हे काय आहे?

आज सकाळी सकाळी डोळे उघडले तर, ‘अआई’ माझ्याकडे पाहून ती तिच्या ठरलेल्या स्टाईलमध्ये, म्हणजे मान उजव्या बाजूला झुकवून हसत होती. एकदम मस्त! विसरला नाहीत ना! ‘अआई’ला? खूप दिवसानंतर आज एकदम मस्त वाटत होत. नंतर पुन्हा डुलकी लागलेली. म्हणजे धड झोपेतही नाही आणि जागा आहे असही नाही. मला माझ्या आईच्या आणि तिच्या गप्पा ऐकू येत होत्या. मागील महिन्यात वडिलांनी मला एक ‘टी-पॉय’ घेऊन दिलेला. तो ‘टी-पॉय’ स्टीलचा आहे. आणि वरच्या बाजूला एक जाड काच. तो मी बाहेरच्या खोलीत ठेवला आहे, त्यावर माझी मी बीसीएची आणि माझ्या कोर्सच्या वेळी मिळालेली पुस्तके ठेवलेली आहे. म्हटलं कोणी घरी आल्यावर तेवढंच आपल इम्प्रेशन!

हाहा! तसं खर कारण, त्या उंदीरच्या मॉम आणि तिची ते आठ लहान लहान पुत्रांनी माझ्याकडे असलेल पुठ्ठ्याच्या खोक्याला आणि त्यातील या पुस्तकातील काही पुस्तके कुरतडलेली. त्यामुळे, त्यांना ‘गेट आउट’ केल्यावर दुसरी चांगली जागा नव्हती. असो, तर ‘अआई’ला आजकाल तो टी-पॉय म्हणजे खूपच अजब वस्तू झाली आहे. रोज तो टी-पॉय पाहणे हे तिचे आवडीचे काम. आज सकाळी देखील ती ‘अआई’ तेच करीत होती. त्यावरील प्रत्येक गोष्ट, पाहून आपले ‘हे काय आहे?’ अस माझ्या आईला विचारात होती. आईसाहेब तीन दिवसांपूर्वी आल्या. कारण, सांगावे लागेल काय? सोडा ते.

‘अआई’ आता बरेच काही बोलते. म्हणजे परवा आईने तिला ‘बाबा कुठे आहेत?’ अस विचारल्यावर ती ‘नाsना’ म्हणाली. बहुतेक ती तिच्या आजोबांना नाना म्हणते. आणि काय बोलते! आजी, आजोबा, ममी, पप्पा आणि मला ‘काक्वा’. काका अजून नाही बोलता येत. पण तिच्या तोंडून तिचे बोबडे बोल जाम मस्त. मजा येते. पण काही नाही आले की बोट करून ‘अं अं’ चालू असते. मागील आठवड्यात संक्रांतीच्या दिवशी आलेली. तिच्या आई वडिलांनी मला तिळगुळ दिला. ही अआई नुसतीच घरात आली. आणि ना तिळगुळ घेतला आणि ना दिला. रागावली होती. एक जानेवारीला मी माझ्या या नव्या फोटोने तिचे फोटो काढायचो. आणि फोटो काढला की, ती तिच्या आईला दाखवायला घेऊन जायची. नंतर मला बाहेर जायच्या वेळी मी तिला माझा मोबाईल दिला नाही तर ती रुसली. दोन-तीन दिवस मला पाहून पळून जायची.

परवा घरी आली त्यावेळी तिला एक पेन्सिल दिली. नंतर टोक करायचे अस काहीस म्हणायचे होते. तर ही पेन्सिल एका हाताने पकडून दुसर्या हातात गोल गोल फिरवून दाखवत होती. खूप उशिरा लक्षात आले माझ्या. मग तिला एक शार्पनर देखील दिले. मग बाईसाहेब खुश! अरे एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली की, तिला १ अंक काढता येत नाही. परंतु २ हा अंक काढता येतो. मजा येते. एक काढून दाखवला तर डॉन काढून दाखवते. आज सकाळी काही लक्षात आले नाही परंतु आईच्या मागे ‘हे काय आहे?’ म्हणून मागे लागलेली. मी जेव्हा पुन्हा उठलो त्यावेळी पाहीले तर आईला बाहेर जायचे होते. आणि ती निघून गेलेली. मस्त पण!

Advertisements

3 thoughts on “हे काय आहे?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s