तो आणि ती

तो शांत. ती मस्तीखोर. तो कायम घरात असतो. आणि ती कायम घराबाहेर. तो खर्च वाचवणारा. आणि ती वेळ वाचवणारी. परंतु दोघेही कामसू. त्याला सॉफ्टवेअरचे वेड आणि तिला रस्त्यावरून फिरायचे. त्याला मैत्री करायला जमते. ती कोणाशीच जुळवून घेऊ शकत नाही. तो व्हर्चुअल जगात रमणारा. कल्पना करणे. आणि त्या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया साकारणारा तो किमयागार.

ती वास्तववादी. सदा जमिनीवर राहणारी. वास्तवाचीच ओळख करून देणारी. तो नाजूक, प्रत्येक गोष्ट त्याची हळुवारपणे आणि काळजीपूर्वक. ती कणखर आणि आघात सोसणारी. तिची प्रत्येक गोष्ट आव्हानात्मक. त्याला धुळीची एलर्जी. आणि ती धूळ आणि धुरात राहणारी. तो लंच करतो. ती ड्रिंक. परंतु कधीही ती ‘टल्ली’ होत नाही. परंतु, अनेकदा तो अकारण ‘टल्ली’ होतो. तो स्लीम, ती फॅट. तरीही तो ‘कुल’ आणि ती ‘हॉट’. तो प्रोफेशनल लोकांची शान वाढवतो. तर ती, अनेकांची ओळख. परंतु दोघेही आपआपल्या परीने मदतीचा कायमच हात देणारे.

तो जेव्हा माझ्या घरी आला तेव्हा तेव्हाही खूप आनंद झालेला. आणि ती ज्यावेळी घरी आली त्यावेळेसही खूप आनंद झालेला. सध्याला ती माझी साथीदार आहे. तो देखील होता. परंतु, गेल्या दोन-तीन महिन्यापासून तो कोमात गेला आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन खर्च खुपच जास्त सांगितला. सध्याला तो सोबत नसल्याचे दुख:ही आहे. आणि ती सोबत असल्याचा आनंद. उद्या ऑपरेशन न करताच दवाखान्यातून मी त्याला डिस्चार्ज करून घेऊन येईल. जातांना तिच्यासोबत जाईल.कधी कधी वाटत, त्याचा भावाला घरी बोलवावे. पण असो, तूर्तास बिचारा तो थकलेला, भागलेला. कोमातील ‘लॅपटॉप’ला आणायला जाणार आहे. तस् तिच्यासोबत म्हणजे बाईक सोबत असेलच!

Advertisements

13 thoughts on “तो आणि ती

  1. ती म्हणजे बाइक ते वाचताना कळाले पण तो म्हणजे लॅपटॉप हे कळायला जरा वेळ लागला.

    पण मस्त मस्त मस्त….

    —प्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s