बाईक घेतली

एक आनंदाची बातमी द्यायची आहे. शेवटी दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तिची ‘चाक’ माझ्या घराकडे वळली. तिची म्हणजे बाईकची. मी मागील डिसेंबरच्या सोळा तारखेला तिला म्हणजे हिरो होंडा पॅशन प्रो बुक केलेली. आज माझा मित्र आणि मी तिला आणायला गेलेलो. आकाशी रंगाची, ती सकाळी आकाराच्या सुमारास शोरूम मधून घेतली. घरी आल्यावर तिची पूजा केली. या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणे’ ‘अआई’ होती. इमारतीच्या गच्चीत बसून त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली. माझ्या मित्राने पूजा सांगितली. तसे दोन देडफुटे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे स्थळ माझ्या इमारतीच्या बाजूला जोडून असलेले साई मंदिरा समोरील जागा.

मस्त! खर तर अस बाईक हवीच अस काही नव्हते. पण वडिलांनी दीड वर्षापूर्वीच न मागता परवानगी दिलेली. मागील मंगळवारीच आणणार होतो. परंतु वडिलांनी ‘मुहूर्त’ नाही अस म्हणाल्याने थांबावे लागले. आज सकाळी पावणे बारा पर्यंत दिवस चांगला आहे अस सांगितलेलं. थोडक्यात ‘मुहूर्त’ होता. अकरा वाजेच्या सुमारास गाडी घेतली. ते नारळ वगैरे वाहून टाकला. आणि नंतर पूजा. कंपनीत येतांना मित्राला सोडलं. असो, एकूणच छान! रोज त्या बससाठी धावपळ करावी लागायची. रात्री कंपनीतून बसच्या वेळेसाठी लवकर निघावे लागायचे. चिंता आहे ती फक्त, माझा चालण्याचा रोजचा जो व्यायाम व्हायचा तो बंद होईल. पाहुयात कस होते ते. बाकी आई वडील आनंदी आहेत.

अरे! एक महत्वाचे सांगायचे राहिलेच. आजच्या दिवसात, महिन्यात आणि वर्षाच्या शेवटी ‘एक’ अंक. मी बाईक घेतली त्या वेळेतही ‘एक’ अंक. आणि सर्वात आनंदाची गोष्ट माझ्या बाईकचा नंबरचा शेवटचा अंक देखील ‘एक’. आणि गाडीच्या नंबरची बेरीज देखील ‘एक’ अंक. मस्त योगायोग आहे. असो, तसा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. चार वर्षापूर्वी म्हणजे ३१ जानेवारी २००७ ला मी माझ्या जीवनातील पहिला इंटरव्ह्यू दिलेला. दोन राउंड ओके. तिसऱ्याला बोंबलल. मागील वर्षी ३१ जानेवारी २०१० देखील एक इंटरव्ह्यू झालेला. पण जॉबसाठी नाही, ‘स्थळ’चा इंटरव्यू. ते आपल ‘हो नाय हो’. आणि ‘एक’ महत्वाची गोष्ट राहिली. बोलू की नको? नकोच. लायसन्स काढायचे बाकी आहे. ते या आठवड्यात जसा वेळ मिळेल तसा काढून घेतो. असो, बाकी बोलूच..

Advertisements

8 thoughts on “बाईक घेतली

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s