शतक

आजचा दिवस एकदम मस्त आहे. आज माझी बाईकचा वेग वाढला. वाढून ‘शतक’ ठोकले. गेले पंधरा दिवसात सर्वात जास्त वेग ताशी ऐंशी किमी. पहिले चार -पाच दिवस तर ताशी साठ किमीपेक्षा अधिक होतच नव्हती. माझ घर ते कंपनी बावीस किमी अंतर आहे. तस् हायवे जातो त्यामुळे एकूण अंतरात फक्त सात सिग्नल. त्यात पीसीएमसी मध्ये तीन आणि पुण्यात आल्यावर चार सिग्नल. मोजून पस्तीस मिनिटे लागतात. जाम मजा येते बाईक चालवतांना. तसे मी काही ‘धूम’ वगैरे नाही. माझा माझ्या मनावर आणि बाईकवर कंट्रोल असतो. एकटा असल्याने बाईकचा वेग वाढवायला काही चिंता नसते.

लहानपणी चालत्या रेल्वेतून बाहेर बघतांना ‘मामाच्या गावाला जाऊया..’ गाणे मनात गुणगुणले जायचे. लोकलच्या गेटवर उभा राहून प्रवास करतांना फुल बास असलेली गाणी ऐकायला खूप आवडायची. पण आता बाईकवर ‘धूम’ची गाणी मनात तरळत असतात. पण मी हेडफोन लावत नाही. एकतर हेल्मेट घातल्यावर बाहेरचा आवाज खुपच कमी ऐकू येतो. त्यात कोणी आडवे तिडवे, कसेही चालतात. त्यामुळे चहुकडे लक्ष ठेवावेच लागते. काय वर्णन करावे आम्हा पुणेकरांचे. ते सोडा, आज वेग वाढल्यावर त्या मीटरकडे पाहिल्यावर इतका आनंद झालेला. मीटर मधील त्या ‘काट्याने’ शतक ओलांडलेल. तशी माझी बाईक चालवतांना एकदम ‘स्मूथ’. काल माझ्या काकूला पुण्यात घेऊन येतांना जाम टेन्शन होत. एकतर, अस कोणाला घेऊन जाण्याचा पहिलीच वेळ होती. म्हणजे भाऊ, बहिण आणि दोस्त कोणी माझ्या मागे बसले असेल तर मला काहीच वाटत नसते. पण गाडी चालवतांना खड्डे चुकवतांना आणि त्यात काकू, त्यात तिची भली मोठी बॅग. तिच्या मोठ्या भावाची बायको आजारी. तिला भेटायला जायचे होते. त्यात त्या खडकी बाजार आणि येरवडा आणि या पुण्यातील गल्लीबोळा जाम डेंजर. कोणी कधीही कुठूनही अचानक समोर येते.

खर तर बाईक वेगात चालवणे एकदम सोपे. पण हळू चालवणे एकदम अवघड. चाळीसच्याच काय पण तीसच्या पुढे नेणे ही शक्य होत नव्हते. त्यात पुणे स्टेशन आणि त्या रास्तापेठ मधील रस्ते. आणि त्यात ते हेल्मेट घालून माझ डोक जाम दुखायला लागलेलं. पण आज एकदम धूम! माझा रोजच्या दिवसातील सर्वात आवडीचा क्षण म्हणजे बाईक चालवणे. असो, बाईक अजून फार काही एव्हरेज देत नाही. मला ना, एकदा त्या सर्वात कमाल वेगाने बाईक फिरवायची इच्छा आहे. एकशे चाळीस ही कमाल मर्यादा आहे. तशी अजून पोहायची इच्छा आजकाल खूप आहे. येत नाही, पण भीती वाटत नाही. असो, बाकी बोलूच.

Advertisements

5 thoughts on “शतक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s