फ्लेक्स

मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते.’तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय फ्लेक्स असतात. एका बिल्डरची जाहिरातीच्या फ्लेक्समध्ये संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. आणि बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या फ्लेक्सवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. आणि बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते.

पुढच्या चौकात येते. एक हिंदी कौटुंबिक मालिकेतील शोभणारी नायिका. साडी, गळ्यात मंगळसुत्र, कपाळावर कुंकू आणि केसांमध्ये देखील ‘सिंदूर’ नुसती पाहत उभी असते. म्हणजे त्या फ्लेक्स मध्ये ती अशी का पाहते तेच समजेनासे होते. आणि बाजूला ‘क्या आपके बिल्डरने आपके घर का सुरक्षा मिशन किया?’ लिहिले असते. फ्लेक्स कुणाचा आहे पाहतो तर वायरच्या जाहिरातीचे फ्लेक्स. त्याच्याच बाजूला पुन्हा त्याच कंपनीची एका दुसरी दिव्याची जाहिरात, एक मुलगी नुसतीच हसतांना. का हसते आहे कुणास ठाऊक, तिथे खाली एक प्रश्न ‘क्या आपके घर मे खुशियों का उजाला है?’. बस वेगाने निघते. पुढे पटापट एक दोन मोठ मोठे दादाचे हसतांना फ्लेक्स. कबड्डी स्पर्धेचे फ्लेक्स की दादाचे फ्लेक्स हेच समजत नाही.

पुढच्या सिग्नलला, शाहीद कपूरचा फ्लेक्स. मस्तपैकी स्टाईलमध्ये पाहतो असा. त्याच्या डाव्या हातात एक मोठे लाल रंगाचे घड्याळ. बाजूला लिहिले असते ‘विजेत्याला कधी एक्सपायरी डेट नसते’. फ्लेक्सच्या खालच्या बाजूला पेट्रोल कंपनीचा लोगो. मग ही पेट्रोल कंपनीची जाहिरात आहे की घड्याळाची असा भ्रम निर्माण होतो. बस सिग्नल सुटल्यावर निघते. सहज बाजूला लक्ष जाते तर एक भल्या मोठ्या आडव्या जाहिरातीच्या फ्लेक्सवर तो स्मॉल बी रागात पाहत असतो. आता तो असा का पाहतो आहे हेच कळत नाही, थोडक्यात ‘नो आयडीया!’. पुढे रस्त्यात एक गोड मुलीचा फोटो. बाजूला लिहिले असते ‘ऑनली फॉर फोर इयर किड्स’. बहुदा लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानाचा जाहिरातीचा फ्लेक्स असावा. बस धावत असते.

पुढच्या चौकात ते उदीता गोस्वामीचे टेनीस कोर्टवर फोटो. नुसताच तिचा फोटो आणि जाहिरात एका इमारतीची. आता इमारतीचा आणि तिचा काय संबंध असा मी विचार करीत असतो तोच. बाजूला आणखीन एक बिल्डरची असलीच जाहिरात. थोडे पुढे आल्यावर संजूबाबा एका पुडीची जाहिरात करतांना. त्यापुढे आल्यावर एका बस त्या सगळ्या मुलांसोबत तो वोडाफोनच्या कुत्र्याच्या फोटोचा फ्लेक्स. झु झु मुळे बिचाऱ्याचा जॉबच गेलेला. फ्लेक्स पाहिल्यावर आनंद वाटतो. त्यापुढे एक मुलगी कारच्या दारातून डोक काढून हसते आहे असा फ्लेक्स. ती अस का करते हे समजेपर्यंत आय सी आयसीआय, आणि यामाहाचे फ्लेक्स येऊन जातातही. बस पुढे निघते. एका बाजूला एका छान बाळाचा आणि त्याच्या आईचा फोटो. असो, एका हॉस्पिटलच्या जाहिरातीचा फ्लेक्स. बाजूला ‘बेस्ट केअर’ वगैरे लिहिलेलं.

त्यापुढे असेच युनीनॉर्चे अनाकलनीय फ्लेक्स.  पुढे बस एका चौकात येते. येत असतांना एका एसटीडी बुथवर छोटाच बोर्ड ‘चाय से मेहंगी कॉफी! मगर लोकलसे सस्ती एसटीडी’. मस्त आहे. पुढे एका बसस्टॉपवर एका बँकेचा फ्लेक्स. परंतु त्या मुलीचे कोणीतरी डोळे फोडल्याने भयानक वाटतो. त्यापुढे फर्निचर, लुट वगैरे. स्वेटर घातलेल्या मुला मुलींचे कपड्यांच्या दुकानावरील फ्लेक्स. थोड पुढ गेल की, सचिन आदिदासच्या बाहेर खुर्चीतला फ्लेक्स. थोड आणखीन पुढे आल्यावर एक मुलगी दुसऱ्या मुलीचे गालगुच्चे घेतानाचा फ्लेक्स. काय कळत नाही एअरची टेलला नेमक काय म्हणायचे आहे. एक बेडूक एका इन्स्टिट्यूटची जाहिरात करतांना. एक बोरावके ‘कु कुच कु’ चिकन चा बोर्ड. पुढे एक ड्रेस घातलेला ‘शौर्य’वान मुलगा.

त्यापुढे सचिनचा कौन जितेगा वर्ल्डकपचा फ्लेक्स वगैरे. बस थोडी अजून पुढे येते. परंतु फ्लेक्स काय संपत नाहीत. इंडीयन क्रिकेट लॉटरीचे मिस्कील चित्र ‘अमूल’च्या फ्लेक्सवर. पुढे हा ज्वेलर, तो सन्स, स्पा, ही बाईक आणि ते हाऊस. शेवटी चिमण्यांच्या बसस्टॉपवर उतरतो. तो बाजूला पुन्हा स्मॉल बी रागात! असा का पाहतो याची शेवटपर्यंत ‘आयडीया’ येत नाही. काही आयडिया आहे का? तो असा का पाहतो?

Advertisements

3 thoughts on “फ्लेक्स

 1. अरे..काय सत्य लिहिलयंस. मला तर पुण्यात प्रवेश करताना (विशेषतः एक्सप्रेसवे साईडने) असं वाटतं की पुण्यात रियल विष्टेट सोडून..
  दुसरा काही बिझनेस आहे की नाही..सगळीकडे आपली स्वप्नातली घरं..मुलांना खेळायला भरपूर जागा कशी आहे..रिलिव्ह युअर लाईफ..and what not..

  दहा फुटाला एक अशी फ्लेक्स बॅनर्स दोन्ही साईडना..आणि सगळीच फक्त & फक्त रियल इस्टेट

 2. pune kay re he ata tar sagli kade chalu ahe ………………………………….devane jase ,dongar, darya,prani,pakshi he nisarga la vardan dile tase…………………………………flax pan dile samjuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu

 3. प्रिय हेमंत,

  आमच्यापैकी अनेकजण तुझे लेख ‘ई-मेल’ ने, ‘फिड’ ने वाचतात, तरी तू कृपया तुझ्या ब्लॉगची फिड ‘पूर्ण’ स्वरुवात देण्याबाबत एकदा विचार कर. तूच तुझ्या एका लेखात सांगितल्याप्रमाणे तुला लेख चोरीची पर्वा देखील नाही आणि ज्यांना चोरी करायचीच आहे, ते ती कशीही करु शकतात (कॉपी आणि पेस्ट करुन). त्यानंतर तुझा ब्लॉग व्यावसायिक देखील नाही. तेंव्हा अधिकाधिक लोकांना तुझा ब्लॉग वाचणं सोयीचं जावं असं वाटत असेल, तर कृपया तू यावर विचार कर. मी देखील माझ्या anudini.in या ब्लॉगची फिड पूर्ण स्वरुपात ठेवली आहे. तरी तू फिड पूर्ण देण्याबाबत विचार करशील अशी अपेक्षा आहे.

  धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s