क्षमता

मला नेहमी अस वाटत की, आपण आपल्या स्वतःकडे फार कमी लक्ष देतो. म्हणजे सचिनने ठोकलेली शतकांची संख्या, ओबामाचा दौरा किंवा आमीरने केलेल्या चित्रपटांची संख्या. परंतु आपण स्वतःला अस कधी पहातच नाही. आपल्याला पी टी उषाचा धावण्याचा वेग माहिती. परंतु आपला किती? हे नक्कीच आपण पहात नाही. दबंग मधील सलमानने कोणता ड्रेस घातला किंवा एखाद्या नटीने एखाद्या चित्रपटात किती किस दिले याची संख्या आपणाला माहिती असते.परंतु आपल्याकडे एकूण किती कपडे आहेत याची संख्या नक्कीच आपणाला माहित नसेल.

कदाचित अंगात घातलेल्या शर्टवरील बटणाची संख्या किती? अस विचारल्यास ती देखील एका क्षणात आपण सांगू शकत नाही. सरकारच्या खजिन्यात सध्या किती रक्कम आहे. अथवा सरकावर किती कर्ज आहे हे आपण अचूक सांगू शकतो. परंतु, आपण गेल्या वर्षभरात किती रक्कम खर्च केली? किंवा किती पैसे वाचवले, ह्याचे उत्तर देणे कठीण होईल. त्यामुळे मला अस वाटत, की आपण स्वतःपासूनच अनोळखी आहोत. कोणी काय करायला हव. काय केल्याने भ्रष्टाचार संपेल वगैरे आपण जाम आवेशात बोलतो. परंतु स्वतःचा पगार किंवा मिळणारी रक्कम एखाद्या लाखाने कशी वाढेल याचा आपण असा विचार करीत नाही. मला तरी अस वाटत की, आपण आपल्यासाठी असतो. प्रत्येक कठीण असो अथवा अन्य कोणताही क्षण. त्या प्रसंगाला सामोरे जायला देखील आपण एकटेच असतो. मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

स्वतःवर विश्वास असेल तर ठीक, नाहीतर गडबड झाल्यावाचून रहात नाही. देश आणि कर्तव्याच्या गोष्टी चुकवून स्वतःमध्येच गुंतून पडा, अस मला बिलकुल म्हणायचे नाही. परंतु, आपण जर आपलाच शोध घेतला नाही. आपण काय आहोत? आपली क्षमता किती? हेच आपणाला माहित नसेल तर स्वतःमध्ये बदल. आपल्या स्वतःमध्ये विकास कसा घडवून आणणार? मी दहावीत असतांना, मराठी विषयाच्या पुस्तकात एक धडा होता. धडा होता विनोबा भावेंचा. धड्याच नाव होत ‘स्वरूप पहा’. त्यातही त्यांनी अर्जुनची गोष्टीच्या रुपात हेच सांगितलेलं. की स्वरूप पहा विश्वरूपाची चिंता करू नका. साधी गोष्ट आहे. मी रोज पाच किमी चालतो. आता हिशोब म्हणाल तर गेल्या दहा-बारा दिवसात एकूण अकरा तास चाळीस मिनिटात मी सत्तावन्न किमी चाललो आहे. माझा धावण्याचा वेग ताशी दहा किमी आहे. आता हे सगळ सांगू शकतो, कारण, असे मोजमापाचे माझ्याकडे टूल्स आहेत.

तस् पहिले तर हे सगळ निरर्थक वाटेल. परंतु, जर आपण आपली क्षमता ओळखलीत तर आपण नेमके काय आहोत याचा अंदाज येईल. माझ्या वडिलांच्या मते, जीवन जे आहे हे श्वासावर अवलंबून आहे. प्रत्येकाचे श्वास हे ठरलेले असतात. आत्मा, मन, मेंदू हे सगळ मान्य. परंतु, त्याचसोबत आपले शरीरही तेवढेच महत्वाचे आहे. शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ. शरीर सुदृढ तर मन देखील सुदृढ. आता हे तंतोतंत जरी नसले तर बहुतांशी खरे आहे. मला हे मान्य आहे की, मनात प्रचंड शक्ती असते. एखाद्याचे मन स्वतःसोबत इतरांना देखील उर्जा देवू शकते. ह्या नुसत्या गप्पा वगैरे नाहीत. दुसऱ्या पेक्षा स्वत:बद्दल बोललेलं अधिक चांगल.

अगदी लहानपणापासून मला माझे आई वडील नेहमी सोबत आहे अस नेहमी वाटत. माझी बहिणाबाई देखील. हा वेडेपणा वाटेल. परंतु, हेच सत्य आहे. थोडक्यात, माझ्याकरिता ते पॉवर स्टेशन आहेत. आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी अजून एका पॉवर स्टेशनची यात वाढ झाली आहे. असो, विषयावर येवू. मला फक्त अस म्हणायचे आहे की, स्वत: नेमके काय आहोत हे लक्षात आले तर आपली अधोगती होते आहे की प्रगती याचा आलेख काढले सोपे होईल. दुसऱ्या सोबत बरोबरी अथवा त्याच्याशी स्पर्धा करण्यात काही अर्थ नाही अस मला वाटते. प्रत्येकाची क्षमता, मग ती शारीरिक असो अथवा मानसिक वेगवेगळी असते. त्यामुळे स्पर्धा स्वतःशीच केलेली कधीही उत्तम.

स्पर्धेपेक्षा आपण आधी कसे आणि आता कसे यातील जरी फरक ताडला तरी उत्तम. क्षमता प्रत्येक गोष्टीत भिन्न असते. कामात जसे असू तसे कदाचित बोलण्यात अथवा शारीरिक कष्टाच्या कामात. त्यामुळे क्षमता वाढवणे आणि त्यासाठी स्वतःची क्षमता ओळखणे हेच कधीही योग्य.

Advertisements

2 thoughts on “क्षमता

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s