इंग्रजी भाषा

मी आज एक नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चुकीचे तर चुकीचे. तोडक मोडक इंग्लिश मी रोज बोलत असतो. कोणी नाही भेटले तर, कस्टमर केअरवाले असतातच. त्यामुळे रोज सराव करतो. पण म्हणावा तसा अजून सुधार नाही. माझे काही मित्र त्या इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासला गेलेली. मलाही जावसं वाटलेलं. पण मित्रांची प्रगती पाहून विचार बदलला. या शनिवारी त्या कॅंपमधील एका मॉलमध्ये बराच वेळ इंग्लिश कम्युनिकेशन विषयावर असलेली बरीच पुस्तके धुंडाळली. पण एकही घ्यावेसे वाटले नाही. अगदी सुरवातीच्या मानाने ठीक आहे. पण आता चार वर्ष झाली. अजून एक वर्षांनी सिनिअर लेव्हल येईल. त्यामुळे चांगले इंग्लिश करणे अनिवार्य आहे.

अगदी पहिला इंटरव्यूच्या वेळी फक्त येस आणि नो एवढंच बोललेलो. त्यामानाने आता मी व्यवस्थित इंटरव्यू देतो. परंतु जे रोजच्या जीवनात किंवा ज्याला चांगल इंग्लिश म्हणतात ना. ते काही अजून येत नाही. म्हणून आता एक इंग्लिशमध्ये ब्लॉग बनवला आहे. त्याचा उद्येश फक्त आणि फक्त इंग्लिश भाषा सुधारणे. मला तुमची एक मदत हवी आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळी त्यावर मी जे बोललो. त्यात काही जरी चूक वाटले तर सांगाल का? म्हणजे मी रोज जे बोलतो. त्यात मी जे बोलतो. त्यावेळी मला चुका समजतात. परंतु नेमक कसं असायला हव हे नाही कळत. त्यामुळे कदाचित, त्या ब्लॉगचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. बाकी बोलूच..

Advertisements

10 thoughts on “इंग्रजी भाषा

 1. Hi Hemant,
  The easiest way tom learn any language is to listen to it as often as you can and secondly to use it as much as you can .Try and listen to English news for at least half an hour everyday.Communicate with your friends in English , no matter how bad it may sound .Remember you can learn only if you make mistakes , and you can make mistakes only when you speak in English.
  All the best
  JKB

 2. मला शंका आहे, त्या ब्लॉगवरच्या वाचकांच्या कमेंटसना तु प्रत्त्युत्तर देशील???
  I Doubt, would reply on comments by readers on your new ENGLISH blog????

 3. म्हणजे वाचक तुला सांगतिल रे कि तु चुकतोस किंवा बरोबर आहे ते, पण निदान त्यांना धन्यावाद म्हणायची सवय तरी ठेवशील का? नाही तर वाचकांना कळनार कसं कि तुला तुझी चुक समजली की नाही ते !
  Well, English is very polite language, shall we start with Manners ????

  All the best mate !

 4. Hemanta, ek pustak suggest karu….aree ha sem problem ithe hi aahe..applyala yet ast pan…ek gost aadhi note kar ki..applya peksha changl english bolnarech grammerchya chuka karat astat..kharach ata hech bhag ” Eat cha bhutkal ate hoto barobar..kiti jan ate barobar boltat…eated mostly vapral jat bhag mark kar…bye d way pustak aahe…”Essential English Grammer- A self study reference and pratice book by Raymond Murphy”…bhag try karun..cambridge university press cha aahe

 5. हेमंत,

  खूप दिवसांनी कमेंट टाकतेय, मध्यंतरी वेळ कमी मिळत असल्यामुळे जमलं नाही. पण सारे काही वाचत होते.

  मी जेव्हापासून ब्लॉग्स वाचायला सुरुवात केली. तेव्हापासून तुम्हा काही जणांची पंखा झालीये.

  तू, ऐडी जोशी, चंद्रशेखर काका, प्रभाकर फडणीस काका…All of you have a great attitude towards life. अजून बरेच जण..

  तुझा ब्लॉग वाचताना हसते, रडते, उद्विग्न होते. मला तू माझ्या मित्र परिवारातलाच एक वाटतोस.

  पण तू कधी-कधी असा वागतोस ना की स्वतःच वेगळेपण दाखवून देतोस.(तुझ्या जागी मी असती तर महिनाभर तरी ब्लॉगचे तोंड पाहिले नसते. And U started new blog) तुझ्याकडून घेण्यासारखं बरंच काही आहे. You are always in continuos process of improving yourself.

  For new Blog – “वा मस्त मस्त मस्त… मी तुझे दोन्हीही ब्लॉग तितक्याच नेमाने वाचणार…”
  But Please reply comments (In English हॅ हॅ हॅ…) otherwise as said by deepak it would be one sided communication.

  keep improving… Cheers.

  —प्रिया.

 6. There’s a funny way to have good English. Read Pune Times(TOI) regularly.
  Specially gossips!! It may sound bizarre but it is true. (Tried & tested formula)
  आणि तेवढीच करमणूक पण!!!!! 😉

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s