मुन्ना बदनाम हुआ..

संपादकांच्या परिषदेत मुन्ना आला. सर्वांना आपली ठरलेली ‘म्याऊ’ स्माईल देत सर्वांना अभिवादन केले. स्वतः खुर्चीवर बसल्यावर स्वतःच्याच हाताने स्वतःलाच चिमटा घेऊन पाहिले. सर्व संपादक अवाक होवून मुन्नाकडे पहात होते. मुन्नाने सर्वांकडे पुन्हा पाहून बसण्याची खुण केली. सर्व संपादक मंडळी खुर्चीत स्थानापन्न झाली. पहिला संपादकाने, ‘पंतप्रधानजी तुम्ही स्वतःचा चिमटा का काढला?’. प्रश्न ऐकताच मुन्नाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

त्या हास्यामुद्रेतच मुन्ना बोलू लागला ‘मी या खुर्चीत बसल्यापासून स्वप्नात असल्याप्रमाणे वाटते. म्हणून मी रोज स्वप्नात की सत्यात हे पाहण्यासाठी अस करतो’. हे ऐकताच सर्वजण हसू लागले. दुसरा संपादक ‘पंतप्रधानजी, ‘टू’जी बद्दल काय कारवाई?’. मुन्ना ‘बल्ले बल्ले, दोन्ही जी माझे सर्वस्व आहेत. कारवाई कशाला करू? उलट ते माझ्यावर कारवाई करतील की काय याचीच सतत भीती मला असते’. सर्व संपादकांकडून आपसूक ‘काय?’. आवाजाची पातळी पाहून, मुन्ना गडबडला. मुन्ना दबक्या आवाजात ‘ओये, काय झाल?’. तो संपादक करड्या आवाजात ‘तुम्ही टू जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यातील ए. राजा आणि आरोपींना काहीच शिक्षा देणार नाहीत का?’.

मुन्ना थोडा शांत होत ‘अच्छा, अस होय. मला वाटल तुम्ही सोनियाजी आणि राहुलजी बद्दल बोलत आहात. त्याच सोनियाजी जे आदेश देतील ते मी करणार. आणि त्यांनी अजून अस काहीच कळवले नाही. आम्ही काय बुवा हुकमाचे ताबेदार!’. तिसरा संपादक उठून ‘पंतप्रधानजी, महागाई डिसेंबर २००९ मध्ये कमी होईल अस तुम्ही म्हणाले होते. त्याच काय झाल?’. मुन्ना थोडा विचार करत ‘अस मी म्हणालो?’ संपादक ‘हो’. मुन्ना ‘नाही आठवत रे. पण चल ठीक आहे. महागाई यावर्षात मी कमी करून दाखवीलच!’. पुढचा संपादक ‘तुम्ही आमच्या सरकारकडून कर्ज घेत आहात? ते कशासाठी?’. मुन्ना त्या संपादकाकडे पहात ‘तुम्ही गुजरातचे की ब्रिटन?’ संपादक ‘ब्रिटन? माझ्या रंगावरून नाही आल का लक्षात?’. मुन्ना ‘नाही तस् नाही. आजकाल गोरे लोक जरा जास्तच गुजरात मध्ये फिरतात. आणि त्याच काय आहे. ते दोन सरकारच आम्हाला कायम कर्ज देतात. बाकीचे घेतात.’. संपादक ‘कर्जाचे कारण?’. मुन्ना खिन्न होत ‘अजूनही आमचा देश गरीब आहे. गरिबी खुप वाईट गोष्ट आहे. माणसाला काय काय नाही करायला लावत? तुम्ही बघतच असाल देशात गरिबीमुळे आता नेतेही..’. पुढचा संपादक ‘पंतप्रधानजी, स्वीस बँकेत ब्लॅकमनी असलेल्या लोकांची नावे कधी जाहीर करणार?’.

मुन्ना खडबडून ‘जरा हळू, मॅडम ऐकेल’. संपादक ‘म्हणून काय झाल? तुम्ही पंतप्रधान आहेत. तुम्ही सरकारचे प्रमुख आहात. घटनेने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे’. मुन्ना घाम पुसत ‘मी काय बोलू आता? माझी व्यथा समजून घ्या. जर नावे जाहीर केली तर.. मॅडम माझी कत्तल करेल’. संपादक ‘का?’. मुन्ना घाबरत बारीक आवाजात ‘मॅडमचे मिस्टरांचे नाव सुरवातीलाच आहे. बोफोर्सची मनी तिथेच तर पडून आहे’. संपादक आवेशात ‘तसा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून देखील तुम्ही अस करीत आहात’. मुन्ना ‘चल हट! देशाची एकचं क्वीन!’. आणि उठून नाचायला सुरवात केली. ‘है तुझमे बोतल का नशाsss!… तू एटम बॉम्ब हुई!!’ म्हणून मुन्ना दिलखुलास नाचू लागला. एक संपादक ताबडतोप उठत ‘मुन्ना जी पण मंत्रिमंडळात जुन्याच नेत्याचा समावेश का केलात?’. मुन्ना बल्ले बल्ले करीत ‘मॅडमने यादी बनवून दिलेली’. पुढचा एक संपादक ‘जेपीसीची मागणी आधीच का नाही मान्य केली?’. मुन्ना अचानक या वाक्याने थांबला व खुर्चीवर बसला आणि ‘मी आधीपासून तयार होतो. पण मॅडमने..’. सर्वत्र शांतता पसरली.

मुन्ना उदास झाला. सर्वांकडे पहात ‘माझ कोणीच ऐकत नाही. जेपीसीच काय जेसीबी समोर मी जायला तयार होतो. पण.. पण माझ कोणी ऐकल तर ना!! २००७-२००८ ला मी किती चिठ्या पाठवल्या त्या राजाला पण त्याने एकाचे उत्तर नाही पाठवले. महागाईत देखील गारदने असेच केले. मी काय करू? मी निष्कारण, यात गुंतलो. मॅडम मला काहीच करू देत नाही..’. सर्व संपादक शांत होते. मुन्ना खाली मान घालून हुंदके देऊ लागला. सर्व संपादक मुन्नाची समजूत काढू लागले. मुन्ना थोडा सावरत, स्वत:चे डोळे पुसत मुन्ना बदनाम हुआ मॅडम तेरे लिये! म्हणत परिषदेतून निघून गेला…

Advertisements

One thought on “मुन्ना बदनाम हुआ..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s