Boost up and open new avenues of opportunities. All you need is little bit of determined efforts and strong, positive mindset. Try to get them!!
    Many regards and Best wishes,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s