आई ग

किती सतावते यार ही आई! गेले किती वर्षांपासून हे चालू आहे. प्रत्येक रुपात ती त्रास देते. आतापर्यंत नऊ अवतार झाले तिचे. बाबा ‘बिल्लू’ गेटच्या बाहेर का नाही हाकलून देत? गेले एक आठवड्यापासून एक पिल्लुसा टास्क करतो आहे. तरीही त्या आईच्या बाळ ‘बग’मुळे तो लांबतच चालला आहे. प्रत्येक डिझायनर आणि डेव्हलपर आयुष्यातील सर्वात जास्त वेळ आईच्या मस्तीखोर ‘बग’ सुधारण्यात घालवतो. बाकीचे कसे, म्हणजे फायरफॉक्स उर्फ मोझीला किंवा बाळ क्रोम. हव तर सफारी, ऑपेरा घ्या. कस समजुदारपणे आणि नीटनेटके काम करतात.

तसं आईच नाही. वेब साईटचा जीव मेतीकुटीला आणतात. त्या नाजूक नाजूक वेबसाईट. आईत पाहिलं तर, धड एकीकडे आणि बुड दुसरीकडे. बर, प्रत्येक अवतारात आईचे वेगवेगळे नियम. अमुक टॅग नाय चालणार आणि धमुक क्लास नाय वापरता येणार. हेच हव आणि तेच नको. हे ब्लॉक, ते अलाउ. बर, यामुळे किती हजार ओळींचा कोड वाढतो. बिचारा सर्व्हर ह्याचे डीप्लोय, त्याचा चेंज सहन करीत करीत किती थकून जातो. तरीही बाळ ‘बग’च्या उनाडक्या संपत नाहीत. त्याला वठणीवर आणता आणता डेव्हलपरचे काळे केस पांढरे होतात. अनेक जण तर आयुष्यभरात कधी त्या विंडोजच्या बाहेरच जग देखील पाहू शकत नाही.

काय करणार आयुष्याचा निम्मा वेळ झोपण्यात जाणार. वीस टक्के वेळ प्रवासात. आणि कामाच्या एकूण वेळेपैकी पंचवीस टक्के वेळ आईची सेवा करण्यात. सेवा कितीदा करायची? प्रत्येक सेवेत प्रत्येक जण किती गुंतला असतो. आईच्या बाळ ‘बग’मुळे डेव्हलपर बिचारे झोपेत सुद्धा ‘आई ग’ म्हणून विव्हळतात. काय करावे बरे? द ग्रेट गुगलची ‘आय’डिया वापरावी अस मनात येते. पण इथे सर्व डेव्हलपर आणि डिझायनर पडले गुलाम मंडळी. या इंटरनेटच्या जगात राज्य करणाऱ्या आईचे गुलाम. आईची प्रत्येक गोष्टच जालीम. तिला विसरून कसे चालेल.

त्यामुळे आई ग.. स्वतःला सुधार ग! जग कुठे चाललंय आणि तू कुठे आहेस ग! बाबा बिल्लू तर आजकाल मला लादेनच वाटू लागले आहेत. हो! बाबा बिल्लू खरच संगणक क्षेत्रातील लादेनच आहेत. प्रत्येक संगणकावर त्यांच्या ‘विंडोज कायदा’. आणि प्रत्येक डेव्हलपरवर ‘आय कायदा’. आणि दोन्हीही ठिकाणी हक्क दाखवणारा ‘बोगामा’ उर्फ बग.

विंडो उघड आई विंडो उघड!!! हे चंडमंड, वेब साईट मर्दिनी! सतावू नकोस ग! आई ग, तुझ्या ‘बग’ला आवर ग! डेव्हलपर मंडळीचा आयुष्याचाच गोंधळ झाला आहे. या गोंधळा ये ग! पण येतांना तुझ्या लाडक्या बाळाला नको आणू ग! विंडो उघड आये विंडो उघड! आई ग!!

Advertisements

6 thoughts on “आई ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s