महिला दिन

आज खरोखरच महिला दिन आहे, याची प्रचीती येत आहे. सकाळी रस्त्यात एक आजी आडव्या आलेल्या. इतका भला मोठा डिव्हायडर कसा ओलांडला हाच मी अजून विचार करतो आहे. किती होर्न वाजवला. मिनिटभर मी माझ्या बाईकचा होर्न वाजवत होतो. आजींना ऐकू नसेल येत. पण दिसत तर होते ना. पार जवळ गेल्यावर अगदी फुटभर अंतर उरल्यावर आजींनी माझ्याकडे पाहण्याचे कष्ट घेतले. पाहून त्यांना धक्का बसण्या ऐवजी मलाच बसला. माझीच धडधड वाढलेली. त्यांच्यात तूसभर देखील फरक नाही. अस अचानक, ते सुद्धा पुलावर! अर्धा माणूस भरेल इतका मोठा डिव्हायडर होता. आजींना पाहून अस वाटत होते की रेहमानला सोबत घेऊन ‘मा तुझे सलाम’ गाणे म्हणावे.

पुढे कावळ्यांच्या कॉलेजच्या सिग्नलला एका काकूने आपली कार टर्नला बंदी असतांना टर्न मारला. मग काय होणार पोलिसांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घ्यायला सांगितली. सिग्नलच्या पुढे एक कावळिणीच्या ‘नन्ही मुन्नी’ पाहिले. पाहून जाम हसू येत होते. तिच्या नन्ही मुन्नीला एक आरसा नव्हताच. दुसरा तिच्या विरुद्ध दिशेला केलेला. यार, या मुली म्हणजे जाम ‘मिस्ट्री’ असतात. म्हणजे त्यांच्या सौंदर्य आणि हुशारीबद्दल काहीच शंका नाही. पण त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल. म्हणजे कधी कधी तर मला या मुली म्हणजे विचारांचा गुंता, विचारांचे जंजाळ वगैरे वाटते.

विषय कोणताही असो. ह्या इतका विचार करतात की, तो ‘विचार’ देखील कंटाळत असेल. आणि फिल्मी तर इतक्या. मागील आठवड्यात काकाच्या घरी चाललेलो. रात्री नऊ साडेनऊची वेळ असेल. त्या निगडीतील म्हाळसाकांत चौकात एका बाजूला एक अर्ध्या जोडप्यांची म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची वादावादी चालू होती. विषय नाही लक्षात आलेला. पण ती मुलगी काय बोलत होती, हं आठवलं. काय म्हणाली माहिती आहे? ‘सच के साथ जिया जा सकता है! झूट के साथ नही’. हाहा! अजूनही आठवल की हसू येत. परवा मी बाईकवर होतो म्हणून, माझ्या लहान भाऊ बहिण दोघांकडून पाहून म्हणालो की ‘चला चक्कर कोणाला मारायची?’ तर बाजूला माझी मैत्रीण. तर ते दोघे काही म्हणणार तेवढ्यात ही, ‘मी अशीच आले तर चालेल का?’. काय बोलणार मी? तिला म्हणालोच नव्हतो. या मुली अशा कशा.

संगणकाचा कोर्स करीत असतांना एका मुलीला मी तीच आडनाव विचारलेलं. तर तिने डायरेक्ट ‘मी तुझ्या जातीची नाही’ अस म्हणालेली. माझी बहिणाबाई देखील अशीच. एकदा मी लहान असतांना, म्हणजे समजतही नव्हते. असेन एक दोन वर्षाचा. तिच्या कडेवरून मी पडलेलो. अजूनही आमच्या दोघांच्या गप्पा रंगल्या की, ती नेहमी तिची खंत बोलून दाखवते. आणि नेहमी मला तिचा ठरलेला प्रश्न, ‘तुला खूप लागलेलं का?’. ह्या अशा. कधी खरंच स्वभावाने छान, तर कधी स्वतःतच गुंतून पडलेल्या. म्हणजे दुसर्याला समजून घेण. एखादी गोष्ट समजावून नाही, तर पटवून सांगणे एकदम उत्तम जमते. पण स्वतःचा आणि विचारांचा इतका घोळ घालून घेतात ना. यांना बोलायचे खूप असते पण कुणाला सांगायचे नसते. कळल न, मला काय म्हणायचे असते. म्हणजे कुणाला नाही सांगायचे, पण बोलायचे त्यावेळी ह्यांचा ठरलेलं वाक्य ‘कुणाला सांगू नकोस’. म्हणजे कित्येकदा आई आणि मैत्रिणींच्या तोंडून हे वाक्य मी ऐकल आहे.

पण छान! एकूणच मुली छान असतात. अगदी मनापासून बोलायचे झाले तर, मुलगी म्हणजे सृष्टीच्या सौंदर्याचा एक नाजूक आणि खूप प्रेमळ आविष्कार. एक आदर आणि आशेचे, एक आत्मविश्वासाचे स्थान. सर्व महिला वर्गाला, या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिलांचे स्थान समाजात वाढो, ही परमेश्वरा चरणी प्रार्थना.

Advertisements

4 thoughts on “महिला दिन

  1. “Stree” mahnje Vishvakartyani aaplya pahilyah sakhar zopechya veli taklela ek ahluwar nishwas–

    he maza nahiye…” mrutynjy” – Shivaji Sawant

    Karnache vichar aahet he.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s