रानडुकरे

या रानडुकरांची काय कथा वर्णावी? ही रानडुकरे सतत शहरात इकडून तिकडे यथेच्छ संचार करीत असतात. कुठूनही कसेही आणि कधीही हे निघतात. वाटेल तिथे, हवे तसे उभा राहतात. भर रस्त्यात ह्यांना सावज दिसलं की, हाणलाच ब्रेक. आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ ह्यांना अधिकच बेकाबू करते. तसे नियम त्यांना लागू होत नाहीत की, ते नियम ह्यांना नकोसे असतात. हे त्या आरटीओ नावाच्या परमेश्वराला माहित. अस नाही की माझ्यासारखे ‘घोडेस्वार’ फार गुणी असतात वगैरे. सर्वच घोडेस्वार नियम पाळतात अस मुळीच नाही. परंतु, चुकीची शिक्षा स्वतः भोगतात. पण तस् ह्या रानडुकरांच नाही. आणि या पुण्यात इतका सुळसुळाट झालाय न या रानडुकरांचा की, बोलायची सोय नको.

मी माझा घोडा दौडवत येत असतो. आणि मधेच इवल्या इवल्या आळीतून अचानक एखाद दोन डुकरे रस्त्यावर येतात. ह्या डुकरांचा वेग तो कितीसा?. तरीही रस्त्याच्या उजव्या बाजूने धावण्याचा अट्टाहास. बर ह्यांचे सावज रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी असतात. आणि ही डुकर रस्त्याच्या उजव्या बाजूला. बर ह्यांना ऐकू येते की नाही कुणास ठाऊक. हत्ती, उंट कधी कधी तर लाल रंगाचे यमदूत देखील यांच्यामुळे खोळंबून जातात. रस्त्यावर धावणारे इतर प्राणी देखील ह्या रानडुकरांच्या अचानक येण्याने भयभीत होतात. बर ह्या डुकरांना किती ती घाई! चित्ते देखील चित्त हरवून ह्यांना होर्न वाजवतात. परंतु ही डुकरे काय सरकत नाहीत. आणि सिग्नल मोडणे हा तर ह्या रानडुकरांचा जन्मसिद्ध अधिकाराच आहे.

मागील आठवड्यात निगडीतील भेळ चौकात एका रानडुकराला आपला जन्मसिद्ध अधिकार बजावतांना वीरमरण प्राप्त झाले. लाल दिवा असतांना आणि समोर देव उभा असतांना तो रानडुक्कर सिग्नल मोडून निघाला आणि एका हत्तीच्या पायाखाली गेला. हत्ती एका कंपनीचा. बाजूच्या लोकमान्य हॉस्पिटलात आता डुकराचा चालक आणि सावज पडून आहेत. इतक होवून देखील कोणताच नियम हे मानत नाहीत. अचानक कुठेही हे ब्रेक दाबतात. आणि वळतांना इंडिकेटर दाखवण्याचा संकेत ही डुकर मानत नाहीत. गर्दी कितीही आणि कशीही असो. ही डुकरे आपल्या सवयी सोडतही नाहीत. त्या परमेश्वराचे उपकार म्हणायचे की, ह्या डुकरांना हायवे निषिद्ध आहे. नाहीतर कल्याणाच होत इतर प्राण्यांच!

तसे पुण्यातील सर्वच प्राणी हे ‘आगाऊ’. मुंबईतील प्राण्यांप्रमाणे सोज्वळ नाहीत. रांगेत न चालणे हाच इथला अघोषित नियम. पण ही डुकरे भलतीच बदमाश. भर चौकात यु टर्न. आणि तोही बाकीच्या प्राण्यांना न पाहताच. आणि कोणी चुकूनही ह्यांच्या पुढे आला की झालीच ह्या डुकरांची ‘ड्रॉ ड्रॉ’ सुरु. हे अचानक कुठेही थांबणार. आणि मागील प्राणी गडबडत बाजूने घ्यायला जाणार तर ही त्यावेळेस त्याच बाजूला वळणार. आणि डुकराला धक्का लागला तर सुरूच मग. ते डुक्कर चावाल्या शिवाय सोडणारच नाही.

मध्यंतरी मी, कच्ची दाबेलीच्या गाडीवर दाबेली खात उभा होतो. तर कोणास ठाऊक कस, पण तिथ आल एक डुक्कर. आणि नेहमीप्रमाणे अचानक ‘ब्रेक’, मागून चाललेल्या चित्त्याने गडबडून ब्रेक दाबला. थोडासा डुकराला स्पर्श झाला तर, डुकराने लगेच शे-दोनशेचा चावा घेतला. अशी महान डुकर प्रत्येक ठिकाणी मीटर न ‘फिरवता’ फिरतात. आणि अचानक कुठेही, कसेही आणि कधीही रस्त्यांवर धावतात. आणि रस्त्यावर ‘खोळंबा’ करतात. मी घोड्यावर असो अथवा नसो परंतु डुकरांपासून आजकाल चार हात लांब राहतो. कधी कसे आणि कुठून येऊन चावतील याचा नेम नाही.

Advertisements

4 thoughts on “रानडुकरे

 1. >>>पुण्यातील सर्वच प्राणी हे ‘आगाऊ’. मुंबईतील प्राण्यांप्रमाणे सोज्वळ नाहीत.

  मी माझ्या पुण्यातील मित्रांना कधीपासून हेच समजावायचा प्रयत्न करतेय… आम्हा मुंबईतल्या लोकांची गोष्टच वेगळी Jokes apart

  And 1 more : ‘कच्ची दाबेली’ नसते रे ती ‘कच्छी दाबेली’ असते…

  —Priya

 2. Ekdum Puneri dukra :D..
  Pahilya 5-10 lines madye tumchi Randukra kon ahet hyacha andajach yeina…[i was confused if u wer writing abt d stary pigs?or u really encountered some wildhogs arnd pune]But den as i Contined reading…DAT IS AWSUM PERSONIFICATION!!!
  maze anubhav..
  Puneri Indiacator:
  1. 2wheeler la arsa nasla ki jya bajula valaychay tya bajula ugach Mage maan valvun bagayach..mag apanach samjaycha ha turn ghenar ata bahutek..
  2.Lane kay asti amhale mahit nai,Fill in d blanks cha funda lai bhari…
  3.Pune ani tumcha route varche sare Busstop herun Theva,Mhanje PMPMPL cha Varah ekdum bajula valala tar ekdum ascharya nako vatayla
  .
  cya arnd..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s